एमबीए प्रवेश प्रक्रिया पुन्हा स्थगित!!
MBA Admission 2020
MBA Admission 2020 : maharashtra cet cell puts on hold mba admission process – व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) किंवा केंद्रीय प्रवेश परीक्षाच (कॅट, सीमॅट) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचा सरकारचा निर्णय लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या सूचनांनंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येतील, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
गतवर्षीपर्यंत खासगी संस्था, संस्थांच्या संघटना यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या अॅटमा, सॅट, मॅट यांसारख्या अनेक परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु गतवर्षी सुमारे ४० विद्यार्थ्यांनी खासगी संस्थांच्या परीक्षांची खोटी गुणपत्रके जोडून नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेतल्याचे उघड झाले होते. त्यामुळे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी, कॅट, सीमॅट या परीक्षांचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, हा निर्णय सीईटी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची संधी गेली. सरकारच्या या निर्णयाला अॅटमा ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांने न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी तीनच प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्याच्या आदेशाची पुढील वर्षीपासून अंमलबजावणी करण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
न्यायालयाच्या या निर्णयानुसार सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबविली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेच्या सीईटी निकालानंतर सीईटी सेलने इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. फार्मसी आणि इंजिनिअरिंगचे अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी केले आहे.
MBA Admission 2020 : अंतिम वर्षाच्या गुणांवर एमबीए प्रवेश; AICTE चा निर्णय
MBA Admission 2020 : एमबीए प्रवेशांसाठी एआयसीटीईचा महत्त्वपूर्ण निर्णय. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाणार आणि कॉलेजमध्ये जागा उरल्यास पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्थान दिले जाणार…
एमबीए प्रवेशासाठी देशपातळीवर विविध पाच प्रवेश परीक्षा होतात. तर देशातील सात राज्ये प्रवेश परीक्षा घेतात. मात्र करोनामुळे जर विद्यार्थी यापैकी कोणतीही परीक्षा देऊ शकला नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने स्पष्ट केले आहे.
करोनामुळे विविध प्रवेश परीक्षा यंदा पार पडू शकलेल्या नाहीत. यातच व्यवस्थापन शाखेत विविध विषयांत पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशही रखडलेले आहेत. राज्यातील एमबीए परीक्षा पार पडली असून, त्याचा निकालही जाहीर झाला आहे. १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, त्यामध्ये अवघ्या ५७०० विद्यार्थ्यांना १००पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यासाठीची प्रवेश प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या बदलानुसार प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश द्यायचा आहे. ‘जर कॉलेजमध्ये जागा उरल्या, तर त्या जागांवरील प्रवेश हे अंतिम वर्ष पदवीच्या गुणांच्या आधारे करावेत, असे स्पष्ट केले आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर संस्थांनाही जागा रिक्त राहण्याची भीती उरणार नाही’, असे एआयसीटीईचे संचालक प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
चांगले गुण मिळवण्यासाठी बहुतांश विद्यार्थी पुन्हा परीक्षा देतात. यामुळे कॉलेजांच्या जागा रिक्त राहतात. यंदा प्रवेश परीक्षेत एक गुण मिळालेला विद्यार्थीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन प्रवेश घेऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे. ‘कॅट’ प्रवेश परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कॉलेजांमध्ये जर जागा रिक्त राहिल्या, तर अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे अर्ज करता येऊ शकतो.
सोर्स : म. टा.