MPSC मध्ये तीन प्रश्नांची उत्तरे चुकीची; आक्षेप नोंदवण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत!। MPSC Nagari Seva Answer Key
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ डिसेंबरला घेतलेल्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा -२०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. प्रथमदर्शनी या तालिकेतील तीन प्रश्नांची उत्तरे आयोगानेच चुकीची नमूद केल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. आयोगाने १० डिसेंबरपर्यंत उत्तरसूचीवर तक्रारी, आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे. त्यानुसार या परीक्षार्थींनीही संदर्भासह आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अंतिम उत्तर सूचीनंतरच अधिक स्पष्टता होईल, असे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा आरक्षण व कृषी पदवीधरांचाही यात समावेश करण्यात आला आहे. या मागणीमुळे चर्चेत आलेली एमपीएससीची परीक्षा वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागील रविवारी (१ डिसेंबर) पार पडली. परीक्षेनंतर उमेदवारांना उत्तरसूचीही आयोगाने तत्काळ ५ दिवसांतच ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यात विज्ञान, अर्थशास्त्रासह अन्य विषयाचा एक अशा ३ प्रश्नांच्या उत्तराबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यासाठी उत्तरावर आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाइन पुराव्यांसह ते मुदतीत नोंदवायचे आहेत, अन्यथा त्यांच्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
- प्रश्नः खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत २०११ च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ? अ) लोकसंख्येत महाराष्ट्रात देशात दुसरा ब) घनता ३६५ चौ. किमी आहे. क) साक्षरता ८२.९१ टक्के आहे. ड) लिंग गुणोत्तर ९२५ आहे. पर्याय : १) अ, ब, क२) अआणिब, ३) अ,ब, ड, ४) वरीलपैकी सर्व आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार वरीलपैकी सर्व हा पर्याय योग्य असल्याचे नमूद केले आहे. परंतु लिंग गुणोत्तर ९२५ नाही, तर राज्याचे लिंग गुणोत्तर हे गतवर्षीच्या उत्तरानुसार ९२९ आहे. त्यानुसार देण्यात आलेल्या उत्तरात पर्याय १ हे उत्तर अपेक्षित असताना आयोगाच्या सूचीत पर्याय ४ दिला आहे. मग गतवेळचे उत्तर बरोबर की आताचे, असा संभ्रम विद्याथ्र्यांमध्ये निर्माण झाला आहे.
- प्रश्न : चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? १) बांदर २) घोगुस ३) तेलवासा ४) वणी याचे उत्तर अयाोगाने दिले: पर्याय १ म्हणजे बांदर, परंतु बरोबर उत्तर हे (अ,ब,क अर्थात बांदर, घोगुस, तेलवासा हे हवे.)
- प्रश्न – ३) हिगीन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढी ही. उत्तर- ए आणि बी दोन्ही पर्याय हवे होते. परंतु आयोगने केवळ अहाच पर्याय बरोबर असल्याचे तालिकेत नमूद केले आहे.
सध्याच्या पॅटर्नची ही शेवटची संधी केंद्रीय व राज्यपातळीवर एकच परीक्षा पॅटर्न असावा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार सध्याच्या पॅटर्नचीही शेवटची संधी असेल. त्यामुळे यंदा अधिक संख्येने उमेदवार प्रविष्ट झाले होते. तिची उत्तरतालिका जाहीर झाली आहे. १० डिसेंबरपर्यंत तक्रार करता येईल. त्यावर निर्णय घेत आयोग निकालाच्या १५ दिवस आधी अंतिम तालिका जाहीर करेल. कुठलाही निर्णय समन्यायी होईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Nagari Seva Answer Key: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी आयोजित “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा-२०२४” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व दिनांक १ जुलै, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १० डिसेंबर, २०२४ रोजी २३.५९ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतीचीच दखल घेतली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
हरकती सादर करण्यासाठी नियमावली
- उमेदवारांनी फक्त आयोगाने दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व ०१ जुलै, २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच हरकती ऑनलाइन पद्धतीने सादर कराव्यात.
- विहित ऑनलाइन प्रक्रियेव्यतिरिक्त, कोणत्याही इतर पद्धतीने पाठवलेल्या हरकती आयोग स्वीकारणार नाही.
- हरकती सादर करण्याची अंतिम तारीख:
- १० डिसेंबर, २०२४ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत प्राप्त हरकतींचीच दखल घेतली जाईल.
काय करावे?
- आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- उत्तरतालिका डाउनलोड करा आणि तुमच्या उत्तरपत्रिकेशी तपासणी करा.
- हरकती असल्यास, आयोगाने विहित केलेल्या फॉर्मेटमध्ये फक्त ऑनलाइन माध्यमातूनच हरकती सादर करा.
1 | 414/2023 | Advt.No. 414/2023 Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 – Answer Key – Paper 1 | 05-12-2024 | Download |
2 | 414/2023 | Advt.No. 414/2023 Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 – Answer Key – Paper 2 | 05-12-2024 | Download |
हरकती सादर करताना महत्त्वाचे नियम
- ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त कोणत्याही इतर पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.
- हरकती फक्त आयोगाच्या संकेतस्थळावरून विहित पद्धतीनेच सादर कराव्यात.
दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांसाठी विशेष सवलत
सदर परीक्षेतील काही प्रश्न आकृत्या किंवा नकाशांवर आधारित असल्याने, दृष्टीहीन व क्षीणदृष्टी उमेदवारांना या प्रश्नांच्या मूल्यमापनात सवलत देण्याचा प्रस्ताव आयोगाने ठेवला आहे.
- या सवलतीसंदर्भात दृष्टीहीन आणि क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या प्रकारच्या सवलतीसाठी संबंधित सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध होतील.
उमेदवारांसाठी महत्त्वाचे:
- उत्तरतालिका तपासा:
- प्रश्नपत्रिकांच्या उत्तरतालिका तपासून, आवश्यक असल्यास हरकती सादर करा.
- हरकती सादर करण्यासाठी नियमावलीचे पालन करा:
- हरकतीसाठी आयोगाने विहित केलेल्या फॉर्मेट व प्रक्रियेचा वापर करा.
- सवलतीची अंमलबजावणी:
- सवलतीसाठी संबंधित उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व पुरावे तयार ठेवावेत.
तांत्रिक अडचणी असल्यास मदतीसाठी संपर्क साधा
- टोल फ्री क्रमांक:
- १८००-१२३४-२७५
- ७३०३८२१८२२
- ईमेल:
उमेदवारांनी हरकती सादर करण्यासाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेळेत आणि योग्य पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी, याची काळजी घ्या.
Table of Contents