आता नवीन महिला समृद्धी योजना सुरु! महिलांना दर महिन्याला मिळणार २५०० रुपये- कसा कराल अर्ज..
Mahila Samriddhi Yojana
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवल्या होती. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. त्यानंतर आता दिल्ली सरकारनेही महिला समृद्धी योजना (Mahila Samriddhi Yojana) राबवली आहे. या नवीन महिला समृद्धी योजनेच्या रजिस्ट्रेशनची सुरुवात महिला दिन म्हणजेच आजपासून झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी महिलांना २५०० रुपये देऊ, असं भाजपने जाहिरनाम्यात सांगितले होते. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. यामुळे आता ही योजना राबवण्यात आली आहे. महिला समृद्धी योजनेत दर महिन्याला महिलांना २५०० रुपये दिले जातात. महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाउंटस उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र सबमिट करावे लागणार आहेत. ज्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या सर्व अपडेट्स साठी आमच्या व्हाट्सप्प ग्रुप लगेच ज्वाइन करा.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यात गरीब महिलांना दर महिन्याला २५०० रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. भाजप सरकारने आता या योजनेची अंबलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ८ मार्चपासून रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. Mahila Samriddhi Yojana Application Form & Details. निवडणुकी नंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी दिल्लीत या योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा २५०० रुपये दिले जातील. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने महिलांना २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर यासाठी ५१०० कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. हि बातमी महिलांसाठी निश्चितच आनंदाची आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज कसा करायचा?
महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे. या प्रक्रियेला दीड महिन्याचा कालावधी आहे. या योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.