जिल्ह्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा !! | MSCE Pune Scholarship Exam 2025

MSCE Pune Scholarship 2025 8th and 5th Class Exam

MSCE Pune Scholarship 2025 Exam

MSCE Pune Scholarship 2025 8th and 5th Class: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग पूर्णतः सज्ज झाला असून, २४२ परीक्षा केंद्रांवर एकूण ३२,९९२ विद्यार्थी विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षा वेळापत्रक आणि केंद्रे

शिष्यवृत्ती परीक्षा सातारा जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पार पडणार असून, दोन सत्रांत परीक्षा घेतली जाईल—

  • पेपर क्रमांक १: सकाळी ११:०० ते १२:३० – भाषा आणि गणित
  • पेपर क्रमांक २: दुपारी २:०० ते ३:३० – गणित आणि बुद्धिमत्ता

पाचवीसाठी परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी संख्या:

  • सातारा – २३ केंद्रे
  • जावली – ९ केंद्रे
  • महाबळेश्वर – ९ केंद्रे
  • वाई – ९ केंद्रे
  • खंडाळा – ८ केंद्रे
  • फलटण – २४ केंद्रे
  • माण – ९ केंद्रे
  • खटाव – १० केंद्रे
  • कोरेगाव – ८ केंद्रे
  • कराड – १७ केंद्रे
  • पाटण – १५ केंद्रे
  • एकूण विद्यार्थी: २०,१६०

आठवीसाठी परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी संख्या:

  • सातारा – २० केंद्रे
  • जावली – ६ केंद्रे
  • महाबळेश्वर – ६ केंद्रे
  • वाई – ५ केंद्रे
  • खंडाळा – ३ केंद्रे
  • फलटण – १३ केंद्रे
  • माण – ८ केंद्रे
  • खटाव – ९ केंद्रे
  • कोरेगाव – ८ केंद्रे
  • कराड – १४ केंद्रे
  • पाटण – ९ केंद्रे
  • एकूण विद्यार्थी: १२,८३२

परीक्षेसाठी संपूर्ण तयारी पूर्ण – प्रशासन सतर्क

प्रत्येक परीक्षा केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावरून २४२ परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षेसाठी अर्धा तास आधी प्रवेश दिला जाणार आहे.
  • मुख्याध्यापकांच्या लॉगइनमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध असून, ती विद्यार्थ्यांना वेळेत वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSCE Pune Scholarship 2021 8th and 5th Class- राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली होती. मात्र,कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटींच्या अधीन राहून येत्या ८ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती, परंतु आता हि परीक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

MSCE Pune Scholarship 2021 Exam Admit Cards 

MSCE Pune 2021 Examination Hall tickets / Admit Cards are published here. The Details̋̋ about this recruitment are given here. You can Download the Admit Cards From this link.

तसेच या शिष्यवृत्ती परीक्षा दि. ०९/०८/२०२१ चे प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिल्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रकाशित झाले आहे 

MSCE Pune Exam Date Changed

The Std V and VIII scholarship examinations will be held on August 8, as per a notification by the state education department.

Compared with the last year, when around nine lakh students had registered for the examination, this year the numbers have dipped to 6.5 lakh registrations, due to Covid 19 restrictions.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनामुळे २३ मे रोजी घेतली जाणार होती. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. मात्र,कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सर्व साधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करता. परंतु, यंदा कोरोनामुळे ही संख्या चांगलीच घटली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ६ लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यात इयत्ता पाचवीच्या ३ लाख ८६ हजार ३२८ तर इयत्ता आठवीच्या २ लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड