JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! MPSC देणार खासगी क्षेत्रात करिअरची नवी संधी!! – MPSC Aspirants Private Job Opportunity 2026

MPSC Aspirants Private Job Opportunity 2026

MPSC स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्पर्धा परीक्षांची अनेक वर्षे तयारी करूनही सरकारी नोकरी हुकणाऱ्या गुणवंतांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना खासगी उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग क्षेत्राशी समन्वय साधला जाणार असल्याची घोषणा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बाळगेकर-देशमुख उपस्थित होत्या.

सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांची संख्या मर्यादित असल्याने मोठ्या संख्येने गुणवंत उमेदवार अंतिम टप्प्यात मागे पडतात. मात्र, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची बौद्धिक क्षमता व गुणवत्ता उच्च दर्जाची असते. अशा उमेदवारांचे कौशल्य खासगी उद्योगांपर्यंत पोहोचवून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आयोग करणार असल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले. यासाठी उद्योग संघटनांशी समन्वय साधला जाणार असून, उमेदवारांच्या संमतीनंतरच त्यांची माहिती संबंधित कंपन्यांना उपलब्ध करून दिली जाईल. उद्योगांना आवश्यक वाटल्यास उमेदवारांना अतिरिक्त कौशल्य प्रशिक्षण (स्किलिंग) देण्यात येईल. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्पर्धा परीक्षांसाठी अनेक तरुण पाच ते सात वर्षे मेहनत घेतात. अंतिम निवड न झाल्यास त्यांच्या करिअरसमोर मोठे प्रश्न निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर गुणवंत उमेदवारांचे ज्ञान आणि क्षमता वाया जाऊ नये, तसेच त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले.
हा पर्याय पूर्णपणे ऐच्छिक असेल. उमेदवारांच्या संमतीशिवाय त्यांची माहिती कोणत्याही उद्योगाला दिली जाणार नाही. सरकारी सेवेत प्रवेशाचे स्वप्न कायम ठेवतानाच खासगी क्षेत्रातही सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड