पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात
Maharashtra Polytechnic Admission 2020
तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया
Maharashtra Polytechnic Admission 2020 : दहावीनंतर तीन वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका तसेच, बारावी विज्ञान नंतरच्या औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी (ता.१०) सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज २५ ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यात ३४१ तर, औरंगाबाद विभागात ५२ सुविधा केंद्रे आहेत. तसेच औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी राज्यात २४८ तर, औरंगाबाद विभागात ५३ सुविधा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातून आठवी नववी व दहावी उत्तीर्ण असण्याची पात्रता व आता बदलण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातून केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र राहतील.
प्रत्यक्ष न येणाऱ्यांसाठी..
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे, तसेच सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यासाठी शासकीय व अनुदानित संस्था या ई सुविधा केंद्र म्हणून काम पाहतील.
केंद्रावर येणाऱ्यांसाठी..
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सुविधा केंद्रावर प्रत्यक्षपणे येऊन कागदपत्रांची तपासणी करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित तारीख व वेळ निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रमाणपत्रांबाबतचा निर्णय..
सद्य परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मिळवणे, जिकिरीचे झाले आहे. हे लक्षात घेऊन अर्ज करताना यावर्षी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य नाही. असा बदल केलेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे पण, जात वैधता प्रमाणपत्र अर्ज करताना सादर करण्याची आवश्यकता नाही.
असे असेल शुल्क..
सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी, जम्मू-काश्मीर, लडाख या क्षेत्रातील विस्थापित विद्यार्थ्यांसाठी अर्जाचे शुल्क रुपये चारशे रुपये, महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी व दिव्यांगासाठी अर्जाचे शुल्क तीनशे रुपये आहे.
- राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्था – ४०१
- एकूण जागा – १ लाख १९ हजार ५९५
- औरंगाबाद विभागातील संस्था – ५८
- औरंगाबाद विभागातील जागा – १७ हजार २१४
- राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदविका संस्था – ३९५
- एकूण जागा -२४ हजार ५६७
- औरंगाबाद विभागातील संस्था – ८८
- औरंगाबाद विभागातील जागा – ५७२८
Maharashtra Polytechnic Admission 2020 : तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दि. १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली…
Maharashtra Polytechnic Admission 2020: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्ट २०२० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.’
याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्या पर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील.प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि e-Scrutiny पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सामंत यांनी संगितले.
असे असेल वेळापत्रक
- १० ते २५ ऑगस्ट – ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड
करणे आणि छाननीची योग्य पद्धत निवडणे. - ११ ते २५ ऑगस्ट – कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे.
- २८ ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
- २९ ते ३१ ऑगस्ट – तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास, तक्रार करणे.
- २ सप्टेंबर – अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.
पदविका अभ्यासक्रम व मागील वर्षीच्या जागा पदविका अभ्यासक्रम शासकीय अशासकीय एकूण अनुदानित वि अनुदानित
- प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी १७ ७५१ ३८९० ८६३९२ १०८०४१
- द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी ७१०५ — — ८२२५७
- औषधनिर्माणशास्त्र २१० ११५० २२९०१ २४२६१
- हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नोलॉजी १२० ० ६० १८०
- सरफेज कोटिंग टेक्नोलॉजी — ४० ० ४०
सोर्स : म. टा.
Table of Contents
ह्या माझे आयटीआय चे शेवटचे वर्ष आहे. पण मी परिक्षा न झाल्यामुळे मी प्रवेश कश्याप्रकारे मिळवू शकेल?
कृपया माहिती द्यावी.
Give me some information about Mechatronics Polytechnic diploma