महावितरण पदभरती मध्ये मराठा आरक्षण नाही?!! । Mahavitaran Latur Bharti 2024

Mahavitaran Latur Bharti 2024

Mahavitaran Latur Bharti 2024

राज्यातील मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्याचे राज्य शासन सांगत असले, तरी महावितरणच्या पदभरतीत त्याचा समावेश नाही. महावितरणने काढलेल्या जाहिरातीत दहा टक्के आरक्षणासंदर्भात असलेल्या एसईबीसी संवर्गाचा उल्लेखच नाही. ईडब्ल्यूएसचा उल्लेख असला, तरी त्याचे प्रमाणपत्र महसूल विभाग देत नसल्याने मराठा समाजातील तरुणांना एक तर खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावे लागतील किंवा या पदभरतीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.

महावितरणने राज्यभरात विद्युत सहायक, डिप्लोमा इंजिनिअरच्या जागा भरण्यासाठी २९ डिसेंबर २०२३ ला जाहिरात दिली आहे. त्यावेळी मराठा आरक्षण लागू नव्हते. पण, या जाहिरातीत यूआरएल लिंक जानेवारीमध्ये दिली जाईल, असे नमूद करण्यात आले होते. पण, तसे न करता मार्चमध्ये यूआरएल लिंक महावितरणने खुली केली आहे. २० मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. इतक्या उशिराने लिंक खुली का केली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पाच हजार नऊशे पदे

महावितरणच्या जाहिरातीनुसार विद्युत सहायकाची सर्वाधिक पाच हजार ३४७ पदे भरली जाणार आहेत. डिप्लोमा इंजिनिअरचे (डिस्ट्रीब्युशन) ५१ आणि डिप्लोमा इंजिनिअरची (सिव्हिल) ३५ तसेच क्लर्कच्या ४६८ अशी एकूण पाच हजार ९०१ पदे भरली जाणार आहेत. २०१९ नंतर महावितरणतर्फे ही सर्वात मोठी पदभरती होत आहे. त्यामुळे तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

खुल्या संवर्गाचा पर्याय

या जाहिरातीत मराठा समाजासाठी असलेला एसईबीसी हा संवर्गच दाखविण्यात आलेला नाही. ईडब्ल्यूएस संवर्ग मात्र दाखविण्यात आला आहे, पण दहा टक्के आरक्षण लागू झाल्याने मराठा तरुणांना महसूल विभागाकडून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना या दोन्ही संवर्गांतून अर्जच भरता येत नाहीत. आरक्षण असेल तर पाच वर्षे वयाची अट शिथिल आहे. पण, त्याचा लाभही तरुणांना घेता येत नाही. एक तर खुल्या प्रवर्गातून त्यांना अर्ज करावे लागत आहेत किंवा या पदापासून वंचित रहावे लागत आहे.

मराठा समाजाला फेब्रुवारीत दहा टक्के आरक्षण लागू झाले आहे. महावितरणने मार्चपासून पदभरतीची यूआरएल लिंक खुली केली आहे. हे आरक्षण लागू केले असते, तर पाच वर्षे वयाच्या अटीत शिथिलता मिळाली असती. पण, जाहिरातीत SEBC Reservation हा संवर्गच दाखविलेला नाही. ईडब्ल्यूएस संवर्ग दाखविण्यात आला असला, तरी महसूल विभाग त्याचे प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे या भरतीपासून वंचित रहावे लागत आहे. महावितरणने एसईबीसीचे आरक्षण द्यावे किंवा महसूल विभागाने ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र दिले तर मराठा समाजातील तरुणांना उपयोग होणार आहे.

महावितरणने डिसेंबरमध्ये पदभरतीची जाहिरात काढलेली आहे. कायद्यानुसार जे आरक्षण होते, ते या पदभरतीला लागू करण्यात आले आहे. तेच आरक्षण लागू राहणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करता येणार नाही. जाहिरातीच्या वेळी एसईबीसी आरक्षण लागू नव्हते.

 


Mahavitaran Latur Bharti 2024: Mahavitaran Latur (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Latur) has recently announced recruitment notification for the various vacant posts. The name of this recruitment is “Apprentices Engineer”. There are total of 26 vacancies are available. The job location for this recruitment is Latur. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 27th of February 2024. The official website of Mahavitaran Latur is www.mahadiscom.in. More details are as follows about Mahavitaran Latur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), लातूर अंतर्गत “शिकाऊ अभियंता” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahavitaran Latur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ अभियंता
  • Degree Holders: 13
  • Diploma Holders :- 13

Educational Qualification For Mahavitaran Latur Apprentice Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ अभियंता
  • For Degree Holders:
    Degree in Engineering / Technology in Electricals from Recognized University. (Year of Passing 2019 & thereafter)
  • For Diploma Holders:
    Diploma in Engineering/ Technology in Electricals from Board of Education of Maharashtra State. (Year of Passing 2019 & thereafter)

Salary Details For Mahavitaran Latur Online Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिकाऊ अभियंता
  • For Degree Holders Rs.9000/-p.m.,
  • For Diploma Holders Rs. 8000/-p.m.

How To Apply For Mahavitaran Latur Apprentices Engineer Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची छायांकित प्रत प्रत्यक्ष सादर करावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Apprentices Engineer Jobs 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/dfwX6
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/CSW67
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Arti chamkure says

    Graduation asel tr chalt ka sor

  2. Vishal chavan says

    No q

  3. Narayan says

    diploma in electrical engg cani apply??

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड