महाराष्ट्रात उमेदवारांसाठी राज्य सुरक्षा महामंडळाकडून मोठी संधी; 882 सुरक्षा रक्षक भरती नोंदणी सुरु..| Maharashtra State Security Corporation Bharti 2026

Maharashtra State Security Corporation Bharti 2026

MSSC Bharti 2026: MSSC (Maharashtra State Security Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Joint Director / Security Supervisory Officer – Retd. ACP, Security Supervisory Officer”. There are 13 vacancies available. The job location for this recruitment is Mumbai. Applicants need to apply through Offline Mode. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of application is 21st of August 2026. For more details about Maharashtra State Security Corporation Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACP आणि Retd. PI” पदाची 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई भरती 2026

  • पदाचे नाव –  सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACP आणि Retd. PI
  • पदसंख्या13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 61 वर्षे 
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://mahasecurity.gov.in/

MSSC Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACP03
सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. PI10

Salary Details For Maharashtra State Security Corporation Recruitment 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. ACPरू. ५०,०००/-
सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – Retd. PIरू. ४५,०००/-

How To Apply For MSSC Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For mahasecurity.gov.in Job 2026

📑PDF जाहिरात
https://tinyurl.com/2mp56pku
✅ अधिकृत वेबसाईट
http://www.mahasecurity.gov.in/

 


Maharashtra State Security Corporation Bharti 2026: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२४-२५ मधील लेखी आणि मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांची माहिती राज्य पोलीस दलाच्या संबंधित विभागांकडून मागविण्यात आली असून नागपूर ग्रामीण, अहिल्यानगर आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधून पात्र उमेदवारांची परिपूर्ण यादी महामंडळाला प्राप्त झाली आहे. या उमेदवारांची पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदासाठी भरती नोंदणी व निकष पडताळणी प्रक्रिया १८ ऑगस्ट २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्या वगळून ही प्रक्रिया सहा दिवस चालणार आहे. उमेदवारांनी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी उपस्थित राहायचे आहे, याची दिनांक व वेळनिहाय यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांनी यादीत त्यांच्या नावासमोर दिलेल्या निश्चित दिनांक आणि वेळेलाच उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित दिवशीच त्या उमेदवारांची नावे सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असतील. दिलेल्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास त्यांना त्यानंतर पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही आणि ऑगस्ट २०२६ मधील भरती नोंदणी प्रक्रियेसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही.

कुठे हजर राहायचे?

उमेदवारांनी महामंडळाचे निकष पडताळणी करण्यासाठी १२ वा मजला, सेंटर-१ इमारत, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई-४०० ००५ येथे उपस्थित राहावे. भरती नोंदणीसाठी पात्र उमेदवारांची यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नोंदणीसाठी ऑनलाइन अर्जाची लिंकही उपलब्ध आहे.

ऑनलाइन नोंदणी लिंक:
https://mssc.co.in/application/

भरतीसंबंधी माहिती:
डाउनलोड PDF

Application ID तपासणे आवश्यक

गोपनीयतेच्या कारणास्तव प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये उमेदवारांचे Application ID क्रमांक अंशतः दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ च्या आवेदन पत्रावर किंवा मैदानी/लेखी परीक्षेच्या हॉल तिकिटावर नमूद असलेल्या Application ID च्या आधारे आपली माहिती तपासावी. त्यानंतर दिलेल्या ऑनलाइन लिंकवर जाऊन अर्ज अचूकपणे भरावा. पोलीस भरतीच्या अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावरच महामंडळाकडून संदेश पाठविण्यात आले आहेत.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

भरती नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासोबतच पडताळणीच्या दिवशी त्यांची मूळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.

उमेदवारांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

  1. इयत्ता १० वी (SSC Board) प्रमाणपत्र.
  2. इयत्ता १२ वी (HSC किंवा समकक्ष) गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
  3. जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेले दहावीचे प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र.
  4. आधार कार्ड — कागदपत्रांप्रमाणे नावाची स्पेलिंग आणि पूर्ण जन्मतारीख असणे आवश्यक.
  5. पॅन कार्ड.
  6. अधिवास प्रमाणपत्र.
  7. वाहन चालविण्याचा परवाना, असल्यास.
  8. संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र.
  9. इतर उच्च शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, असल्यास.
  10. महाराष्ट्र पोलीस भरतीचे आवेदन पत्र.
  11. मैदानी व लेखी परीक्षेचे हॉल तिकीट, ज्यावर Application ID नमूद आहे.

पोलीस भरतीचे आवेदन पत्र किंवा मैदानी/लेखी परीक्षेचे हॉल तिकीट आणि Application ID संबंधित कागदपत्रे नसल्यास उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.

वयोमर्यादेबाबत महत्त्वाची अट

  • सन २०२४-२५ च्या पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ होती.  या तारखेला १८ ते ३३ वर्षे वयोगटातील उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरती नोंदणीसाठी पात्र मानण्यात येणार आहे.
  • ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ३३ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले उमेदवार भरती नोंदणीसाठी अपात्र ठरतील.
  • तसेच १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांचाही विचार केला जाणार नाही.
  • वयाच्या पडताळणीसाठी उमेदवारांनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेले दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र सोबत आणावे.

पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक निकष

पुरुष उमेदवारांची भरती नोंदणीदरम्यान शारीरिक निकषांचीही पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी:

  • किमान उंची : १६५ सेमी
  • छाती न फुगवता : किमान ७९ सेमी
  • छाती फुगवल्यानंतर किमान ५ सेमी विस्तार आवश्यक

या निकषांनुसार उमेदवारांची पडताळणी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन फॉर्मची प्रिंट सोबत आणणे बंधनकारक

उमेदवारांनी नोंदणीच्या दिवशी ऑनलाइन भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट सोबत आणावी. तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्रेही सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाइन फॉर्म भरलेला नसल्यास, फॉर्मची प्रिंट सोबत नसल्यास किंवा आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करता न आल्यास उमेदवाराला अपात्र ठरवून त्याची नोंदणी केली जाणार नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आपले नाव, Application ID, उपस्थितीची तारीख व वेळ तपासून निर्धारित दिवशीच सर्व कागदपत्रांसह मुंबईतील महामंडळाच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाबमहत्त्वाची लिंक
अधिकृत अधिसूचना / भरती सूचना
अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवारांची यादी व दिनांक-वेळ
उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन भरती नोंदणी अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदांची नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यात आलेल्या ५०० सुरक्षारक्षकांच्या सेवांना आगामी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गृह विभागाने ८ जून २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला. ​ठाणे ग्रामीण आणि पालघर जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑक्टोबर २०२० रोजी मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले होते. या आयुक्तालयातील रिक्त पदे नियमित पद्धतीने भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने, कायदा व सुव्यवस्थेसाठी ५०० सुरक्षारक्षकांच्या सेवांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पोलीस महासंचालकांनी केली होती.

त्यानुसार वित्त विभागाच्या उपसमितीने ही याबाबत शिफारस केली आहे. त्याच अनुषंगाने सुरक्षारक्षकांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सुरक्षारक्षकांच्या सेवांना १ मार्च २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी प्रसिद्ध केला आहे.शासनाने स्पष्ट केले आहे की, यापुढे या मनुष्यबळाच्या सेवांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. ​या कंत्राटी सेवांवर होणारा खर्च चालू आर्थिक वर्षाच्या मंजूर अनुदानातून जिल्हा पोलीस दलाच्या ‘कंत्राटी सेवा’ या लेखाशीर्षातून करण्यात यावा अशा सूचना ही परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. ​आयुक्तालयातील दुसरी भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती. यामध्ये एकूण ९२१ पदांपैकी ८४० पदे पोलीस शिपाई पदासाठी तर ८१ पदे वाहनचालकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, निवड झालेल्या सर्व ९२१ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन कर्मचाऱ्यांना आता पुढील आवश्यक प्रशिक्षणासाठी नागपूर किंवा अकोला येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठविण्यात येणार आहे. तिथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांची विविध पोलीस ठाणे ववेगवेगळ्या विभागांमध्ये अंतिम नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड