तंत्रशिक्षण मंडळाकडून पदविकांचा निकाल!! जाणून घ्या सविस्तर माहिती

MSBTE Result 2022

MSBTE Result 2022

MSBTE Result 2022: MSBTE Result Of Diplomas Conducted By The State Board Of Technical Education Have Fallen. Further details are as follows:-

तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रामुख्याने अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यंदा अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या. त्यापूर्वी त्यांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे शिकवले जात होते. परीक्षा मात्र, ऑफलाइन झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला, असे सांगितले जात असून, ४० टक्केच निकाल लागल्याचे चित्र आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून (State Board of Technical Education) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट पदविका परीक्षेचे निकाल मोठ्याप्रमाणावर घसरल्याचे उघडकीस आले आहे.
  • यंदा केवळ ४० टक्के विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमात उत्तीर्ण झाले असून, ऑनलाइन शिक्षणामुळे ही गोष्ट घडली असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
  • पदविका परीक्षेला बसलेले जवळपास निम्म्याहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण का झाले, असाही प्रश्न संस्थाचालकांकडून विचारला जात आहे.
  • तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रामुख्याने अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंटसाठी दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो.
  • दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यंदा अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या.
  • त्यापूर्वी त्यांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे शिकवले जात होते.
  • परीक्षा मात्र, ऑफलाइन झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला, असे सांगितले जात असून, ४० टक्केच निकाल लागल्याचे चित्र आहे.
  • एवढ्या मोठ्या प्रमाणावर निकाल घसरण्याची ही गेल्या अनेक वर्षांमधील पहिलीच घटना असल्याचे काही संस्थांच्या प्राचार्यांकडून सांगण्यात आले.

काही प्राचार्यांच्या मते अंतिम परीक्षेसाठी जे प्रश्न विचारण्यात आले होते, ते प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते. याशिवाय परीक्षेसाठी दर वर्षी जो पॅटर्न सेट केला जातो. त्या पलिकडे जाऊन प्रश्न विचारण्यात आले होते. यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून, त्याचा परिणाम निकालावर झाला असल्याचे प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत

पदविका परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत असून, ऑनलाइन परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी काही संस्थाचालक करीत आहेत. संपूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाल्यानंतर विद्यार्थ्यांना द्याव्या लागलेल्या ऑफलाइन परीक्षेतही अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न असल्याने परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड