शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. त्यानुसार, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया आह सोमवार, १९ मे पासून सुरू झाली आहे. सध्या राज्यातील एकूण ९३१९ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. www.mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार असून विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया दि. १९ मे पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. या पोर्टल वापरण्यासंबंधी काही तक्रारी असल्या Helpline Number : 8530955564 (9:00 AM to 7:00 PM) आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना : शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. १९.०५ .२०२५ पासून सुरू झाली.
या वर्षी राज्यात प्रथमच, संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यव्यापी आणि केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती, परंतु आता ही संपूर्ण प्रक्रिया राज्यभरात केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अकरावीत प्रवेश घेतलेल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर असेल. आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यासाठी एकच प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या अर्जानुसार, त्यांना राज्यभरातील कोणत्याही ठिकाणाहून उच्च माध्यमिक शाखेची निवड करण्याचा पर्याय असेल. नोंदणी करण्यासाठी mahafyjcadmissions ला भेट द्या. या वेबसाइटवर आमच्याशी संपर्क साधा.

अकरावीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज दोन भागात विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाइन भरून घ्यावा. दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांसाठी एसएससी मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच संकेतस्थळावर (mahafyjcadmissions.in) सुरू होईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी दुसऱ्या भागाचा (पसंतीक्रम) सराव माहिती पुस्तिकेतील नमुना प्रवेश अर्जाच्या मदतीने भरावा लागणार आहे. नोंदणी अर्ज दाखल केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. नामवंत असो…वा कमी कटऑफ असणारे महाविद्यालय त्या महाविद्यालयांच्या मागील वर्षीच्या कट ऑफ गुणांसह प्राधान्यक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे महत्वाचे असणार आहे.
दरवर्षी या ना त्या कारणाने अकरावी प्रवेशात विद्यार्थी किंवा प्रवेश यंत्रणेला गोंधळाला सामोरे जावे लागते यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशातील अर्धवट माहितीमुळे प्रवेशापासून दूर राहतात. तर प्रवेश सर्वाना मिळावा या हेतून अनेकदा प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या वाढवाव्यात लागतात.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला केवळ ऑनलाइन अर्ज भरूनच अकरावीला प्रवेश मिळणार आहे. राज्य शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ८ मे पासून संकेतस्थळ सुरू होणार होते. परंतु, काही अडचणीमुळे ८ मे रोजी ते सुरू होऊ शकले नाही. शुक्रवार ९ मे पासून संकेतस्थळ कार्यान्वित झाले असून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















