MPSC महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ – लिपिक टंकलेखक गुणवत्ता यादी उपलब्ध-डाउनलोड करा  !! | MPSC Group C Result 2026

MPSC Group C Exam Result

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ – लिपिक टंकलेखक – सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट – डाउनलोड करा 


जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ – लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

पात्र उमेदवारांची – डाउनलोड करा 


एमपीएससीच्या गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४च्या ‘लिपिक-टंकलेखक’ संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, उमेदवारांना आता त्यांच्या गुणांसह स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (जाहिरात क्र. ११८/२०२५) या संवर्गाचा अंतिम निकाल ८ जून २०२६ रोजी जाहीर केला. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना त्यांच्या खात्यातील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ पर्यायातून गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीसाठी (Retotalling) अर्ज करण्याकरिता आयोगाकडून वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

MPSC Group C Exam Result

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५’च्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आयोगाने हा निकाल जाहीर केला. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अधिकृत संकेतस्थळावर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ – तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

1014/2026Advt.No. 014/2026 Maharashtra Group C Services Main Examination 2025 – Technical Assistant – Merit List25-08-2026pdficon
2014/2026Advt.No. 014/2026 Maharashtra Group C Services Main Examination 2025 – Industry Inspector – Merit List25-08-2026pdficon

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपीक-टंकलेखक पदांचा निकाल 11/07/2025 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. त्यानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मागणीवरून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयास प्राप्त झाली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची वयोमर्यादा, शैक्षणिक व टंकलेखन अर्हता तसेच आवश्यक प्रमाणपत्रे तपासणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या एकूण 24 उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार असून, यादीतील उमेदवारांना यासाठी उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.

 

महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा २०२३ लिपिक-टंकलेखक – शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी

 

 

 


 

MPSC Group C Mains Exam  2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ०१ जून, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ चा निकाल दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर निकालाद्वारे मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२. प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

३. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
४. मुख्य परीक्षा दिनांक २१ सप्टेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल.
५. प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
६. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
७. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

 

या लिंक वर निकाल चेक करा 

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड