महाराष्ट्र लोकसेवा आयोगात आरक्षण गोंधळ उघड!- MPSC Reservation Irregularities Exposed!
Turmoil in MPSC: Reservation Irregularities Exposed!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (MPSC Reservation Irregularities Exposed ) अनुसूचित जमाती प्रवर्गातून लिपिक-टंकलेखक पदावर एका उमेदवाराची नियुक्ती झाली. त्यांचे आडनाव बटराखाये असून, त्यांच्या जात प्रमाणपत्राला अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी विशेष मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व वैधता सादर केली. सध्या ते विशेष मागास प्रवर्गातून पदोन्नती मिळवून सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
MPSC मधील आरक्षण गोंधळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना १ मे १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली. आयोगात २३६ मंजूर पदांपैकी १६ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. मात्र, यातील केवळ ११ पदे भरली गेली आहेत, तर ५ पदे अद्याप रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विशेष म्हणजे, अनुसूचित जमातीमधून नियुक्त झालेल्या पण जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या २ आहे.
सुप्रीम कोर्ट व उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय (६ जुलै २०१७) आणि नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश (२८ सप्टेंबर २०१८) अद्याप राज्यात लागू करण्यात आलेला नाही.
सरकारने मूळ नियुक्ती अनुसूचित जमातीसाठी असताना संबंधित अधिकाऱ्याला विशेष मागास प्रवर्गातून पदोन्नती कशी दिली?
बेरोजगार आदिवासी उमेदवारांना संधी न मिळाल्याने विशेष पदभरती मोहीम राबवून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.