MSBTE Update
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या ९५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. २५ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार असून दरवर्षी ७ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रथमच शिष्यवृत्ती प्रक्रिया सुरू केली असून राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या नव्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आर्थिक मदत होणार आहे. पहिल्या वर्षात किंवा पहिल्या सेमिस्टरमध्ये एमएसबीटीई संलग्न संस्थेत प्रवेश घेत लेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभमिळणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रतेत किमान ७० टक्के गुण मिळव लेले असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखांसाठी एसएससी तर फार्मसीसाठी एचएससी गुणपत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी २०२५-२६ या वर्षात कोणतीही इतर शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप घेतली नसावी, तसेच घरातील एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे.
कुटुंबातील कमावता सदस्य मृत झाल्यास आणि विद्यार्थ्याला आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता असल्यास, त्या विद्यार्थ्याला डिप्लोमा शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर शिष्यवृत्तीची पात्रता मिळू शकते, अशी तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. पुढील वर्षीही शिष्यवृत्ती सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वार्षिक परी-क्षेत फर्स्ट क्लास मिळवणे अनिवार्य असेल. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षासाठीही विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, परंतु शिष्यवृत्तींची एकूण संख्या पहिल्या वर्षात उपलब्ध असलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्या नसावी अशी अट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अर्ज www.msbte.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरायचा आहे. विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी मार्कशीट, पालकांचे २०२४-२५ उत्पन्न प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास पहिल्या/दुसऱ्या वर्षाची गुणपत्रिका आणि नॅशनलाइज्ड बँकेच्या पासबुकची प्रत अपलोड करावी लागणार आहे.
MSBTE Update
राज्यातील तंत्रशिक्षण परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदापासून फार्मसी, तर पुढील वर्षापासून पॉलिटेक्निकच्या परीक्षांसाठी पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका वितरणापासून उत्तरपत्रिका तपासणीपर्यंतची सर्व यंत्रणा डिजिटल होणार आहे. यामुळे परीक्षेत पारदर्शकता वाढविण्याबरोबरच प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
गेल्या काही परीक्षांमध्ये फार्मसीच्या काही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्याचप्रमाणे मागील काही वर्षांपूर्वीचा पॉलिटेक्निक परीक्षांतील गैरप्रकारांचा अनुभव तंत्रशिक्षण मंडळाला होता.
त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात, यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी ११ नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व निःपक्ष पार पडाव्यात,
यासाठी १२५ भरारी पथके राज्यभन तैनात करण्यात आली आहेत. तसेच बैठी पथके असणार आहेत. सामूहिक गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मंडळ संलग्नता तत्काळ र करण्यात येणार असल्याचा इशार तंत्रशिक्षण मंडळाने दिला आहे.
४० दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे होणार शक्य
नवीन नियमानुसार यंदापासून फार्मसीच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दहा मिनिटे आधी ऑनलाईन माध्यमातून केंद्रांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर उत्तरपत्रिका तपासणीदेखील ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामुळे पूर्वी लागणारा ५ ते ६ दिवसांचा वेळ वाचणार असून, निकाल ४० दिवसांच्या आत जाहीर करता येणे शक्य होणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















