सार्वजनिक बांधकाम विभागातील 459 कंत्राटी पदभरतीला विरोध, कायमस्वरूपी नियुक्त्यांची कामगार संघटनेकडून मागणी!! | Maharashtra PWD Recruitment 2026

Maharashtra PWD Bharti 2026

सार्वजनिक बांधकाम खात्यात सुमारे ४५९ पदे भरण्याबाबतची जाहिरात दिली आहे. मात्र, ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जाणार असल्याने त्याला साबांखा कामगार संघटनेने विरोध केला आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीवर न भरता कायमस्वरुपी भरण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भातचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

संघटनेचे कामगार नेते अड. अजय प्रभुगावकर म्हणाले की, पीडब्ल्यडी सोसायटीमध्ये आधीच सुमारे अडीच हजाराहून अधिक कर्मचारी खात्यातील विविध पदावर तात्पुरत्या स्वरुपावर काम करत आहेत. त्यातील काहीजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन मिळते. त्यांना नियमित करण्याच्या मागणीसाठी हल्लीच आंदोलन केले होते. यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा सुरू असताना खात्याने पुन्हा कंत्राटी पद्धतीवर भरतीची जाहिरात दिली आहे. त्यामुळे सध्या काम करत असलेल्या कंत्रीट कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारातच घालवावे लागेल की अशी चिंता वाटू लागली आहे.
सरकारी खात्यात सुमारे २२ हजार पदे रिक्त असल्याचा दावा केला जात आहे मात्र नोकरभरती करताना कायमस्वरुपी पदे भरण्याऐवजी कंत्राटी पद्धतीवर ती भरली जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून रिक्त पदांचे गाजर दाखवले जात आहे. यापूर्वी अशी रणनिती सरकारने अवलंबली होती. मात्र निवडणूक झाल्यावर या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दखलही घेत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.


Maharashtra PWD Bharti 2026

Maharashtra PWD Bharti 2026 : PWD (Public Works Department) Mumbai has published the recruitment notification for the “Room Officer” posts. Eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application should be 08th of April 2026. More details are as follows:-

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत “कक्ष अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२६ आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई भरती २०२६

  • पदाचे नावकक्ष अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख८ एप्रिल २०२६
  • अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in 

 How To Apply For Maharashtra PWD Jobs 2026

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pwd.maharashtra.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/kEKLT
✅ अधिकृत वेबसाईट
pwd.maharashtra.gov.in 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड