चार वर्षात ५.२ कोटी बेरोजगार जाऊ लागले कामावर, वर्षाला वाढल्या १.३० कोटी नोकऱ्या! | Mahaswayam Online Employment Card Registration

Mahaswayam Online Employment Card Registration

 

भारताच्या भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि राष्ट्रीय पेंशन प्रणाली (NPS) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या ४ वर्षात सुमारे ५.२ कोटी जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या संस्थांकडून मागवलेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकार दर महिन्याला नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर करीत असते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय पेंशन प्रणालीच्या आकडेवारीनुसार या चार वर्षात नव्या ८.२४ लाख जणांनी नोंदणी केली. यात राज्य सरकारचे कर्मचाऱ्यांची संख्या ४.६४ लाख आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या २.२० लाख तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या १.२९ लाशख इतकी आहे. चार वर्षांत नव्या ३१ लाख जणांनी नोंदणी केली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार २०२० ते २०२३ या चार वर्षांत ईपीएफमध्ये ४.८६ कोटी जणांची भर पडली आहे. यात पहिल्यांदा नोकरी करणारे किंवा फ्रेशर्सची संख्या २.२७ कोटी इतकी आहे. हे प्रमाण एकूण आकडेवारीच्या ४७ टक्के इतकी आहे. गेल्या चार वर्षांत दुसऱ्यांदा नोकरीत रुजू होणारे किंवा पुन्हा ईपीएफओ योजनेत येणाऱ्यांची संख्या २.१७ कोटी इतकी आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कल नोकरी टिकवण्याकडे
ईपीएफओनुसार दुसऱ्यांदा योजनेत येणाऱ्यांच्या संख्येत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घट झाली आहे. लोकांमध्ये हातातील नोकरी टिकवण्याचा कल दिसून येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत भरती केलेल्या बँक सखींना बँकांचे प्रतिनिधी म्हणून नेमण्याची शिफारस ईपीएफओने केली होती. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांतील असमानता कमी करण्यासाठी बँक प्रतिनिधी भरती करताना ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्याचा विचार केला जाऊ शकतो. सध्या सभासदांपैकी महिलांचे प्रमाण २७ टक्के इतके आहे.


 

Mahaswayam Online Employment Card Registration

Mahaswayam Online Employment Card Registration– Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Minister Mangalprabhat Lodha informed that 88 thousand 108 job-seeking candidates have been given employment in various companies, industry corporate bodies in the state by the end of May 31 this year through various activities implemented by the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, उद्योग कॉर्पोरेट संस्थांमध्ये यावर्षी ३१ मे अखेर नोकरीइच्छुक ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६९५ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्तपदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांतून नोकरी मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. 

विभागामार्फत राज्यात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने १०४ रोजगार मेऴाव्यांचे आयोजन करण्यात येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छुक उमेदवारांचा मेऴाव्यांना प्रतिसाद मिळत आहे. तसेच जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर २८८ ऑनलाईन व्यवसाय मार्गदर्शन व समुदेशन सत्र आयोजित केले असून यात ८४ हजार ८९० उमेदवार यांनी या सत्रांचा लाभ घेतला असल्याचे लोढा म्हणाले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

 


Mahaswayam Online Employment Card Registration – All Those candidates Looking For employment, self-employment through government schemes mjust register for Maha Online Employment Card. If you want to take advantage of government schemes? Then get employment card online! For Mahaswayam Online Employment Card Registration, Applicant must be permanent resident of Maharashtra State as well as Applicant should be 18 years or above. If the beneficiary is already employed then he cannot register on this portal. Check all details about this Portal at below

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना संधी: रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न –  शासकीय योजनांच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार मिळविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ‘महास्वयंम’ – संकेतस्थळावरून ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढणे आवश्यक झाले आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार मिळविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ‘महास्वयंम’ संकेतस्थळावरून ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढणे आवश्यक झाले आहे. नोंदणी कशी करायची, कुठली कागद पत्रे लागतील इत्यादी माहिती खाली दिलेली आहे…

Maharashtra Employment Exchange Registration Online Card

Authority Government of Maharashtra
Concerned Department Skill Development and Entrepreneurship Department (SDED)
Official Website www.mahaswayam.gov.in
Category Maharashtra Employment Exchange Registration Online Card
Registration For Employment exchange

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, जिल्हास्तरीय योजनेंतर्गत विविध विषयांचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्था अधिकृत केल्या आहेत.

Eligibility For Mahaswayam Online Employment Card Registration 

  1. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, जिल्हास्तरीय योजनेंतर्गत विविध विषयांचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
  2. राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्था अधिकृत केल्या आहेत.
  3. या संस्थांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाते. शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी या यंत्रणांकडून नोंदणीकृत उमेदवारांच्या याद्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांकरवी मागविल्या जातात.
  4. यासाठी उमेदवार हा १८ वर्षांवरील व इयत्ता चौथी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  5. अशा उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून सेवायोजन कार्ड काढणे आवश्यक आहे.

नोंदणी कोण करू शकतो?

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थीनी शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपादन केलेली कौशल्ये, संपर्क तपशील इत्यादी माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणे आवश्यक आहे.
  3. अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  4. जर लाभार्थीकडे आधीच रोजगार असेल तर तो या पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही.

List Of Documents Required for Online Employment Card Application Form

काय कागदपत्रे लागतात?

  1. महाराष्ट्र महास्वयं पोर्टलसाठी कागदपत्रे आधार कार्ड,
  2. मोबाइल नंबर (तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे),
  3. पासपोर्ट आकाराचा फोटो,
  4. वय प्रमाणपत्र,
  5. पत्त्याचा पुरावा,
  6. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र,
  7. शाळेच्या अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र,
  8. पालकांच्या राज्यात नोकरी प्रमाणपत्र,
  9. सरपंच किंवा नगर परिषदेने दिलेले प्रमाणपत्र.

Benefits of Applying to Maha Online Employment Card

फायदे काय ?

  1. बेरोजगार तरुणांसाठी हे पोर्टल एक असे व्यासपीठ आहे की, ज्यावर ते नोंदणी करून रोजगार मिळवू शकतात.
  2. लाभार्थी युवक त्यांच्या पात्रता, कौशल्याच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
  3. बेरोजगार व्यक्ती घरी बसून रोजगाराची माहिती मिळवू शकतात.
  4. त्या कंपन्या आणि संस्था या पोर्टलवर नोंदणी करू शकतात, ज्यांना त्यांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत नियोक्ते आणि नोकरी शोधणारे दोघेही या महास्वयं रोजगार पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
  5. बेरोजगारांना रोजगार मिळेल. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
  6. सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कौशल्ये वाढवून त्यांना सक्षम करणे.
  7. या पोर्टलच्या मदतीने कोणतीही संस्था किंवा कंपनी आपल्या जाहिराती देऊ शकतात.
  8. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या तरुणांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे.

Mahaswayam Portal Links for Registration

Component Conducting Organization Official Website
Skill Development (Kaushal Vikas) Maharashtra State Skill Development Society (MSSDS) https://kaushalya.mahaswayam.gov.in/
Employment / Jobs Directorate of Skill Development, Employment & Entrepreneurship https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
Entrepreneurship Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Maryadit https://udyog.mahaswayam.gov.in/#/home

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड