MH CET Exam: सरकारचा मोठा निर्णय, CET बरोबरच 12वीचे मार्क्सही असणार IMP
MH CET Exam
MH CET Exam
MH CET Exam : Some important changes have been in the CET Exam under the State Board of Education. Check here for more details about MH CET Exam. Further details are as follows:-
CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) आहे ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. स्वतः उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
- तसंच ज्या विद्यार्थ्यांना आले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षांप्रमाणेच पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.
- तसंच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET च्या मार्कांवर प्रवेश देण्यात येत होता.
- मात्र आता बारावीचे 50 टक्के आणि CET चे 50 टक्के अशा एकूण मार्कांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे.
- यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्वं नक्कीच वाढणार आहे असं उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.
ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटी द्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू असणार आहे.
Important Dates
- MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे.
- तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.
- महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत.
- दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती.
- त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
- त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे
CET Exam 2020 : सीईटी परीक्षार्थींसाठी ‘आयडॉल’ची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
CET Exam 2020 : सीईटी परीक्षा आणि ‘आयडॉल’ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार विधी आणि बीपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून ६, ७ व ९ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विधी, बीपीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या २, ३, ४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केल्या आहेत. याचे वेळापत्रक सीईटी सेलने २१ सप्टेंबर रोजी जाहीर केले. यानंतर ‘आयडॉल’ने अंतिम सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार सीईटी परीक्षा आणि ‘आयडॉल’ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आयडॉलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. याची दखल घेत ‘आयडॉल’ने २, ३ आणि ४ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधी व बीपीएड या सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६, ७ व ९नोव्हेंबर या दिवसांत स्वतंत्र परीक्षाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या मनविसेने मांडली होती. यानंतर ‘आयडॉल’ने या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली.
या दिवशी आयडॉलच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉम व एमए या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘आयडॉल’ने दिलेल्या [email protected] या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्रदेखील ईमेलवर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती ईमेलमध्ये द्यावी, यानुसार या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
CET Exam 2020 : ज्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे.
अतिवृष्टीसारख्या कारणांनी एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षा देण्यापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती.
राज्याती ‘पीसीबी’ गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. तर, ‘पीसीएम’ गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.सीईटीचे परीक्षा केंद्र प्रामुख्याने शहरी भागात होते. त्याचप्रमाणे शहरी भागात संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. या अनुपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत सोडले जात नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राज्य सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या गुणांची पात्रता कमी केल्याने, बारावीत कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, सीईटीपूर्वी हे विद्यार्थी पूर्वीच्या निकषाप्रमाणे अपात्र असल्याने सीईटीला अनुपस्थित राहिले. नव्या निकषानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्या परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी मिळणार आहे.सोर्स : म. टा.
Table of Contents
GANESH KALUE MORE