Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; ‘मनरेगा’ अंतर्गत बंपर भरती – MGnrega bharti 2024

MGnrega bharti 2024

MGnrega bharti 2024 –

जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. पालघर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ‘साधन व्यक्ती’ या पदाच्या एकूण 100 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील हस्तलिखीत अर्ज पालघर उपजिल्हाधिकारी ‘रोहयो’ यांच्या नावे सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्जाचा नमुना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर www.palghar.gov.in उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

पात्र उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज उपजिल्हाधिकारी रुम.नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या पत्त्यावर पाठवून द्यायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 22 जानेवारी 2024 पर्यंत आहे. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्यास ते बाद ठरवले जातील.

 

या भरतीअंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना दैनदिन तत्वावर मानधन दिले जाणार आहे. तसेच या साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असवा, तसेच उमेदवाराचे वय किमान 18, कमाल वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या उमेदवारांना 4 दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी पालघर (Palghar) जिल्हाधिकार्याल येथे उपस्थित राहावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पुढील लिंकच्या साहाय्याने जाहिरात पाहावी.

PDF Download


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड