MPSC परीक्षा पुढील अपडेट कधी ?
MPSC New Examinations Dates
MPSC Exam New Updates & Details : मराठा समाजातील संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा स्थगित केल्या. याला आता दीड महिना उलटूनही आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकारचा हा राजकीय डाव असून मुख्यमंत्री एका समाजाच्या दबावात निर्णय घेत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
राज्य लोकसेवा आयोगाकडून २०० पदांच्या परीक्षेसाठी राज्यातील २ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ते वर्षभरापासून परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यासाठी आर्थिक ओढताणही सहन करीत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने सरकार करोनाचे कारण पुढे करून परीक्षा लांबणीवर टाकत आहे. सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा एका दिवसाआधी स्थगित केली. याला दीड महिना उलटूनही आयोगाने अद्याप परीक्षेची दुसरी तारीख जाहीर केलेली नाही. न्यायालयात मराठा आरक्षणाचा पेच वर्षभर सुरू राहिल्यास परीक्षाच होणार नाही का, असा सवालही केला जात आहे. परीक्षा होईल या आशने हजारो विद्यार्थी करोनाकाळातही पुणे, मुंबईत भाडय़ाच्या खोतील राहून तयारी करीत आहेत. मात्र, परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने त्यांचे संपूर्ण नियोजन बिघडले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने इतर समाजातील विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियासह अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी समाजातील संघटनांसह खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
.. तर जागा सोडून तरी परीक्षा घ्या
२०० पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी २ लाख ६२ हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ४२ हजार आहे. शिवाय २०० जागांमधून आरक्षणाचा विचार केल्यास मराठा समाजाला २४ जागा मिळू शकतात. मराठा समाजाचे आरक्षण हीच परीक्षेआड येणारी अडचण असेल तर किमान तेवढय़ा जागा सोडून तरी परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
परीक्षेच्या पुढील तारखेसंदर्भात अद्यापतरी निर्णय झालेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा. लवकरच नवीन तारीख कळवली जाईल.
– प्रदीपकुमार, सचिव, Maharashtra Lokseva Aayog.
निवडणुका घेता, मग परीक्षा का नाही?
मुख्यमंत्र्यांनी करोनाचे कारण देत ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा स्थगित केली होती. मात्र, नुकत्याच बिहारच्या निवडणुका पार पडल्या. शिवाय महाराष्ट्रातील चित्रपटगृहांसह आता
मंदिरेही उघडण्यात आली. पदवीधर आणि शिक्षक मतदारासंघाच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका घेता येतात तर परीक्षा का नाही, असा प्रश्न स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोरराम यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही आमचीही भूमिका आहे. मात्र, सरकारने योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करीत परीक्षा घ्यायला हव्यात.
– अनुप देशमुख, मराठा विद्यार्थी परिषद.
: : Previous Update Given Below : :
MPSC Revised Dates of Exams : महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील पुढील नवीन तारखांचा अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.
As Per latest New MPSC Duyyam Seva & Engineering Services Examination are now Postponed. This Examinations was Schedules in November 2020 but now it is Postponed.
परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता प्रश्न सोडवला. त्यानंंतर आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आणखी दोन परीक्षा रद्द केल्याचे एमपीएससीने मंगळवारी जाहीर केले. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता १ नोव्हेंबरची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरची दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षाही एमपीएससीने पुढे ढकलली. तब्बल ४ लाख ४० हजार विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असताना एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावात असून परीक्षा होणार तरी कधी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
10 October News : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून MPSC पुढे ढकलण्यात आली आहे.
मागील अपडेट : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आलेल्या. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MPSC Revised Dates of Exams |
|
जाहिरात : https://bit.ly/2F5oTJd |
मागील अपडेट – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या आहेत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Exams Dates
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MPSC Revised Dates |
|
जाहिरात : https://bit.ly/2UNmdoc |
Vanvibhag bharti