MPSC ने शिफारस केलेल्या ४५ जणांची नियुक्ती रद्द! – MPSC Recruitment 2025
MPSC Recruitment 2025
MPSC Exam 2025
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ वा परीक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने शिफारस केलेल्या १६४ उमेदवारांपैकी दिलेल्या मुदतीत ४५ उमेदवार रुजू न झालेल्या संबंधित उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. सरळ सेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०२३ च्या अंतिम निकालाच्या आधारे आयोगाने शिफारस केलेल्या १६४ उमेदवारांची या विभागाच्या मंत्रालयीन विभागात/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात सहायक कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्याचबरोबर उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी १० डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा २०२३ मधून नियुक्त झालेल्या १८ उमेदवारांनी केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत अगोदरच कार्यरत असल्यामुळे सहायक कक्ष अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती केली होती. या १८ उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी ९ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
४० लाख रुपये दिल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेची प्रश्नपत्रिका देतो असे सांगणारे फोन आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता. गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवांनी नवी मुंबईत (बेलापूर) पत्रकार परिषद घेऊन २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका सूरक्षित कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले. परीक्षार्थी उमेदवारांनी याबाबत आयोगाकडे केलेल्या इ मेलवरील तक्रारींमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे याबाबत गुरुवारी लेखी तक्रार केल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. ही परीक्षा २ लाख ८६ हजार उमेदवार देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २ फेब्रुवारीला गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर विभाग नियंत्रक, मंत्रालयीन सहाय्यक या पदांसाठी राज्यातील सहा विभागांमध्ये विविध ८६९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेत राज्यातील २ लाख ८६ हजार उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. ही परीक्षा देणा-या उमेदवारांना काही समजाकंटकांकडून संपर्क साधून त्यांना प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी ४० ते ४५ लाख रुपयांचा दर असून आता रक्कम नसल्यास नंतर देण्याची तरतूद असल्याचे सुद्धा संभाषण समाजमाध्यमांवर पसरल्याने उमेदवारांमध्ये एकच खळबळ माजली. गोंधळलेल्या स्थितीमध्ये अनेक उमेदवारांमध्ये २ फेब्रुवारीला होणारी परीक्षा होईल की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आयोगाने गुरुवारी पोलीसांकडे धाव घेतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आयोगाची भूमिका स्पष्ट केली. काही उमेदवारांनी आयोगाला इ-मेलवर संपर्क साधून परीक्षांबाबत समाजमाध्यमांवर पसरलेल्या आमिषाची माहिती दिल्यावर आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे याबाबत रीतसर तक्रार केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा २०२२च्या ६२३ उमेदवारांची मुलाखत घेऊन १८ जानेवारी २०२४ ला गुणवत्ता यादी जाहीर केली होती. याला शनिवारी एक वर्ष उलटून गेले. असे असतानाही २०२२ पासून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या ६२३ पदांवर निवड झालेले अधिकारी राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कुचकामी धोरणामुळे अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे.
प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून लाखो विद्यार्थी पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये अभ्यास करत आहे. परंतु, सुरुवातीला ‘एमपीएससी’चे कोलमडलेले नियोजन व सरकार आणि प्रशासनातील लालफितशाहीमुळे उमेदवारांचे नैराश्य वाढत आहे. ‘एमपीएससी’ने २०२२ मध्ये २३ संवर्गातील ६२३ पदांच्या राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली. मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये तर डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुलाखती झाल्या. १८ जानेवारी २०२४ ला गुणवत्ता यादी जाहीर झाली, तर २० मार्च २०२४ ला पदनिहाय अंतरिम यादी जाहीर झाली. यात अनेक उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी आदी महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. मात्र, काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेल्याने नियुक्त्या रखडल्या होत्या. सर्व याचिका निकाली निघाल्या असून त्यानंतर आयोगाने अंतिम फेरनिवड यादीही जाहीर केली. मात्र सामान्य प्रशासन विभागाने अद्याप या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाही.
तीन वर्षांपासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू असून नियुक्तीअभावी उमेदवार तणावात आहेत. काहींना नियुक्ती मिळणार की नाही, अशी भीती वाटायला लागली आहे. या प्रवासात काही उमेदवारांचे लग्नही तुटल्याची माहिती आहे. तर काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने राजपत्रित अधिकारी पर्दासाठी निवड होऊनही सुरक्षा रक्षकाचे काम करणे, शिकवणी घेणे अशी काम करावी लागत आहेत. उमेदवारांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, उमेदीची पाच ते सात वर्षे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वाहून अपार कष्टातून निवड होऊनही नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे बेरोजगार असून त्यांना आर्थिक तसेच सामाजिक विवंचनेला सामोरे जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून यावर तोडगा काढावा अशी विनंती केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) ४३१ जागांसाठी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची वस्तूनिष्ठ परीक्षा नुकतीच घेण्यात आली. यात खुल्या वर्गासाठी अत्यंत कमी जागा असून शासकीय सेवेतील तहसीलदार, पोलीस उपविभागीय अधिकारी अशी अनेक पदे रिक्त आहेत. तर, २०२५ पासून राज्यसेवा परीक्षेत बदल होणार असून ती वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीने परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही शेवटी संधी आहे. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थी हिताचा विचार करता मुख्य परीक्षेपूर्वी राज्यसेवा २०२४च्या जागांमध्ये वाढ करावी अशी मागणी होत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘एमपीएससी’ने जून २०२२ मध्ये परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. बदलाची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप होते. मात्र, एका वर्षात परीक्षेत मोठ्या बदलांस विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्याची दखल घेत ‘एमपीएससी’ने परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यसेवा २०२४ ही वस्तुनिष्ठ पद्धतीने झालेली शेवटी परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेत जागावाढ झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी २०२२ मध्ये ६२३ पदांसाठी राज्यसेवा परीक्षा घेण्यात आली होती. तसेच राज्यात आताही राजपत्रित अधिकाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घेत ‘एमपीएससी’कडे वाढीव जागांचे मागणीपत्र पाठवून राज्यसेवा २०२४च्या परीक्षेतील जागांमध्ये वाढ करण्याची विनंती करावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
राज्यसेवा २०२४ पूर्व परीक्षा १ डिसेंबरला घेण्यात आली असून एप्रिल महिन्यात मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र, जागावाढ करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. यासाठी सरकारकडून ‘एमपीएससी’ला पुन्हा सुधारित मागणीपत्र पाठवून इतर जागांची मागणी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यसेवा २०२४ मध्ये ४३१ पैकी खुल्या वर्गासाठी केवळ ७० जागा आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जागावाढ केल्यास सर्वांनाच फायदा होणार आहे.
काही विभागातील रिक्त पदे
- उपजिल्हाधिकारी: १६
- पोलीस उपविभागीय अधिकारी: १६१
- तहसीलदार: ६६
- नायब तहसीलदार: २८१
- मुख्याधिकारी (अ): ४४
- मुख्याधिकारी (ब): ७५
- उपशिक्षणाधिकारी: ३४७
Mala जॉब paije
Tumhi mantat Bharti Direct Goverment job Dyala Pahije permenant
new MPSC recruitment Update
10th pass sathi job Recument karatey……