MPSC दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षा-२०२१ गुणांच्या फेरपडताळणी करीताची वेबलिंक सुरु !!
MPSC Civil Judge Exam Result
MPSC Civil Judge Exam Result – Civil Judge Junior division and Judicial Magistrate First Class Main Examination 2021-Retotalling of Marks-Phase 2 Notice has been issued. Candidates who had appeared for MPSC Civil Judge Junior division and Judicial Magistrate Exam can check their retotalling of marks. Download how to check Retotalling Of MPSC :
गुणवत्तायादीतील उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी दुवा (वेबलिंक) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०२ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा – २०२१ च्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
(१) आयोगाच्या http://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.
(३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
(४) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(५) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या एक किंवा जास्त विषयाची निवड करून ‘Save’ बटणवर क्लिक करावे.
(६) निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक ८ फेब्रुवारी, २०२३ ते दिनांक १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८०० – १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.
MPSC Civil Judge Exam Result : Maharashtra Civil Judge (Junior Division) Competitive Main Examination 2021 Merit List, Provisional Selection List has been Published on Official Maharashtra PSC Website. Candidates who attended interview for Maharashtra Civil Judge Exam 2021 can check their names in below PDF
महाराष्ट्र दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) स्पर्धात्मक मुख्य परीक्षा 2021 गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी अधिकृत महाराष्ट्र PSC वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिवाणी न्यायाधीश परीक्षा 2021 साठी मुलाखतीला उपस्थित असलेले उमेदवार खाली PDF मध्ये त्यांची नावे पाहू शकतात. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२१ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
- सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे यांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
- प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या http://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक १८ जानेवारी, २०२३ रोजी १५.०० वाजेपासून दिनांक २४ जानेवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
- ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब /निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
- भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणा-या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.
- भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NOT CONSIDERED FOR FINAL SELECTION