महावितरणमध्ये तब्बल सात हजार जागांची भरती

Mahavitaran Bharti 2020 For 7000 Posts

Mahavitaran Bharti 2020 For 7000 Posts – नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००) अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स. या भरती संदर्भातील पुढील माहिती आणि जाहिरात आम्ही लवकरच महाभरती(www.MahaBharti.in) वर प्रकाशित करू. 

महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २३ जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश २३ जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मंगळवार, ४ जून रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भरती दोन टप्प्यात
महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड