गट क संवर्गातील पदाची भरतीप्रक्रिया MPSC द्वारे होणार!!

MPSC-Mega Bharti 2021

MPSC MPSC Recruitment 2021 

MPSC-Mega Bharti 2021 : It has been decided to hand over the recruitment process for the post of Group C cadre of Industry Inspectors from Industry Department, Energy Department and Labor Department to Maharashtra Public Service Commission. Further details are as follows:-

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्यानं तीन निर्णय घेण्यात आले. उद्योग विभाग, उर्जा विभाग आणि कामगार विभागाकडील उद्योग निरीक्षक या गट क संवर्गातील पदाची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील विद्यार्थी विविध विभागातील सरळसेवा भरती एमपीएससीनं करावी, अशी मागणी करत होते. सरकरारच्या यानिर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

विविध विभागातील सरळसेवा भरती लोकसेवा आयोगाकडे जाणार?

राज्यातील विद्यार्थ्यांची राज्य सरकारकडील विविध विभागांच्या सरळसेवा भरती राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सोपव्यावात अशी मागणी आहे. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागानं लोकसेवा आयोगाकडे विचारणा केली होती . मात्र, लोकसेवा आयोगाकडील मनुष्यबळ पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी हे काम आव्हानत्मक असेल. लोकसेवा आयोगानं मनुष्यबळ वाढवल्यास परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, राज्य सरकारकडील ड संवर्गाच्या परीक्षा घेण्यास एमपीएससीनं असमर्थता दर्शवली आहे.


Mega Bharti 2021 महाभरती is now Postponed For 1 Month due to Corona Effect. This delay is not in control of Government. So candidates must keep patients. The New updates about Megabharti 2021 are mentioned Below.

 • राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे “महाआयटी’ (MahaIT 2021) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 • यासंदर्भात “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव याबाबत गेले 8 महिने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी याबाबतचा लेखी खुलासा मागितला होता. हा खुलासा देताना महाआयटीने सध्याची स्पष्टता दर्शवली आहे. त्यामुळे लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे.
 • दरम्यान, राज्यात होऊ घातलेली मेगा भरती ही “महापोर्टल’मध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर थांबवण्यात आली होती. त्यामुळे लाखो तरुण चिंतेत होते. या भरतीसाठी नवीन कंपनी निवडीचे काम “महाआयटी’कडे देण्यात आली आहे. ही कंपनी निवड जवळपास एक वर्षांपासून प्रलंबित आहे.
 • यासाठीच “मनविसे’ने यापूर्वी त्यांनी महाआयटी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर महाआयटीने त्यांना लेखी खुलासा देत पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
आम्ही राज्य सरकारला भरती करण्यापासून थांबवलेलं नाही : सर्वोच्च न्यायालय

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देत राज्य सरकारला पुन्हा दणका दिला आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा परिणाम सरकारी नोकरभरती होत असल्याचं मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांनी सांगितलं असता आम्ही राज्य सरकारला नियुक्या करण्यापासून थांबवलेलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र नियुक्त्या करताना या कायद्यात करु नये असं कोर्टानं म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली होती. या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. अजूनही सुनावणी सुरु असून वकील आपला युक्तिवाद खंडपीठासमोर करत आहेत. आज स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. जानेवारीच्या अंतिम आठवड्यात यावर निर्णय घेऊ, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणावर राज्य सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी म्हणाले की, राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्यासाठी स्वतंत्र एसईबीसी वर्ग तयार करू त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनुसारच मुंबई उच्च न्यायालयानं हा कायदा योग्य ठरवला होता, असं रोहतगी म्हणाले. आधीच्या खंडपीठाने दिलेली स्थगिती कशी योग्य नाही हे सांगण्याचा प्रयत्न करताना रोहतगी म्हणाले की, सहसा घटनापीठाकडे जाताना कुठला अंतरीम निर्णय दिला जात नाही, पण या केसमध्ये तो दिला. हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना त्रिसदस्यीय पूर्णपीठाला अंतरिम आदेश देण्याची गरज नव्हती, प्रकरण तसंच घटनापीठापुढे वर्ग करायला हवं होतं,असं रोहतगी म्हणाले.

‘एसईबीसी’ वगळून तीन विभागांची पदभरती ! 50 टक्‍के पदभरतीस मान्यता

Mega Bharti 2021 – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगाभरती, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसईबीसी’चा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला. आता मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदांची भरती करतानाही हा फॉर्म्यूला वापरला जाणार आहे. तिन्ही विभागात एकूण दहा हजारांपर्यंत पदांची भरती केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
मेगाभरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे. एसईबीसी’ प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे या विभागातील रिक्‍त पदांसाठी ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून अर्ज केले आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करुन दिला जाणार असल्याचेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांमधील नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही. राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या आता सव्वादोन लाखांवर पोहचली आहे. त्यापैकी अत्यावश्‍यक असलेल्या तीन विभागांमधील 50 टक्‍के पदांची भरती प्रक्रिया आता 15 दिवसांत सुरु केली जाणार आहे.

 • राज्यातील 29 सरकारी विभाग व जिल्हा परिषदांमध्ये तब्बल सव्वादोन लाख रिक्‍त पदे
 • गृह, सार्वजनिक आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या 46 हजारांवर
 • वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यात 10 ते 12 हजार पदांची होईल भरती
 • ‘एसईबीसी’ प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदांची होणार पदभरती; आरक्षणाच्या अंतरिम निर्णयानंतर होईल बदल
 • सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल, सार्वजनिक आरोग्य व पोलिस विभागांची पदभरतीच्या दृष्टीने सुरु केली तयारी

मागील अपडेट : – Police Bharti 2021 is expected soon under the mega bharti. As per the details 2021 Bharti process of the this recruitment will complete before December. More respective updates & details will be declared Soon. We will updates More latest news about this on same page.

८ जुलै २०२० अपडेट – सरकारचा निर्णय १० हजार पोलिस पदांची भरती लवकरच सुरु होणार

मेगा भरती २०२१ – प्राप्त बातमी नुसार, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत, विविध सरकारी विभागांतील 70,000 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हि नवीन मेगा भरती महापोर्टल द्वारे न घेता, नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्या विभागांमध्ये किती जागा रिक्त आहेत याचा तपशील खालील तक्त्यामध्ये. या भरती विषयी अपडेट्स आम्ही महाभरतीवर प्रकाशित करत राहू.

विभागाचे नाव रिक्त जागा
ग्रामविकास विभाग 11,000 जागा
गृह विभाग 7111 जागा
कृषी विभाग 2500 जागा
पदुम विभाग 1047 जागा
सार्वजनिक बांधकाम विभाग 8330 जागा
जलसंपदा विभाग 8220 जागा
जलसंधारण विभाग 2433 जागा
नगरविकास विभाग 1500 जागा
आरोग्य विभाग 10,560 जागा

 

Megabharti is expected to start From 20th April 2021. More details about this Mega Bharti registration process & Online application Process are given below. This Year in 2021 the megabharti will be conducted For various departments like Aarogya Vibhag, Jal Sampada Vibhag, Krushi Vibhag, Pashu Savrdhan Vibhag, Van Vibhag, Mahila Balvikas Vibhag, Gruh Vibhag & Many More.

राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. इतकंच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश अर्थखात्याने दिले आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अजित पवार यांच्या अर्थखात्याने कडक पावलं उचलली आहेत. (Maharashtra government Big financial decisions)

आरोग्य विभाग सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात रखडलेली 72 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र कोरोना संकटामुळे ही भरती रखडली आहे. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थविभागाने दिले आहेत.

कोरोना मुळे आता तलाठी भरती कधी ?

 

23 March 2021 Megabharti 2021 Update

राज्यातील बेरोजगारांना सरकारी सेवेत समाविष्ट करुन घेण्यासाठी सरकारने एक लाख एक हजार पदांच्या महाभरतीचे नियोजन केले. त्यानुसार महाआयटीतर्फे 30 मार्चपर्यंत इच्छूक कंपन्यांकडून निवीदा मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली. इच्छूक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत 20 मार्चला बैठक आयोजित केली होती. परंतु, कोरोनामुळे आता ती बैठक 26 मार्चला होणार असून त्यामुळे महाभरतीचे नियोजन महिनाभर पुढे गेल्याची माहिती महाआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मिंत्रानो, या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आम्ही महाभरती वर रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करू. या मध्ये पुढील सर्व परीक्षेसाठी अपेक्षित प्रश्न समाविष्ट केलेलं असतील. तेव्हा www.MahaBharti.in ला रोज भेट द्या आणि महाभरतीची तयारी करा. 

पाच कंपन्यांद्वारे होणार महाभरती 

ज्या कंपन्यांनी एका भरतीवेळी एक लाख उमेदवारांची भरती केली आहे आणि मागील तीन वर्षांत किमान 10 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी व भरती राबविलेल्या कंपन्यांचीच नियुक्‍त महाराष्ट्रातील शासकीय महाभरतीसाठी निवड केली जाणार आहे. महाभरतीसाठी किमान पाच कंपन्यांची (एजन्सी) निवड केली जाणार आहे. त्यानंतर शासनाच्या प्रत्येक विभागांनी त्यांच्या रिक्‍त पदांच्या भरतीसाठी किमान दोन कंपन्या निश्‍चित करुन त्यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबवायची आहे. महाआयटीने निश्‍चित केलेल्या कंपन्या रिक्‍त पदांच्या भरतीसाठी निवडण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहे. नियुक्‍त केलेल्या कंपन्यांची मुदत पाच वर्षे असणार आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात 72 हजार रिक्‍त पदांच्या मेगाभरतीची घोषणा झाली. मात्र, त्याला मूर्त स्वरुप न मिळाल्याने राज्यातील तब्बल 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांना अर्ज करुनही परीक्षेची वाट पहावी लागली. आता महाविकास आघाडी सरकारने शासकीय रिक्‍त पदांची महाभरती एप्रिलपासून सुरु करण्याचे नियोजन केले. मात्र, राज्यातील कोरोनाच्या विळख्यामुळे ही प्रक्रिया आता मेपासून सुरु होईल. तत्पूर्वी, महाआयटीच्या माध्यमातून पाच कंपन्या निश्‍चित केल्या जाणार असून त्यासाठी पुणे, नाशिक, मुंबई व दिल्ली येथून सहा कंपन्या इच्छूक असल्याचे महाआयटीकडून सांगण्यात आले. जमाव बंदी आणि रेल्वे, विमान वाहतूक बंद असल्याने त्यांची बैठक लांबणीवर पडली आहे. 26 मार्चला होणाऱ्या बैठकीनंतर इच्छूक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले जाणार असून निवीदेच मुदत आता 7 एप्रिलपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शासकीय महाभरतीसाठी असणार पाच कंपन्या 

राज्यातील शासकीय महाभरतीसाठी पाच कंपन्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी इच्छूक कंपन्यांकडून निवीदा मागविण्याची मुदत 30 मार्चपर्यंत आहे. परंतु, कोरोनामुळे त्याला आता सात दिवसांची मुदतवाढ दिली जाईल. कोणत्या कंपन्यांमार्फत रिक्‍त पदांची भरती करायची, याचा अधिकार संबंधित शासकीय विभागाकडे राहणार आहे.
– महेश असोलकर, प्रकल्प अधिकारी, महाआयटी, मुंबई


16 March 2020 Update : राज्यातील रिक्त पदांसाठी मेगाभरतीची २० एप्रिल पासून सुरुवात होणार असून, त्यासाठी १ लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र या मेगाभरातीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन देऊन परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल असेही स्पष्ट केलं.

15 March 2020 Update – राज्यातील शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे. थेट जनतेशी संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासकीय मेगाभरतीची तारीख निश्‍चित झाली असून 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्‍त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होणार आहे. एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या महत्वाच्या मेगा भरती खाली दिलेल्या आहेत.

MegaBharti 2020

Following Update on 14 March 2020

Maha Bharti by Offline Only

राज्यात मोठ्या प्रमाणात शासकीय विभागांमध्ये विविध पदे रिक्त आहेत. सरकारने लवकरच मेगा भरती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. भरतीची तयारी सुरू असून या भरतीची तारीख निश्चित झाली आहे. 20 एप्रिलपासून राज्य सरकारमधील रिक्त पदांसाठी मेगभारती होणार आहे. त्यासाठी, 1 लाख 6 हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या मेगाभरतीवर आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना यापुढील भरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीटकरून माहिती दिली आहे. “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसे सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून साधारण 2 लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या भरतीला 20 एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

‘महापोर्टल’च्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेबाबत मोठ्या प्रमाणत नाराजी होती. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन भरतीचे स्पष्ट केले, असे रोहित पवार यांनी सांगितले. या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक बाबी…

 1. मेगाभरतीनंतर राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी द्यावे लागणार नऊ हजार कोटी
 2. सामान्य प्रशासन (जेईडी) विभाग ठरविणार 10 एप्रिलपर्यंत शासकीय मेगाभरतीचे नियोजन
 3. शासकीय रिक्‍त पदांच्या भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत महाआयटीतर्फे नियुक्‍त केली जाणार खासगी एजन्सी
 4. महापरीक्षा पोर्टलकडील 35 लाख विद्यार्थ्यांचा डाटा महाआयटीला सुपूर्द
 5. गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी व पशुसंवर्धन, महसूल विभागातील सर्वाधिक पदांची भरती

Department Wise Mega Bharti Vacancy Details 

विभागाचे नाव रिक्त जागा
ग्रामविकास विभाग 11,000 जागा
गृह विभाग 7111 जागा
कृषी विभाग 2500 जागा
पदुम विभाग 1047 जागा
सार्वजनिक बांधकाम विभाग 8330 जागा
जलसंपदा विभाग 8220 जागा
जलसंधारण विभाग 2433 जागा
नगरविकास विभाग 1500 जागा
आरोग्य विभाग 10,560 जागा

 

तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन 72 हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील 34 लाख 82 हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे अर्ज केले. मात्र, मेगाभरतीला प्रत्यक्षात मुहूर्त लागलाच नाही आणि विद्यार्थ्यांची तब्बल 130 कोटींहून अधिक रक्‍कम अडकून पडली. आता महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करुन खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया युध्दपातळीवर पूर्ण केली जात आहे. महाआयटी विभागातर्फे ‘आरएसपी’ (रिक्‍वेस्ट ऑफ प्रपोजल) प्रसिध्द केली जाणार असून देशातील एका सक्षम अशा एजन्सीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगाभरतीसाठी एक एजन्सी नियुक्‍ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिध्द केले जाणार आहे. त्यामध्ये महाभरतीची प्रक्रिया कशी राहणार, त्यावर नियंत्रण कोणाचे असणार याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

For More Updates keep vising MahaBHarti.in 

महापोर्टल बंद
नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या पोर्टलविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलानाचे नेतृत्व करीत हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने २१ फेब्रुवारी रोजी घेतला असून तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. महाआयटीकडे ऑफलाइन पद्धतीने चाचणी, टंकलेखन आदी परीक्षा घेण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Mega Bharti 2021 Details

Mega Bharti 2021 – Maha Vikas Aghadi Government announced that the recruitment process For 70,000 vacancies will be carried in all the departments of Maharashtra government. All vacancies available in all the government sector issues discussed in Ministers Meeting and then they decided to start Mega Bharti through Private agencies in all over Maharashtra.

Post Details under MegaBharti 2021 

Name of Department Name of Posts
Krushi Vibhag Krushi Seva Varg 1,2, Krushi Sahayak, Krushi Paryavekshak
PashuSanvardhan Vibhag Sahayak Ayukt, Pashusanvardhan, Pashudhan Paryavekshak, Parichar
Sarvajanik Arogya Vibhag Vaidyakiy Adhikari Group-A, Group-B (All Posts directly related to medical services), Group-C (All Posts directly related to medical services), Group-D (All Posts directly related to medical services)
Gruh Vibhag Deputy superintendent of police, Police Sub-inspector, Senior Gupt Varta Adhikari, Sahayak Gupt Varta Adhikari, Police Shipai
Sarvajanik Bandhakam Vibhag Sahayak Abhiyanta Class-2 (Sthapatya), Kanishth Abhiyanta (Sthapatya)
Vitt Vibhag Sahayak Sanchalak, Kanishth Lekhapaal
Mrud v Jalsandharan Vibhag Sahayak Abhiyanta Class-2 (Sthapatya), Kanishth Abhiyanta (Sthapatya)
Dugdhvikas Vibhag Abhiyantriki Group (Kanisht)
Dugdhvikas-Abhiyantriki Group, Dugdhsanvardh, Praran, Dugdhshala aani krushi paryavekshak, Dugdhsankalan Vikas Adhikari aani tantradnya
Matsyavyavsay Vibhag Sahayak Ayukt, Matsyavyavsay Vikas Adhikari, Sahayak Matsyavyavsay Vikas Adhikari
Gram Vikas Vibhag Ayurvedik Vaidya, Vaidyakiy Adhikari Class-3, Avaidyakiy Paryavekshak, Unani Hakim, Krushi Adhikari, Kanishth Abhiyanta, Vistar Adhikari Class-2, Vistar Adhikari Class-3, Sathrog Vaidyakiy Adhikari, Sarv. Arogya Parichar, Vistar Adhikari, Gramvikas Adhikari, Arogya Paryavekshak, Aushadh Nirmata, Prayogshala Tantradnya, Kushthrog Tantradnya, Arogya Sahayyak, Arogya Sevak, Arogya Sevika, Arogya Sahayyak (Female), Vistar Adhikari (krushi), Sthapatya Abhiyantriki Sahayak, Sahayak Pashudhan Vibhag Adhikari, Pashudhan Paryavekshak, Prayogshala Sahayak, Paryavekshika, Kanishth Abhiyanta, Jilha Sarv. paricharika, Vistar Adhikari (Aayu), Prashikshit Dae, Vikas Seva Group-C, Group-D, Gram Sevak

 

Age Limit for Mega Bharti 2021

Age Limit Details For the MahaBharti are given below. The Open & Reserve category details are given below.

Age Limit For Mega Bharti 2021
Open Category 18 to 38 Years
Reserved Category 18 to 43 Years

 

FAQs : 

When Mega bharti is Starting?

Mega Bharti in Maharashtra is Expected Very Soon. The Police Bharti which is the part of mega bharti is expected very Soon for more than 12000 Posts. This year Large number of candidates are waiting for the Mega Bharti.

Which Recruitment are under Mega Bharti? 

Under the Mega Bharti various recruiments are expected like Police Bharti, Gram Vikas Vibhag, Jalsandharan Vibhag, Krushi Vibhag, PashuSanvardhan Vibhag, Gruh Vibhag.

What will be Age Limit for Mega Bharti 2021? 

As per previous year record this year expected age criteria is 18 to 38 Years. Also 5 Year relaxation for reserved categories.

Table of Contents


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
 1. Parimita Gaikwad says

  Maze b.com Zale she tri mala banking field madhle jobs multil la?

 2. Ali mulla says

  कोरोना व्हाईरस मुळे भरती बंदी आणली आहे परंतु काही मुले एक जून नंतर वयातून एजबार होणार आहेत तरी जे एजबार होणार आहेत त्यांना पण वयातून सवलती मिळाव्यात तरी ते सरकारी नोकरी ला मुकणार नाहीत एवढेच शासन दरबारी विनंती करण्यात यावी

 3. Archana kamble says

  Staff nurse bharti kdhi ahe

  1. MahaBharti says

   Lavkch NHM antargat Staff Nurse Bharti, Doctor, Dataentry Operators, XRAY Tech Ward Boy, Clerk & Other Posts sathi Suru Honar aahe.. CORONA mule 25000 jagansathi in All over Maharashtra

 4. Akash tunge says

  Advertisement kontya mahinath prasiddha hoil

 5. Akash tunge says

  Advertisement kontya mahinath prasiddha hoil

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड