पॅरामेडिकल अभ्यासक्राच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – MBBS 2024 Admission
MBBS 2024 Admission
एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशाच्या नियमित तसेच मुक्त (स्ट्रे) प्रवेशाच्या तिन्ही फेऱ्या पूर्ण झाल्या असून, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएसच्या पहिल्या मुक्त प्रवेशफेऱ्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचबरोबर, फिजिओथेरपी (बीपीटीएच) आणि ऑक्युपेशनल थेरपी पदवी प्रवेशासाठी रिक्त प्रवेशफेरी सुरू करण्यात आली आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी २४ ऑक्टोबरपासून मुक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत वैद्यकीय व दंत महाविद्यालयांतील रिक्त जागांवरील प्रवेश थांबवण्यात आले होते. या रिक्त जागांसाठी सीईटी सेलने स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले होते, आणि त्या संस्थात्मक प्रवेशांची फेरी १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे.
घाटी व जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० टक्के एमबीबीएस प्रवेश
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरच्या २०० जागांवरील १०० टक्के प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत, आणि परिसर भेटीपासून विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमाला सुरवात झाली आहे.
तसेच, जालन्यात नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १०० जागा पूर्ण भरल्या आहेत. या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी विद्यार्थ्यांशी १३ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार असून, त्याच दिवशी शैक्षणिक सत्राची सुरवात होईल.
राज्य सरकारने खासगी विनाअनुदानित वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती प्रतिपूर्तीबाबत निर्देश दिल्यानंतर अखेर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तथापि, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आधी, या मुद्द्यावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आढावा घेण्यासाठी संघटनांनी विशेष बैठकीची मागणी केली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य सरकारकडून खासगी महाविद्यालयांमध्ये विविध प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत दिली जाते, ज्याची प्रतिपूर्ती सरकार महाविद्यालयांना करते. मात्र, काही वर्षांपासून ही रक्कम थकलेली असून, त्यामुळे महाविद्यालयांनी आक्रमक भूमिका घेत एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया थांबवली होती. यामुळे दोन दिवस पालक आणि विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता.
MBBS 2023 Admission
MBBS 2023 Admission – Considering the increasing need of doctors to handle the increasing patient population, Maharashtra has succeeded in taking some positive steps and this year as many as three thousand 750 students will get admission in MBBS first year. There is an effort to set up 12 government medical colleges in the state in the next 12 months and the resolution for the approval of 11 places will be presented in the cabinet meeting. Each college will have a student capacity of 100.
वाढती रुग्णसंख्या हाताळण्यासाठी डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेत काही सकारात्मक पावले टाकण्यात महाराष्ट्राने यश मिळवले असून या वर्षी तब्बल तीन हजार ७५० विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार आहे. राज्यात आगामी १२ महिन्यात १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभी करण्याचा प्रयत्न असून ११ ठिकाणच्या मंजुरीचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता १०० असेल.
राज्यात २०३० पर्यंत प्रथम वर्ष एमबीबीएसच्या तब्बल सहा हजार जागा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पदव्युत्तर जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून आता एक हजार ७१० विद्यार्थी- विद्यार्थिनींना ‘पीजी’ करता येणार आहे. २०१४ मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी केवळ ८३२ जागा होत्या. देशात या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष एमबीबीएसच्या सुमारे एक लाख जागा तयार होत आहेत. तब्बल ७१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या तमिळनाडूत देशातल्या सर्वाधिक जवळपास सात हजार जागा आहेत.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार उत्तम प्रकारे चालावा यासाठी ४५० पदे आदर्श ठरतात.
अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक असे ४० शिक्षक आवश्यक असतात. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सक्रिय असून येत्या वर्षात बाराशे जागा भराव्यात यासाठी लोकसेवा आयोगाने विशेष कक्ष उभारावा, अशी विनंती करण्यात आली आहे. बिगरवैद्यकीय पदेही लवकरच भरली जातील, असा प्रयत्न सुरु असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.
सोर्स : म. टा.
MBBS backlog exam kadhi honar aahe