MPSC चा ऐतिहासिक निर्णय! लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठीची ‘टंकलेखन चाचणी’ रद्द! – MPSC Typing Test cancel

MPSC Typing Test cancel – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत येणाऱ्या लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी २० मे २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले. या नव्या नियमामुळे आता मुख्य परीक्षेनंतर थेट अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी थेट शासन स्तरावर केली जाईल. यामुळे निकालातील मोठा विलंब टळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क (Group C) सेवा अंतर्गत येणाऱ्या लिपिक टंकलेखक (Clerk-Typist) आणि कर सहाय्यक (Tax Assistant) या संवर्गासाठी आयोगातर्फे घेतली जाणारी ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ (Typing Skill Test) पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक बुधवारी (२० मे २०२६) प्रसिद्ध केले. या निर्णयामुळे आता परीक्षा प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार असून अंतिम निकालही अत्यंत कमी वेळेत जाहीर होण्यास मदत होणार आहे.

MPSC Typing Test cancel

आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा नवा बदल बैठकीच्या दिनांकापासून म्हणजेच २४ एप्रिल २०२६ पासूनच तात्काळ अंमलात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असूनही आयोगाकडून पुन्हा स्वतंत्रपणे टंकलेखन चाचणी घेतली जात होती. म्हणजेच उमेदवारांची एक प्रकारे दोनदा परीक्षा होत होती. या दुहेरी प्रक्रियेमुळे अंतिम निकाल लागण्यास मोठा विलंब होत होता. हीच बाब लक्षात घेऊन आयोगाने कौशल्य चाचणी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. टंकलेखन चाचणीमध्ये दरवर्षी तांत्रिक गोंधळ निर्माण होत होता. त्यामुळे आयोगाने ही चाचणी रद्द केली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टंकलेखन परीक्षा घेऊन उमदेवारांना प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र शासनाचे अधिकृत असल्यामुळे आयोगाने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले की, टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिले जाते. त्यामुळे ते अधिकृत आहे. हे प्रमाणपत्र असल्याच्या आधारावरच उमेदवार पूर्व आणि मुख्य परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आयोगाच्या दिनांक २४ एप्रिल, २०२६ रोजीच्या बैठक क्रमांक २०५ मध्ये महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता आयोगाकडुन घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदर निर्णय आयोगाच्या दिनांक २४ एप्रिल, २०२६ रोजीच्या बैठकीच्या दिनांकापासून अंमलात येईल, असे आयोगाने सांगितले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड