उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘CET’ पुन्हा पुढे ढकलल्या
MHT-CET 2020 Revised Exam Dates
MHT-CET Exam Dates : विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांशी क्लॅश होत असल्याने सीईटी कक्षाने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या आहेत…
MHT-CET Revised Dates 2020: सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी झाल्यानंतर आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता ऑक्टोबर मध्ये तारखांत पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.
राज्यात विद्यापीठांच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होत असून साधारण २१ ऑक्टोबपर्यंत या परीक्षा आहेत. सध्या पुनर्परीक्षार्थीच्या (बॅकलॉग) परीक्षा सुरू आहेत. याच दरम्यान परीक्षा नियमन प्राधिकरणानेही प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. प्रवेश परीक्षा द्यावी की, अंतिम वर्षांची परीक्षा द्यावी, अशा पेचात प्रवेशोत्सुक विद्यार्थी सापडले असल्याची तक्रारही प्राध्यापक संघटनेने केली होती. या मुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठ दिवसात पुन्हा तारखा बदलाव्या लागल्या आहेत. या प्रवेश परीक्षांबाबत अधिक माहिती www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षाचे सुधारित वेळापत्रक
- एमपीएड – ३ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ४ ते ७ ऑक्टोबर — २९ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर
- एमएड – ३ ऑक्टोबर — ५ नोव्हेंबर
- बीएड/एमएड सीईटी – १० ऑक्टोबर — २७ ऑक्टोबर
- एलएलबी ( पाच वर्षे) – ११ ऑक्टोबर — ११ ऑक्टोबर
- एलएलबी (तीन वर्ष) –२ आणि ३ नोव्हेंबर
- बीपीएड – ११ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट १२ ते १६ ऑक्टोबर — ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर
- बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड – ११ ऑक्टोबर — १८ ऑक्टोबर
- एम-आर्च सीईटी – ३ ऑक्टोबर — २७ ऑक्टोबर
- एम- एचएमसीटी – ३ ऑक्टोबर –२७ ऑक्टोबर
- एमसीए – १० ऑक्टोबर — २८ ऑक्टोबर
- बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर — १० ऑक्टोबर
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MHT-CET 2020 Revised Exam Dates | |
PDF जाहिरात : https://bit.ly/36hwfom | |
अधिकृत वेबसाईट : http://cetcell.mahacet.org/ |
सोर्स : म. टा.
MHT-CET Exam Dates : MHT-CET 2020 Revised Exam Dates : MAH AAC CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखा सीईटी कक्षाने जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MAH AAC CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर cetcell.mahcet.org येथे हे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, ही प्रवेश परीक्षा १७ आणि १८ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत ही परीक्षा होईल. फाइन आर्ट आणि अप्लाइट आर्टच्या यूजी अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी परीक्षा घेतली जाते.
कोविड-१९ विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षा (ऑब्जेक्ट ड्रॉइंग, डिझाइन प्रॅक्टिकल, मेमरी ड्राइंग आणि जनरल नॉलेज) ५० टक्के विद्यार्थ्यांसाठी १७ ऑक्टोबर रोजी तर ५० टक्के विद्यार्थ्यांसाठी १८ ऑक्टोबर रोजी होईल.
MAH AAC CET 2020 चे अॅडमिट कार्ड १ ऑक्टोबर रोजी उपलब्ध केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याविषयीची तपशीलवार माहिती आणि लिंक लवकरच सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर देण्यात येईल.
महाराष्ट्र सीईटी कक्षाच्या संकेतस्थळ – http://cetcell.mahacet.org/
MAH AAC CET 2020 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक – https://bit.ly/3iUmujk
MHTCET 2020 Revised Exam Dates : MHTCET New Exam Dates : MHT-CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर झाल्या आहेत…
MHTCET New Exam Dates : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. करोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या.
राज्याच्या सीईटी परीक्षा १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा २० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. फिजिक्स-केमिस्ट्री-बॉयोलॉजी म्हणजेच PCB ग्रुपची सीईटी १ ते ९ ऑक्टोबर २०२० (३ ऑक्टोबर वगळून) या कालावधीत होईल तर फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथेमॅटिक्स म्हणजेच PCM ग्रुपची सीईटी १२ ते २० ऑक्टोबर २०२० (१७ आणि १८ ऑक्टोबर वगळून) होणार आहे.
सीटीईच्या तारखा पुढीलप्रमाणे – MHT-CET 2020 Revised Exam Dates
ग्रुप – तारीख
- PCB – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
- PCM – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०
अॅडमिट कार्डची लिंक आणि अन्य सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना लवकरच सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.
MHT-CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखांचे परिपत्रक – https://maharashtratimes.com/photo/78019628.cms
सीईटी सेलच्या संकेतस्थळ – http://cetcell.mahacet.org/
सोर्स : म.टा.
जुलै महिन्याच्या ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० व ३१ या तारखांना एमएचटीसीईटी होईल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ आॅगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळेल. प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मार्च महिन्यातील सीईटी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्ब्ल ५ लाख २४ हजार ९०७ अर्ज आले होते. त्यानंतर आता पुन्हा अर्ज भरण्याची लिंक ओपन केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत वाढ होणार असल्याची माहिती सीईटीचे सुभाष महाजन यांनी दिली. त्याशिवाय, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाची जहाजे व विमानेही मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दोन्ही गटांच्या परीक्षा होणार वेगळ्या
सीईटीच्या नियमांप्रमाणे पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा वेगळ्या होतील. परीक्षा ज्या केंद्रावर होतील त्या केंद्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
Sir vet time table and holl ticket
Hollticket kuthe available aahe
MSBT che timetable kdhi yenar
yenar
Sir law cet 5year ki date 24 July hai laikin jo notice aai us me toh yeh date nahi dekhai deri naa