उमेदवारांना MPSC चा अधीक्षक निकाल नेमका कधी लागणार या बद्दल प्रतीक्षा संपत नाही आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत गती आल्याच्या दाव्यांवर शालेय शिक्षण विभागातील अधीक्षक व तत्सम पदांच्या भरतीचा (जाहिरात क्र. ९०/२०२२) निकाल प्रलंबित राहिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल तीन वर्षांपासून सुरू असून, १४ ऑगस्ट २०२५ रोजी चाळणी परीक्षा होऊन आणि अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध होऊनही तब्बल दहा महिन्यांहून अधिक काळ मुख्य निकाल जाहीर झालेला नाही. आयोगाने इतर परीक्षांचे निकाल जलद गतीने लावल्याचे चित्र निर्माण केले असले, तरी या निकालातील सातत्यपूर्ण विलंबामुळे हजारो उमेदवारांचे शैक्षणिक आणि आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
या संदर्भात उमेदवारांनी आयोगाच्या मदत केंद्राकडे वारंवार विचारणा केली असता फक्त ह्यप्रक्रिया सुरू आहेह्न असे उत्तर दिले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी निकाल अंतिम टप्प्यात असून लवकरच मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या विलंबामुळे उमेदवारांच्या वयोमर्यादा आणि रोजगाराच्या संधींवर गंभीर परिणाम होत असून, निकाल तातडीने न लावल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष व सचिवांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
Advt. No. 117/2025 Maharashtra Group B (Non-Gazzetted) Services Combined Preliminary Examination 2025 – Revised List of candidates allowed for Scribe and/or Compensatory Time.
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ – लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC द्वारे प्रकाशित पात्र उमेदवारांची यादी पहा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















