सौर कृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारीं सोडविण्यासाठी महावितरणच्या वतीने पुढाकार घेत तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागनिहाय आयोजित केलेल्या या तक्रार निवारण मेळाव्याचा, तक्रार किंवा समस्या असलेल्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांनी केले आहे. वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा देण्यासाठी महावितरण कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंपाबाबत समस्यांची नोंद करून, शक्य असल्यास समस्या जागेवरच सोडविण्याच्या अनुषंगाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे तसेच असलेल्या शंकेचे निरसनही या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

सौरकृषी पंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात आणि सर्व उपविभागीय उपकार्यकारी अभियंते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या मेळाव्यात महावितरणचे अभियंते, तांत्रिक कर्मचारी, तसेच खासा करून ज्या एजन्सी मार्फत सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत त्या एजन्सिचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे समस्यांचे जागेवरच निराकरण होण्यास मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या परिसरातच मेळाव्याचे आयोजन शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे आणि जास्तीत जास्त समस्यांचे निराकरण व्हावे या हेतूने तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन हे शेतकऱ्यांच्या परिसरातच करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातच दिलेल्या दिवशी व वेळेत मेळाव्याला सुरूवात होणार असल्याने, समस्या किंवा तक्रार असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच असलेल्या उपविभागीय कार्यालयातील मेळाव्यात हजर राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















