पॉलिटेक्निक शिक्षकांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी!! | MSBTE Time Table

MSBTE Diploma Exam Time Table

MSBTE Schedule 2025

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) पॉलिटेक्निकमधील शिक्षकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. पुण्यातील बीएसएनएल झोनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटरमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सत्रासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून यात विविध दूरसंचार विषयांवरील प्रशिक्षणाचा समावेश आहे.

राज्यातील शासकीय व अनुदानित पॉलिटेक्निकमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक इंटर्नशिप उपलब्ध आहे. त्याच अनुषंगाने आता शिक्षकांनाही प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख, उपकरणे आणि नेटवर्क्सचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल, तसेच प्रयोगशाळेबाहेरील व्यवहार्य पद्धती शिकता येतील.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचे कौशल्य व आत्मविश्वास वाढून त्यांच्या अध्यापनातील व्यवहार्यता सुधारेल. परिणामी विद्यार्थी विषय अधिक सोप्या आणि वास्तवाशी निगडित पद्धतीने शिकू शकतील. औद्योगिक अनुभवामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासही मदत होईल आणि रोजगार बाजारपेठेत आवश्यक असलेल्या कौशल्यांची जाणीव विद्यार्थ्यांना होईल.

राज्यातील पॉलिटेक्निक संस्थांतील शिक्षकांना संबंधित संस्थेच्या प्राचार्याच्या शिफारशीसह अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्जामध्ये सहभागी शिक्षकांचे नाव, संस्था कोड, शाखा, पदनाम, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच प्राचार्यांची शिफारसपत्र संस्था शिक्कामोर्तब असलेले सादर करणे बंधनकारक आहे.

चार प्रशिक्षण गटांचा समावेश
बीएसएनएल झेडटीटीसी पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये एकूण चार गटांचा समावेश करण्यात आला आहे. ‘डेटा कम्युनिकेशन’ या विषयाचे प्रशिक्षण २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडेल. त्यानंतर ‘मोबाईल कम्युनिकेशन’ विषयाचे प्रशिक्षण १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान होईल. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ‘स्विचिंग व बेसिक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर’ या विषयाचे प्रशिक्षण होणार आहे. शेवटचा गट ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘ट्रान्समिशन व एफटीटीएच टेक्नॉलॉजी’ या विषयावर आधारित असेल. प्रत्येक गटासाठी ३० जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पॉलिटेक्निक शिक्षकांना या प्रशिक्षणामुळे उद्योग क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, पदविका अभ्यासक्रम अधिक परिपूर्ण व व्यवहार्य पद्धतीने शिकवता येणार आहे. प्रत्यक्ष उपकरणे व आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित प्रयोगांचा अनुभव शिक्षकांना मिळाल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल.


 

MSBTE Schedule 2025

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी आणि हिवाळी-२०२५ परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यानुसार १ ते १२ सप्टेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात बदल करून ८ ते १९ सप्टेंबरदरम्यान नोंदणी करण्याची मुभा दिली आहे. ज्यांना या कालावधीत अर्ज करता येणार नाही अशांना २०० रुपये दंडासह २० ते २३ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार नाही. त्यानंतर १५०० रुपये दंडासह २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय स्तरावर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी अर्ज व सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान निश्चित करता येईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड