JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशी शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ! – Maharashtra Government Abroad Scholarship 2026

Maharashtra Government Abroad Scholarship 2026

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णयातील तरतुदीनुसार, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत विजाभज, इमाव, व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीव्दारे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २२.०६.२०२६ अशी होती. तथापि, सदर जाहिरातीस याव्दारे मुदतवाढ देण्यात येत असून आता ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक ०८.०७.२०२६ पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in” येथील ‘ताज्या घडामोडी’ या लिंकवर भेट द्यावी.

पुढील अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Government Abroad Scholarship 2026

अल्पसंख्याक विकास विभागाकडून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘परदेशी शिष्यवृत्ती योजने’ साठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची जाहिरात एक जून रोजी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही जाहिरात एका दिवसात हटविण्यात आली. याबाबत विभागाने मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे.

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्याकरिता इतर विभागांच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेप्रमाणेच अटी, शर्ती आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदाही या योजनेची जाहिरात एक जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, लगेचच ही जाहिरात काढून टाकण्यात आल्यामुळे परदेशी शिक्षणाचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर ती कोणत्या कारणामुळे मागे घेण्यात आली, याबाबत खुलासा न झाल्याने संभ्रमात भर पडली होती. याबाबत अनेक जण वारंवार विचारणा करीत होते.

विधान परिषदेची आचारसंहिता सुरू असल्याने जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही जाहिरात पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे; तसेच या योजनेसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची माहीत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

‘अल्पसंख्याक विभागाकडून पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही, परदेशी शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होणार नाही आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी मिळेल, याची खात्री सरकारने द्यावी, असे ‘स्टुडंट हेल्पिंग हँड्स’चे संस्थापक अॅड. कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Abroad Scholarship 2026

परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडीसाठी सन २०२६-२७ साठी शाखानिहाय /अभ्यासक्रमनिहाय ७५ पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही योजना विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष :-
विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा राहील.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सन २०२५-२६ चे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ व इतर अटी शर्ती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील.

अर्ज / कागदपत्रे सादर करण्याची कार्यपध्दती :-
इच्छुक विद्यार्थ्यानी https://ts.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज भरावा व सर्व कागदपत्रे ऑनलाइन / ऑफलाइन संलग्न करावी. विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
परदेशी शिष्यवृतीसाठीचे आवश्यक शासन निर्णय, अर्जाचा नमुना, कागदपत्रांनी यादी, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी. https://obcbahujankalyan, maharashtra.gov.in व https://dirobbwd.maharashtra.gov.in
इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ts.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावा व सर्व कागदपत्रे ऑनलाइन/ऑफलाइन संलग्न करावीत. तसेच, सदरील वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या सुस्पष्ट, वाचनीय self attested कागदपत्रांसह दि. २१/०५/२०२६ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे, आकार प्रिमायरोरा, दुसरा मजला एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे-४११००६, येथे सादर करावीत. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार करता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी – येथे पहा

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड