Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावी- भूगोलचा पेपर रद्द, नववी, अकरावीची परीक्षा होणार नाही!

Maharashtra SSC Geography Paper Exam Dates

Maharashtra SSC Geography Paper Exam Dates -आताच प्राप्त बातमी नुसार, दहावीचा भूगोल पेपर आणि नववी, अकरावीच्या परीक्षाबाबत शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता 9 आणि 11 वी परीक्षा होणार नाही. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील. तसेच दहावीचा भूगोल पेपर घेण्यात येणार नाही, याबाबत एसएससी बोर्ड भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट करेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.




दहावीच्या विषयांचे पेपर होउन आता 20 दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली असून सोमवारी (ता. 13) बोर्डाचे अधिकारी त्यांची भेट घेणार आहेत. भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला असून मंगळवारी (ता. 14) त्यावर अंतिम निर्णय होईल, असे बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.




तसेच सरासरी गुण की पाच विषयांचाच निकाल : यावर निर्णयहोणार 
आता दहावीच्या पाच विषयांचे पेपर होऊनबराच  वेळ  झाला असून विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता राहिलेली नाही. विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात कोरोनाची भिती असून भुगोल विषयाचा पेपर घ्यायचे म्हटल्यास बैठक क्रमांक टाकणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी एन-95 मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा लागेल. लॉकडाउनही वाढण्याची शक्‍यता असल्याने आता विद्यार्थ्यांना पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे की पाच विषयांचाच निकाल जाहीर करायचा, यावर शिक्षणमंत्री निर्णय घेतील, असे पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षण परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली.Bhugol Exam 2020


UPDATE : 4 April : हॅलो, आताच प्राप्त बातमी नुसार महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता  15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पहिले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून म्हंटले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या स्थितीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

प्राप्त बातमी नुसार दहावी-बारावीचे सुरवातीला झालेले पेपर तपासण्यासाठी विविध शाळांकडे येऊ लागले आहेत. तसेच काही विषयांचे किंवा शाळांचे काही पेपर अद्याप पोस्टात आहेत. शाळेत पेपर्स असून सुद्धा सध्या “लॉकडाउन’ असल्याने शिक्षकांना शाळेत येता  येत नाही. अशा स्थितीत काय करावे, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शासनाकडे केली होती. तेव्हा शासनाने “लॉकडाउन’ शिथिल झाल्यानंतर हे पेपर शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून घेऊन घरी तपासण्यास शासनाने परवानगी दिली आहे.परंतु यात , खरा प्रश्‍न आहे तो “लॉकडाउन’ शिथिल केव्हा होणार याचा? तसेच पुढे होणाऱ्या नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत शासनाने 15 एप्रिलनंतर निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर दहावी भूगोल विषयाच्या पेपरबाबतचा निर्णय 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे भूगोलचा पेपर केव्हा होणार याबाबत अद्याप सर्व विद्यार्थ्यांमध्ये अनिश्‍चितताच आहे.

पुढील अपडेट आम्ही www.MahaBharti.in वर लवकरच प्रकाशित करूच.

Geography paper ssc 2020 date

The last paper of SSC Class 10 board exam scheduled to be held on Monday was of Social Science Paper-II/Geography. The timing of the paper was from morning to 11:00 to 01:00 in the afternoon.

The paper however now stands cancelled and rescheduled to a new date which will be announced after April 15.

Because of the postponement of the SSC 2020 Exam, it is most likely that the Maharashtra SSC Class 10 result 2020 will also be delayed.

Normally, the Maharashtra board declares SSC board exam result in the first week of June.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Archana says

    *** The marks of first term exam or the round exams or their average in case of subject geography can be considered for the pending exam of geography ssc exam 2020.
    As the marks of oral exam and the history can be known as the procedure for it is done the above mentioned way can be useful..
    The educational department should think of this way..

  2. vaibhav karkade says

    bhugol paper perfect date

  3. Vaibhav karkade says

    Bhugol paper parfect date

  4. Harish more says

    Mharashtra police bharti kiti prakarchya aastata

  5. लक्ष्मण बेठेकर says

    15 एप्रिल नंतर वेळापत्रक मिळेल का ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड