MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला अशी उमेदवारांची आर्त मागणी! – Postpone MPSC Exam!
Postpone MPSC Exam!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या आयोजनावर सध्या प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. ईडब्ल्यूएस (EWS) आणि एसईबीसी (SEBC) या आरक्षण प्रवर्गांतील तांत्रिक त्रुटीमुळे हजारो पात्र उमेदवार अजूनही अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे ही परीक्षा किमान १५ दिवस पुढे ढकलावी, अशी एकमुखी मागणी परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ७,००० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, आजवर केवळ २,००० विद्यार्थीच अर्ज करू शकले आहेत. उर्वरित उमेदवार प्रवर्ग बदलण्याच्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करू शकलेले नाहीत. सर्वात मोठी अडचण म्हणजे ‘ईडब्ल्यूएस ते एसईबीसी’ किंवा ‘एसईबीसी ते ओबीसी’ अशा प्रवर्गांमध्ये ऑनलाइन अर्जात बदल करण्याची लिंकच MPSC ने उपलब्ध करून दिलेली नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
१२ मार्च रोजी जाहीर झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या निकालात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने २९ मार्च रोजी सुधारित निकाल प्रसिद्ध केला. या नवीन निकालामुळे ३१८ नवीन उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र, सुधारित प्रवर्ग लक्षात घेऊन अर्ज करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल अजूनही केले गेले नाहीत.
उमेदवारांनी स्पष्ट सांगितले की ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असल्यामुळे आयोगाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा. उमेदवारांना प्रवर्ग बदलण्याची सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिली जावी आणि परीक्षेची तारीख किमान १५ दिवसांनी पुढे ढकलण्यात यावी. अन्यथा, अनेक पात्र उमेदवार या महत्त्वपूर्ण परीक्षेत सहभागी होण्यापासून वंचित राहतील.
या मागणीसाठी राजकीय स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. काही लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे विद्यार्थ्यांची बाजू मांडली आहे, मात्र अद्याप MPSC कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
उमेदवारांनी असा इशारा दिला आहे की, जर लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे वेळेवर योग्य निर्णय घेणे ही MPSC ची जबाबदारी आहे, असं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं आहे.