HSC Result 2026 Check Online (Maharashtra State Board)
मित्रांनो, महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा प्रतिक्षेत असलेला बारावी (HSC) निकाल आता आज जाहीर झाला आहे. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) कडून आज २ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजता बोर्डाने निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली असून, हा निकाल पत्रकार परिषदेद्वारे घोषित केला आहे.
निकाल लिंक १
निकाल लिंक २
निकाल कसा पाहाल?
* अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ला भेट द्या
* “HSC Result 2026” या लिंकवर क्लिक करा
* आपला रोल नंबर / सीट नंबर टाका
* “Submit” बटणावर क्लिक करा
* स्क्रीनवर निकाल दिसेल
* भविष्यासाठी मार्कशीट डाउनलोड करून ठेवा
DigiLocker वरून निकाल कसा डाउनलोड कराल?
* results.digilocker.gov.in ला भेट द्या किंवा अॅप उघडा
* मोबाईल नंबर किंवा आधारद्वारे लॉगिन करा
* “Education” किंवा “Documents” विभागात जा
* “Maharashtra Board HSC Result 2026” शोधा
* आवश्यक माहिती भरून सबमिट करा
* डिजिटल मार्कशीट डाउनलोड करा
जर एखादा विद्यार्थी किमान गुण मिळवू शकला नाही, तर त्याला पूरक (Compartment) परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. या परीक्षांचे वेळापत्रक निकालानंतर बोर्डाकडून जाहीर केले जाईल.
मागील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्या वेळी एकूण निकालाचा टक्का ९१.८८% होता. मुलींचा निकाल ९४.५८% तर मुलांचा ८९.५१% इतका होता, त्यामुळे मुलींनी आघाडी घेतली होती. तर २०२४ मध्ये एकूण निकाल ९३.३७% इतका लागला होता.
एकूणच, २०२६ चा निकाल आता काही दिवसांत जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांनी आपले लॉगिन तपशील तयार ठेवून निकाल पाहण्यासाठी सज्ज राहावे.
मित्रांनो, बोर्डाचा १२ वी चा बहुप्रतीक्षित निकाल, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. खालील विंडो मध्ये आपण कॉउंटडाऊन टायमर बघू शकता, याच सेक्शन मध्ये उद्या आपण रोलनंबर टाकून आपला निकाल बघू शकाल. तेव्हा www.MahaBharti.in ला भेट द्यायला विसरू नका!

खालील सेक्शन मधून आपला निकाल चेक करा
निकाल लिंक २
निकाल लिंक ३
निकाल लिंक ४
मोबाईल द्वारे बोर्डाच्या वेबसाईट वर बारावीचा निकाल कसा बघायचा?
महाराष्ट्र बारावीचा निकाल दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होईल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी नमूद केलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करून त्यांचे निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात:
- आपल्या मोबाईल वर गुगल क्रोम उघडा
- येथे आम्ही खाली दिलेलीच अधिकृत लिंक वर निकाल पोर्टलला भेट द्या
- या ठिकाणी महाराष्ट्र बारावीचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून लॉगिन करा
- लगेच तुमचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल प्रदर्शित होईल
- तुमची माहिती तपासा आणि सर्वकाही बरोबर आहे याची खात्री करा
- महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल गुणपत्रिका डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा
आणि हो मित्रांनो, ऑनलाइन गुणपत्रिका तात्पुरती असल्याने आणि केवळ विद्यार्थ्यांच्या संदर्भासाठी असल्याने विद्यार्थ्यांना नंतर तुमच्या शाळेतून अधिकृत कागदपत्रे गोळा करावी लागतील याची जाणीव ठेवा. चला तर उद्या www.MahaBharti.in ला ठीक भेट द्यायला विसरू नका!!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















