स्मार्टफाेन कंपनी भारतात देणार एक लाखाहून अधिक नाेकऱ्या! – Maharashtra New Jobs
Maharashtra New Jobs
Maharashtra New Jobs
Maharashtra New Jobs: अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालल्यामुळे ॲपलने आपले प्रकल्प चीनबाहेर हलविण्याची योजना आखली असून त्याच योजनेंतर्गत फॉक्सकॉन भारतात येत आहे. ‘ॲपल’चा भागीदार असलेला फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह भारतात ७०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. बंगळूरू येथे मोठा प्रकल्प उभारणार असून त्याद्वारे १ लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्याही मिळणार आहेत.
ॲपलने २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत. त्यांना सरकारच्या पीएलआय याेजनेचाही लाभ मिळत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तब्बल १ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याचे आयफाेन भारतातून निर्यात झाले हाेते. स्मार्टफाेन निर्यातीचा हा उच्चांक हाेता. भारतातून सर्वच स्मार्टफाेनची निर्यात सातत्याने वाढत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- हा ‘फॉक्सकॉन’चा भारतातील सर्वांत मोठा एकल प्रकल्प ठरणार आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक चीनचा किताब ‘फॉक्सकॉन’च्या स्थलांतरामुळे धोक्यात येऊ शकतो.
- या प्रकल्पात १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. चीनच्या झेंगझोऊ येथील फॉक्सकॉन प्रकल्पात २ लाख लोक काम करतात.
- कोविड-१९ साथीमुळे तेथील उत्पादन घटले आहे. त्यामुळे ॲपलने चीनबाहेर निर्मिती प्रकल्प वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ॲपलने २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत. त्यांना सरकारच्या पीएलआय याेजनेचाही लाभ मिळत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तब्बल १ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याचे आयफाेन भारतातून निर्यात झाले हाेते. स्मार्टफाेन निर्यातीचा हा उच्चांक हाेता. भारतातून सर्वच स्मार्टफाेनची निर्यात सातत्याने वाढत आहे.
Maharashtra New Jobs Vacancies 2023 – वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प व बल्क ड्रग पार्कसारखे मोठे प्रकल्प राज्यातून गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारला विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना व लोकक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्रातील रांजणगाव येथे ईएमसी उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) हे क्लस्टर उभारण्याची मंजुरी आज दिली. यामुळे रांजणगाव एक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित होईल, असेही ते म्हणाले.
Maharashtra New Jobs Vacancies 2023
तरुणांना उद्याेगाची संधी-
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती भारतीय बनावटीची राहावी, यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून, या हेतूने पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या माध्यमातून स्टार्टअपला चालना देण्यात येणार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. सी-डॅक ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, येत्या काही वर्षात एक हजार कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स चीप व इतर पूरक उद्योगांवर यात भर दिला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी उद्योग उभारावेत, यासाठी येत्या काही दिवसात पुण्यात रोड शो हाेणार असल्याचे ते म्हणाले.
उद्योग गेल्याने फरक पडत नाही-
महाराष्ट्रातून उद्योग जात असल्याने घाईघाईने या प्रकल्पाची घोषणा केली काय? असे विचारले असता राजीव चंद्रशेखर म्हणाले, हे स्पर्धेचे युग आहे. एखाद्या राज्यातून एखादा उद्योग गेल्याने फरक पडत नाही.
Table of Contents