MBBS-BDS Admissions: मेडिकलच्या 222 जागा राज्याकडेच

Medical Admissions 2020-21

Medical Admissions 2020-21 : मुंबई मेडिकल प्रवेश प्रक्रियेत (Medical Admissions 2020-21) राज्यातून केंद्रीय कोट्यातील २२२ जागा दुसऱ्या यादीनंतरही रिक्त राहिल्याने त्या पुन्हा महाराष्ट्राच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रमासोबतच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ४० जागा वर्ग करण्यात आल्या आहेत. मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या फेरीनंतर बहुतांश सरकारी तसेच पालिका रुग्णालयांतील जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र केंद्रीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने केंद्राकडून राज्यांना २०९७ जागा पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातून देण्यात येणाऱ्या एमबीबीएसच्या २२२ आणि दंतवैद्यकच्या ४० जागा राज्याकडे पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर काहींनी प्रवेश रद्द केल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे या जागा पुन्हा राज्यांना देण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले. राज्यात वर्ग करण्यात आलेल्या २२२ जागांपैकी ५९ जागा या मुंबई व ठाण्यातील कॉलेजांतील आहे. यातील २० जागा कूपर रुग्णालय, १३ लोकमान्य टिळक रुग्णालय आणि १२ नायर रुग्णालयाशी जोडलेल्या कॉलेजमध्ये आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड