MPSC DigiLocker Application Process – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जासोबत द्याव्या लागणाऱ्या प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी आता डिजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यःस्थितीत ‘एमपीएससी’च्या प्रचलित पद्धतीला पर्यायी व्यवस्था म्हणून डिजिलॉकर प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डिजिलॉकर प्रणालीच्या स्वीकारामुळे उमेदवारांसाठी अर्जप्रक्रिया आता सुलभ होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. ‘MPSC’च्या पदभरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज भरतेवेळी विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची छाननी, तपासणी करून उमेदवारांची पात्रता निश्चित केली जाते. आता या कार्यपद्धतीला पर्यायी व्यवस्था म्हणून डिजिलॉकरचा वापर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, ‘MPSC ‘ने उमेदवारांना कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

उमेदवाराने सर्वप्रथम DigiLocker खाते तयार करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी उमेदवाराकडे आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
1) DigiLocker साठी नोंदणी करण्याची पहिली पायरी कोणती? उमेदवाराने प्रथम https://accounts.digilocker.gov.in/ या संकेतस्थळावर जावे. त्यानंतर “Sign Up” या पर्यायावर क्लिक करावे.
2) DigiLocker साठी नोंदणी करण्याची दुसरी पायरी कोणती? Sign Up करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर टाकून 6 अंकी सुरक्षा PIN तयार करावा. त्यानंतर आधार क्रमांक टाकून Username तयार करावा, जो पुढे लॉगिनसाठी आवश्यक असेल. पडताळणीसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.
3) DigiLocker साठी नोंदणी करण्याची तिसरी पायरी कोणती? “Drive” या पर्यायाचा वापर करून उमेदवार आवश्यक कागदपत्रे, विशेषतः शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कागदपत्रे, अपलोड व सुरक्षित साठवू शकतो.
MPSC DigiLocker Process Marathi Steps अशी असेल प्रक्रिया
- डिजिलॉकर प्रणालीवर खाते असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या खात्याला डिजिलॉकर शी संलग्न करण्यासाठी ‘मेरी पेहचान’ संकेतस्थळावर लॉग-इन करून डिजिलॉकर खात्याची संमती घ्यावी.
- डिजिलॉकर प्रणालीवर खाते नसलेल्या उमेदवारांनी https://www.digilocker. gov.in/ या संकेतस्थळावर आधार क्रमांक किंवा त्याच्याशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक यांचा वापर करून नवीन खाते उघडून ते खाते ऑनलाइन अर्ज प्रणालीशी जोडून घ्यावे.
- डिजिलॉकर खात्यामध्ये लॉग-इन केल्यानंतर ‘इश्यूड डॉक्युमेंट्स’मध्ये प्राधिकरण, सरकारी विभाग, शैक्षणिक मंडळे, विद्यापीठे आणि इतर विश्वासार्ह संस्था यांच्याकडून जारी करण्यात आलेली आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, दहावी आणि
- बारावीची गुणपत्रके, प्रमाणपत्रे अशी कागदपत्रे उपलब्ध होतील. उपलब्ध नसलेली कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात उमेदवारांना अपलोड करता येतील.
- भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने डिजिलॉकर प्रणालीच्या वापरासंदर्भातील सूचना आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भविष्यात केवळ डिजिलॉकरचा वापर
‘आयोगाकडून आगामी काळात कोणत्याही भरतीप्रक्रियेच्या अंतिम निकालाआधारे शिफारसपात्र उमेदवारांची शिफारसपत्रे ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील खात्यासह डिजिलॉकर प्रणालीद्वारे वितरित करण्यात येतील. डिजिलॉकर प्रणालीद्वारे कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करण्याची कार्यपद्धत सद्यःस्थितीत वैकल्पिक असेल. मात्र, डिजिलॉकर प्रणालीमधील जारी केलेल्या कागदपत्रांना माहिती तंत्रज्ञान नियम, २०१६ नुसार मूळ प्रमाणपत्राप्रमाणेच वैधता असल्यामुळे आगामी काळात कागदपत्रे, प्रमाणपत्रे केवळ डिजिलॉकर प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत,’ असेही ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.
Following are the Steps to Apply for MPSC through DigiLocker. The candidate must first register for a DigiLocker account. For registration, the candidate should have an Aadhaar card and an accessible mobile number linked with Aadhaar.
1) What is the first step to register for DigiLocker?
Ans: The candidate needs to visit https://accounts.digilocker.gov.in/ Then click on the “Sign Up” option.
2) What is the second step to register for DigiLocker?
Ans: The candidate needs to enter the mobile number and set a 6-digit security PIN while signing up. After that, the candidate must enter the Aadhaar number and create a username, which will be required for login. An OTP will be sent to the registered mobile number for verification. The Aadhaar number must be linked with the mobile number.
3) What is the third step to register for DigiLocker?
Ans: In the image below, you can see the “Drive” option. The candidate can use this section to upload and store all required documents, especially educational and health-related documents.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















