पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा बद्दल अपडेट जाही! – Women’s Job Fair !

Mahila rojgar melava 2025

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (न्यू पॉलिटेक्निक) उचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न झाला Mahila rojgar melava 2025.

Women's Job Fair !

या मेळाव्यात सरकारी महामंडळांसह १० नामांकित कंपन्यांनी महिला कर्मचारी भरतीसाठी सहभाग घेतला. एकूण ११० पदांसाठी १०० पेक्षा अधिक महिलांनी नोंदणी केली, त्यापैकी ८७ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि ७७ महिलांची प्राथमिक निवड करण्यात आली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी “प्रिन्स शिवाजी” संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील होते.

महिलांसाठी विशेष संधी
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, शासनाने महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन कौटुंबिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जमीर करीम यांनी केले.

एनआयटी संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी शासनाच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे यांनी १२ मार्चला एनआयटी उचगाव येथे महिलांसह पुरुषांसाठी खुला रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

स्वयंरोजगारासाठी मदत
महिला स्वयंरोजगार योजनांची माहिती देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या स्टॉल्स उपस्थित होते.

विशेष उपस्थिती
कार्यक्रमास केंद्र शासनाच्या यंग प्रोफेशनल मेघना वाघ, एनआयटीचे अधिष्ठाता डॉ. नितीन पाटील, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि महिला उमेदवार उपस्थित होत्या. रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी एनआयटीचे टीपीओ प्रा. किरण वळीवडे यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी पाटील यांनी केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड