‘MBA’ ची प्रवेश प्रक्रिया अडखळली
MBA Admission
MBA admission process stalled : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सीईटी सेलने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल जाहीर होताच, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे निकाल जाहीर होतील, असा अंदाज सेलला आहे. वास्तवात विद्यापीठाच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षांचे निकाल ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जाहीर होतील. त्यामुळे, ऑक्टोबरच्या दुसºया आठवड्यात प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होणे अद्याप तरी अशक्य आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उशीर होत असल्याच्या स्थितीत विद्यार्थी मुक्त विद्यापीठाकडे वळण्याच्या शक्यतेने तोटा होण्याची भीती महाविद्यालयांना आहे. त्यातच अनेक विद्यार्थी खासगी विद्यापीठांकडे वळत आहेत. त्याचा परिणाम महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यातच प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा दबाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दोन सत्रांचा सामना एकसाथ करावा लागेल
: प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्याने, दोन सत्रांच्या परीक्षा एकसाथ देण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. विद्यापीठांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये सुरू होतात. परंतु, यंदा प्रथम सत्राच्या परीक्षा मार्च पर्यंत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लागलीच दुसºया सत्राच्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.
४५०० सीट्स
: नागपूर विभागात एमबीएच्या ४५०० जागा आहेत. मार्च महिन्यामध्ये झालेल्या सीईटीमध्ये विभागातून १६ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे, यंदा प्रवेशांची संख्या उत्तम राहण्याचा अंदाज महाविद्यालयांना होता. परंतु, टाळेबंदी आणि आता परीक्षांच्या आयोजनात होत असलेला उशीर, यामुळे या जागा भरण्याची शक्यता कमीच आहे.
सोर्स : लोकमत
MBA Admission : एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे…
MBA Admission 2020: एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल दिनांक २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी होऊन २३ मे रोजी निकालही जाहीर झाला मात्र त्यानंर सीईटी सेलने प्रवेशाबाबतीत काहीच सूचना न दिल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. एमबीएची प्रवेश परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेत चार विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत.
सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांमध्ये सुमारे ३६ हजार ७६५ हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents