मीन्स-कम-मेरिट (MCM) शिष्यवृत्तीच्या कालावधीत वाढ, जाणून घ्या
MCM Scholarship Scheme
MCM Scholarship Scheme
MCM Scholarship Scheme : The duration of Means-cum-Merit Scholarship has been extended by the Central Government. Union Education Minister Dharmendra Pradhan has given information in this regard by tweeting. Accordingly, this period has been extended by 5 years. Further details are as follows:-
MCM Scholarship Scheme Has Been Extended For 5 Years
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्र सरकारतर्फे मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिपचा कालावधी वाढविण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यानुसार हा कालावधी ५ वर्षांनी वाढविण्यात आला आहे. इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांचे ड्रॉप आऊट होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि शिक्षणातील सातत्य राखण्यासाठी याची मदत होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
माध्यमिक स्तरावरील शिक्षणात सातत्य राखण्यासाठी आणि इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांना ड्रॉप आऊटपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत २०२२-२७ या आर्थिक वर्षासाठी १,८२७ कोटी रुपयांच्या नॅशनल मीन्स-कम-मेरिटची सुरुवात करण्यात आली आहे. मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप योजना सुधारित आणि विस्तारित करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. इयत्ता आठवीनंतर अनेक विद्यार्थी शाळा सोडून जातात. त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होताना दिसते. ही गळतीची समस्या सोडवण्यासाठी आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणाचे सातत्य राखण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. केंद्र सरकारने पुढील ५ वर्षांसाठी १८२७ कोटी रुपये मंजूर करुन शिष्यवृत्ती सुरु ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
To address the issue of drop-out after class VIII and ensure continuity of education at the secondary stage, PM @narendramodi ji’s govt. has approved the continuation of Means-cum-Merit Scholarship Scheme with an outlay of ₹1827 crore for the next 5 years. pic.twitter.com/J5gi3Imhw3
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) February 19, 2022
- नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (Means-cum-Merit Scholarship) योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय माध्यम-सह-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेद्वारे शिष्यवृत्ती देते.
- एनएमएमएस परीक्षेद्वारे निवडलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास बारावीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
- एमसीएम शिष्यवृत्ती योजना २००८-०९ मध्ये प्रथम सुरू झाली.
- तेव्हापासून साधारण २२.०६ शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आल्या आहेत, असे शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. योजनेच्या विस्तारित टप्प्यात १४.७६ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
Table of Contents