MPSC New Secretary Tukaram Munde – अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता आयोगावर चौकशी समितीचे सचिव म्हणून काम पाहणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) चौकशी समितीच्या सचिवपदाची धुरा आता राज्याचे डॅशिंग आणि शिस्तप्रिय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पुणे आणि राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आता या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या सचिव पदी आयएएस ऑफीसर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे. MPSC आंदोलनाबाबत रोहित पवार, मंत्री शिवेंद्रराजेंमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरु होती. सायंकाळी उशीरा मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन मंत्री शिवेंद्रसिंह राजे आले आणि त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळे एमपीएससीच्या या चौकशी मध्ये मोठी पारदर्शकता आणि वेग येईल, अशी आशा लाखो परीक्षार्थी व्यक्त करत आहेत. मुंढे हे आपल्या बेधडक, प्रामाणिक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. आयोगासमोरील रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक वेळेत पूर्ण करणे, निकाल वेळेवर जाहीर करणे आणि परीक्षा पद्धतीतील गैरप्रकार रोखणे ही मोठी आव्हाने आता त्यांच्यासमोर असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीचा मान ठेवून सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा विश्वातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मुंढे हे एमपीएससीचा विस्कळीत झालेला गाडा कसा रुळावर आणतात आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कसा संपादन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. आमदार रोहित पवार हे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या दोन नेत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारचा मुसदा घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विद्यार्थ्यांची महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे विवेक भीमनवार यांचा राजीनामा, त्याबद्दल काय निर्णय घेतला जाणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे. यावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मिठणार की नाही हे ठरणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















