Maitri Portal 2.0 Register Login Online – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या हजारो गुणवंत उमेदवारांच्या ज्ञान, कौशल्य आणि प्रशासकीय क्षमतेचा उपयोग उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्राला करून देता यावा, यासाठी ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. उद्योग विभागाच्या ‘मैत्री २.०’ या पोर्टलअंतर्गत विकसित होणाऱ्या या प्रणालीद्वारे एमपीएससी परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, मात्र अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती खासगी उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सार्वजनिक उपक्रम आदी क्षेत्रात उपलब्ध केला जाणार आहे. सहाजिकच यामुळे MPSC पास झालेल्या महाराष्ट्रातील विविध उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. निश्चितच या नवीन पोर्टलमुळे अनेक उमेदवारांना दिलासा भेटला आहे हे मात्र निश्चित.

Maitri Portal 2.0 Register Eligibility Details: MPSC च्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत-म्हणजे मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी (लागू असल्यास) – पोहोचलेल्या, परंतु अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
अंतिम निकालानंतर एमपीएससी-कडून एपीआय प्रणालीद्वारे संबंधिता उमेदवारांचा डेटा सुरक्षितपणे ‘निपुण सेतू’ (Nipun Setu) पोर्टलवर हस्तांतरित केला जाईल.
तरी आता असे उमेदवार ज्यांनी एमपीएससी पास केली आहे आणि ते यादीत आहेत त्यांनी या पोर्टल वरती नोंदणी करून या नवीन सुविधेचा लाभ घ्यावा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















