नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ | Maharashtra Nursing Admission Last Date 2024
Maharashtra Nursing Admission Last Date 2024
Maharashtra Nursing Admission 2024
Maharashtra Nursing Admission 2024: भारतीय नर्सिंग कौन्सिलने विविध नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला आणखी एकदा मुदतवाढ दिली आहे. यामध्ये बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, एएनएम, जीएनएम, पीबीबीएससी नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि क्रिटिकल केअर नर्सिंग (एनपीसीसी) या अभ्यासक्रमांचा समावेश असून, विद्यार्थ्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पूर्वी प्रवेशासाठी अंतिम मुदत ३० सप्टेंबर होती, जी नंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे कौन्सिलने ही तिसरी मुदतवाढ दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नर्सिंग प्रवेशात वाढ होण्याची शक्यता
भारतीय नर्सिंग कौन्सिलने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देताना प्रवेशासंदर्भात नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे निर्देश जारी केले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेले प्रवेश नियमित समजले जातील, तर १ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरदरम्यान होणारे प्रवेश अनियमित गटात समाविष्ट केले जातील, असे कौन्सिलने स्पष्ट केले आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश सर्व नर्सिंग महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. यामुळे मुदतवाढ दिल्यानंतर नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.