शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस गती; TAIT जूनमध्ये, तर TET होणार ऑक्टोबर मध्ये! – Maharashtra Shikshak Bharti 2025
Maharashtra Shikshak Bharti 2025
Shikshak Bharti New Update 2025
शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेल्या TAIT मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर TET ऑक्टोबर 2025 महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (TAIT,TET 2025 Exam Date) त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची गुणवत्ता आणि पात्रता तपासण्यासाठी टीएआयटी व टीईटी या दोन्ही परीक्षा अनिवार्य आहेत. २०१७ नंतर तब्बल सहा वर्षांनी २०२३ मध्ये टीएआयटी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेच्या आधारे ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करण्यात आली.
आता पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने नवे पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आणि यादी तयार करण्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक ठरत आहे. TAIT परीक्षेसाठी परीक्षा यंत्रणेकडून तयारीला वेग देण्यात आला असून, प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामालाही सुरवात झाली. मागील वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा आयोजित केली होती. यंदाही त्या अनुभवाच्या आधारे परीक्षा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. साधारणपणे ८ ते १० लाख उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी अर्ज करतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, शिक्षक पात्रता परीक्षाही (TET) ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असून, ही परीक्षा प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक (इयत्ता १ ते ५) आणि उच्च प्राथमिक शिक्षक (इयत्ता ६ ते ८) यांच्या भरतीसाठी आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
TET परीक्षा पास असलेल्यांनाच शिक्षक म्हणून पात्र मानले जाते. त्यामुळे दोन्ही परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शासनाकडून लवकरच या दोन्ही परीक्षांबाबत सविस्तर वेळापत्रक, अधिसूचना व अर्ज प्रक्रियेची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटली आहे. परिणामी, मागील १५ वर्षांत तब्बल ७२ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर, इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल, आणि जन्मदरातील घट या कारणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
सध्या राज्यात २२ हजार खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. यामध्ये पूर्वी मंजूर केलेली एकूण शिक्षक पदसंख्या २.९२ लाख होती. मात्र, सध्या केवळ २.२० लाख शिक्षक कार्यरत आहेत.
दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या ६२ हजार शाळांमध्ये १८ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. सध्या या शाळांमध्ये सुमारे १ कोटी ७० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० पेक्षा कमी आहे, ज्यामुळे सुमारे २ हजार शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
शिक्षकांच्या पदांमध्ये घट होण्यामागची कारणे:
-
ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
-
‘हम दो, हमारा एक’ यामुळे कमी झालेला जन्मदर
-
शिक्षण व नोकरीच्या शोधात वाढलेले विवाहाचे वय
-
इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या
-
इंग्रजी शिक्षणाबाबत पालकांचा वाढता कल
दरवर्षी सुमारे २०० नवीन खासगी इंग्रजी शाळा उघडल्या जात आहेत, तर मराठी शाळांमधील घटलेली विद्यार्थी संख्या अनेक ठिकाणी शिक्षकांच्या तुकड्यांनाही अप्रभावी ठरत आहे. यातून शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत, ज्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या दर्जावर व गुणवत्ता व्यवस्थेवर होत आहे.
पवित्र पोर्टलवर केवळ ११ हजार शिक्षक पदांसाठीच भरती
राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवर केवळ ११ हजार शिक्षकांच्या जागांची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार उमेदवारांसमोर संधी कमी झाली आहे.
सध्या शाळांमध्ये केवळ शिक्षकेतर नव्हे, तर शिक्षकांच्या आवश्यक पदांमध्येही कपात करण्यात आली आहे. यामुळे नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मराठी शाळांची ही ढासळती अवस्था शिक्षण विभागासाठी गंभीर इशारा असून, या संकटावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अनुदानित शाळांची स्थिती
एकूण शाळा : २२,०००
एकूण पदे मंजूर : २.९२ लाख
सध्या कार्यरत पदे : २.२० लाख
१५ वर्षांत कमी झालेली पदे: ७२,०००
Shikshak Bharti New Update 2025
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात २१ वर्षांनी शिक्षकेतर पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला. या भरतीमुळे शाळांतील प्रशासकीय काम चांगल्या पद्धतीने होईल, तसेच शिक्षकांवरील ताण कमी होईल. सुमारे ५ हजार पदांवर भरती होण्याची शक्यता आहे.
शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीची अट लागू करण्यात आली असून, या निर्णयामुळे शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा सुरु होणार, याबाबत अनेक उमेदवार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. परंतु, बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भरतीची संधी मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत जिल्हा परिषद मागासवर्गीय माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य नेते प्रवीण मेश्राम, राज्याध्यक्ष शालिनी बारसागडे, राज्य सहसचिव शेखर मेश्राम, जिल्हाध्यक्ष सदाशिव चव्हाण व जिल्हा सरचिटणीस गोवर्धन पाटील आर्दीनी केले आहे. जाहिरातीसाठी २० जानेवारीपासून पोर्टल व सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील एक हजार ७१२ व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण एक हजार ९०२ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक संस्थांनी बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी मागासवर्गीय कक्षात प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित न झाल्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
पवित्र पोर्टल शिक्षक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; अर्ज करा !!
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या, ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीने माहिती देण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे. शासकीय शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतून (टीईटी) दरवर्षी भरती केली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे किमान पात्रता मानली जाते. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासनाने २४ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या निर्णयानुसार, या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांनी ३० मार्च २०१९ पर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण करणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. राज्यातील शाळांमध्ये अशा अपात्र शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियमानुसार, पात्रता परीक्षा न उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र प्रणालीद्वारे राबवली जात आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार असल्याने इच्छुक उमेदवारांना तयारीसाठी सज्ज राहावे लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी किती पदे उपलब्ध होतील, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षक पदभरतीबाबतच्या जाहिराती अल्प प्रमाणात पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार, येत्या काही महिन्यांत दुसऱ्या टप्प्यातील भरती पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे.
शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी २० जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरात नोंदविता येईल. तसेच, या जाहिरातींसाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Shikshak Bharti New Update 2025
Maharashtra Shikshak Bharti 2025 Latest Updates & Recruitment details are given on this page. Every Year Maharashtra sarkar conductes Bharti process for the School Teachers in State. The Details about this are given & published on this page. We keep adding all latest information about Teachers Job vacancies & New Openings from all over Maharashtra. Now the latest Updates about the Secon Phase Shikshak Bharti 2025 are now avilable. The TET Examinations Details & Latest news about is given below.
राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे १८ हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यांत पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षांत शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील (टेट) पात्रता आवश्यक आहे. २०१७ च्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती. तर २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. तसेच, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर म्हणाले, शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, अंतिम निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल. तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.
Table of Contents
एम.ए झालोय त्यावर भरती नाही का ?
Sir Maj D.ed B.A graduation aahe
Kala Shikshak Bharti kadhi karnar
Next portal kevha honar tet clear jhalay aahayt taynchay
Sir maz Msc BEd ahe bharti kdhi suru honar ahe