MHT CET 2021 चा पेपर पॅटर्न जाहीर; जाणून घ्या!!

MHT CET 2021 Exam Pattern

MHT CET 2021 Exam Pattern Released

MHT CET Exam : The Maharashtra State Common Entrance Test Cell has made available the brochure of MHT CET 2021 on its website. The cell has released the examination pattern on the website https://cetcell.mahacet.org/.

MHT CET 2021 चा पेपर पॅटर्न जाहीर; जाणून घ्या!! सीईटी कक्षाने एमएचटी सीईटी २०२१ चा परीक्षा पॅटर्न पीसीएम आणि पीसीबी दोन्ही ग्रुप साठी जाहीर केला आहे. याव्यतिरिक्त परीक्षेत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक मूल्यांकन असणार नाही.

महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने MHT CET 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार ७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र सीईटी २०२१ संबंधी महत्त्वपूर्ण तपशीलही जारी करण्यात आला आहे. परीक्षेचा प्रकार, कालावधी, विचारले जाणारे प्रश्न, प्रश्नांची एकूण संख्या यासह अनेक माहिती तपशीलवार देण्यात आले आहे. जे उमेदवार परीक्षा अर्ज भरत आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात. एमएचटी सीईटी 2021 परीक्षा कॉम्प्युटर आधारित असणार आहे.

कक्षाने एमएचटी सीईटी २०२१ चा परीक्षा पॅटर्न पीसीएम आणि पीसीबी दोन्ही ग्रुप साठी केला आहे. याव्यतिरिक्त परीक्षेत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक मूल्यांकन असणार नाही. उमेदवारांनी याकडे लक्ष द्यावे की MHT CET च्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या पेपरची काठिण्य पातळी जेईई मेन प्रमाणे असेल. तर जीवशास्त्राच्या परीक्षेची पातळी नीट परीक्षा २०२० प्रमाणे असेल. यासह एमएचटी सीईटी 2021 च्या प्रश्नपत्रिकेत विचारले जाणारे प्रश्न मुख्यत्वे अॅप्लिकेशन बेस्ड असतील.

MHT CET Paper Pattern

विषय — प्रति प्रश्न गुण – एकूण गुण – कालावधी

 • भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र — १ – १०० – ९० मिनिटे
 • गणित – २ – १०० – ९० मिनिटे
  (साधारणपणे १० प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमातून तर ४० प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमातून विचारले जाण्याची शक्यता असते.)

 MHT-CET 2021 Registration Process

MHT CET Exam – After the cancellation of Class XII examination, the State Common Entrance Examination Board has started registration of MHT-CET for admission in Engineering, Pharmacology and Agriculture. Further details are as follows:-

MHT-CET च्या नोंदणीस सुरुवात; अर्ज प्रक्रियेस एक महिन्याची मुदत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. मात्र आता ही नोंदणी सुरू झाली आहे…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर प्रवेश परीक्षा कक्षाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून नोंदणी प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस १ महिन्याची मुदत आहे.

एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतर ८ ते १० दिवसांनी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए-बीएड, एमए-एमएड, फाइन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहिती कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. नोंदणीसाठी कक्षाच्या www.mahacet.org या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


MHT CET 2020 Round 2 Seat Allotment Result Announced

MHT CET Exam – MHT CET 2020 Round 2 Seat Allotment Result Announced- महाराष्ट्र सीईटी कक्षाने MHT CET 2020 च्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर केली. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर हा सीट अलॉटमेंट निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार cetcell.mahacet.org वर जाऊन आपल्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतात.

समुपदेशनाची वेबसाइट www.fe2020.mahacet.org वर जाऊन देखील सीट अलॉटमेंट निकाल पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख ही माहिती देऊन लॉगइन करावे लागेल.

ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरी प्रवेश मिळाला आहे त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ३० जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

दुसऱ्या फेरीचा निकाल डाऊनलोड कसा कराल?

 • – fe2020.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • – CAP II seat allotment status या पर्यायावर क्लिक करा.
 • – तुमचा अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करा.
 • – MHT CET 2020 counselling ची सीट अलॉटमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल.
 • – अॅडमिशन अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भाकरिता प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

mht cet 2020 provisional merit list for b.tech, b. pharma, mba mms courses released on mahacet org :MHT CET 2020 Provisional Merit List –  महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) ने MHT CET 2020 ची B.Tech, B. Pharma/ Pharma D अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट शनिवारी जाहीर केली. महाराष्ट्र आणि ऑल इंडिया उमेदवारांसाठी ही मेरिट लिस्ट सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

mahacet.org या सीईटी सेलच्या वेबसाइटवर ही यादी उमेदवार पाहू शकतील. स्टेप बाय स्टेप कशी पाहायची ही मेरिट लिस्ट पाहा –

 • – सीईटी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर mahacet.org वर जा.
 • – होम पेजवर B.E/B.Tech लिंकवर जा.
 • – प्रोविजनल मेरिट लिस्ट आता स्क्रीनवर दिसू लागेल.
 • – विद्यार्थी आता MHT CET पर्सेंटाइलनुसार तयार केलेल्या या यादीत स्वत:चे नाव पाहू शकतील.

बीई / बीटेकची अंतिम गुणवत्ता यादी ६ जानेवरा २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. MBA अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी ७ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार आहे. अॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ४ जानेवारी रोजी जाहीर होईल.

MHT CET 2020 Provisional Merit List of B.Pharma/ Pharma D पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/3n9e3BM

MHT CET 2020 Provisional Merit List for B.E/ B.Tech Courses पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/3pHoUou


MHT CET Exam : syllabus of mht cet for 2021 announced by CET cell – राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या एमएचटी सीईटी २०२१चा सिलॅबस (MHT CET Syllabus 2021) जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने कमी केलेल्या सीलॅबसवर यंदाची परीक्षा होणार आहे. सीईटी परीक्षेत २० टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर, तर बारावीच्या ८० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रश्नांची काठिण्यपातळी ‘जेईई मेन्स’ आणि ‘नीट’ परीक्षेप्रमाणे राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षांचे सीलॅबस जाहीर करण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या; तसेच ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानुसार हा २५ टक्के अभ्यासक्रम वगळून उर्वरित ७५ टक्के सीलॅबसवर परीक्षा होणार आहे.

परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही; तसेच संपूर्ण परीक्षा एमसीक्यू प्रश्नांवर परीक्षा होणार आहे. पीसीएम गटाची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्‌स, अशा विषयांवर, तर पीसीबी गटाची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा विषयांवर होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण सीलॅबस सीईटी सेलच्या www.mahacet.org वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

एमबीए, एमसीएचाही सीलॅबस जाहीर

सीईटी सेलने एमएचटी सीईटीसोबतच एमबीए, एमसीए, एम-एचएमसीटी, बी-एचएमसीटी, एम-आर्च अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी परीक्षांचे सीलॅबस जाहीर केला आहे. त्याची माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.


MAH MBA, MMS CET 2020: MHT CET Exam – महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने फुल टाइम एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संलग्न आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एमएएच एमबीए (MAH MBA), एमएमएस सीईटी (MMS CET) च्या तारखांनुसार, उमेदवार २५ डिसेंबर पर्यंत अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करू शकतात आणि प्रमाणपत्र अपलोड करू शकतात.

महाराष्ट्र राज्य सीईटी सेल २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२० या कालावधी दरम्यान एमएएच एमबीए (MAH MBA), एमएमएस (MMS) प्रवेशासंबंधी तक्रार दाखल करण्याची संधी देखील देणार आहे.

‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षणांतर्गत एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरीता मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अखिल भारतीय उमेदवारी प्रकारामध्ये प्रवेशाकरीता ATMA, MAT, XAT, GMAT या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक २५/१२/२०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी देण्यात येत आहे. तसेच सदर कालावधीमध्ये इतर अन्य परिक्षेच्या विद्यार्थ्यांनाही वरील अभ्यासक्रमासाठी नोंदणीची सोय उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी सीईटीच्या http://mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी,’ असं ट्विट राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. ARUN says

  Talati post eligibility ?
  .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड