कापूस, सोयाबीनसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द, कृषिपंपाचे वीज बिल माफ होणार! – MAHARASHTRA SHETKARI YOJANA EPIK PAHNI
MAHARASHTRA SHETKARI YOJANA EPIK PAHNI
मागील खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे. सातबारावर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे. आमदार पंकजा मुंडे आदी यावेळी उपस्थित होते. साडे सात अश्वशक्तीच्या कृषिपंपासाठीचे वीज बिल माफ करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कांदा, दूध भुकटी, आयात-निर्यात आदी समस्या मांडत दिल्लीत केंद्राने बैठक घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आता दिवसाही वीज मिळणार : फडणवीस
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- रात्रीच्या वेळी शेतात पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. हाच धागा पकडून आपण १२ हजार मेगावॅटचे काम सुरू केले आहे. १८ महिने याचा कालावधी आहे. तो पूर्ण झाल्यास २४ तास, ३६५ दिवस वीज मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली. यावर विरोधकांनी टीका केल्या, परंतु यापुढे विरोधकांच्या कोणत्याच टीकेला प्रत्युत्तर द्यायचे नाही, असे आपण ठरवले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन एकेक प्रश्न सोडविले जातील. देशाचे कृषिमंत्री असताना ५० टक्के नफा जोइन एमएसपीला त्यांनी विरोध केला होता, असे चौहान म्हणाले. राहुल गांधी, शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली.
Comments are closed.