राज्यात विविध विभागात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त
Maharashtra State 2 Lac Posts are Vacant – राज्यात विविध विभागात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त –
करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यावर मात करण्यासाठी कर्मचारी अधिकार्यांची गरज भासत असली, तरी त्या आरोग्य विभागात देखील 20544 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आहे. शिक्षण विभागाची चक्क 50 टक्के पदे रिक्त आहेत.
राज्यात राज्य शासनाच्या अखत्यारितील दहा लाख 99 हजार 104 पदे मंजूर आहेत. त्यापैकी आठ लाख 58 हजार 991 पदे सध्या भरलेले आहेत. सुमारे दोन लाख 193 पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाची रिक्त पदांची संख्या सुमारे 24 हजार 848 इतकी आहे. कृषी विभागाची 14 हजार 364 ,महसूल व वन विभागाची 11330 पदे रिक्त आहेत. आदिवासी विभागाची सात हजार 391 पदे रिक्त असून ,शालेय शिक्षण विभागाची 3477 पदे रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सामाजिक न्याय विभागाची 2856, अन्न व नागरी पुरवठा विभागाची 2736 ,महिला व बालकल्याण विभागाची 1445, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची 5055, राज्यातील इतर विभागाची 59 हजार 182 पदे रिक्त आहेत. राज्यातील एकूण एक लाख 53231 पदे रिक्त असून, जिल्हा परिषद संवर्गातील 46 हजार 962 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
या विभागात सर्वाधिक रिक्त पदे
राज्यातील पन्नास टक्केपेक्षा अधिक पदे शालेय शिक्षण विभागाची रिक्त आहेत. त्या खालोखाल सामाजिक न्याय विभागाची 44.08, आदिवासी विभागाची 35.4 टक्के, कृषी विभागाची 36.4 टक्के, महिला बालकल्याण विभागाची 36.4 टक्के, अन्न नागरी विभागाची 32.8 टक्के, इतर विभागाची 30.1 टक्के. जिल्हा परिषद संवर्गातील सुमारे 13 टक्के पदे रिक्त आहेत, तर गृह विभागाची अवघी 8.1 टक्के पदे रिक्त आहेत.
सर्वाधिक पदे गृह विभागाची
कार्यरत असलेल्या सुमारे 11 लाख कर्मचार्यांपैकी दोन लाख 55 हजार 288 पदे केवळ गृह विभागाची आहेत. त्या खालोखाल महसूल व वन विभागाची 81151 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागाची 62 हजार 634 पदे ,कृषी विभागाची एकूण 40 हजार 394 पदे, आदिवासी विभागाची 20236 पदे, शिक्षण विभागाची 6,499 पदे ,अन्न व नागरी विभागाची 8310 पदे ,सामाजिक न्याय विभागाची सहा हजार 469 पदे, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाची 15580 पदे मंजूर आहेत. एकूण कर्मचार्यांपैकी तीन लाख 64 हजार 348 पदे ही जिल्हा परिषद कर्मचार्यांचे आहेत. मंजूर पदांपैकी सुमारे 18.21 टक्के पदे रिक्त आहेत.