अकरावी प्रवेशाबाबत ठळक मुद्दे व महत्त्वाच्या तारखा!!

Maharashtra FYJC Admission 2022

11th Admissions 2022

Maharashtra FYJC Admission 2022: अखेर निकाल लागला आणि आता उत्सुकता आहे ती अकरावी प्रवेशाची. अकरावी प्रवेशासाठी शिक्षण मंडळाने ऑनलाइन सराव अर्जाची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. मॉक अर्ज! (Mock Application For 11th Admissions) अर्जाचे एकूण दोन भाग होते. पहिला भाग भरून झालेला आहे, पहिल्या भागासाठी विद्यार्थ्यांना कशाचीही प्रतीक्षा करायची गरज नव्हती परंतु दुसरा भाग हा निकालावर अवलंबून होता. आता निकाल लागलेला आहे आणि अकरावी प्रवेशाबाबत (11th Admissions) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये. राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अकरावी प्रवेशाचे पुढील वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. काय आहेत अकरावी प्रवेशाचे ठळक मुद्दे आणि वैशिष्ट्ये बघुयात…

अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया

 • शून्य फेरी– सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार, याचदरम्यान व्यवस्थापन इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
 • नियमित फेरी– शून्य फेरीनंतर तीन नियमित फेऱ्यांचे आयोजन. प्रत्येक फेरीवेळी कॉलेज पसंतीक्रम बदलता येणार
 • विशेष फेरी- नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रवेश प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत संधी.
 • अतिरिक्त विशेष फेरी– एटीकेटी आणि प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी. द्विलक्षी विषयांचे प्रवेश समांतर प्रवेश प्रक्रिया राबवून पूर्ण केले जाणार.

ठळक मुद्दे

 • यंदा नियमित प्रवेशफेऱ्या आणि विशेष फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.
 • नियमित फेरीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी शून्य फेरी घेतली जाणार असून या फेरीत प्रवेश होणार नसले तरी गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
 • मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशाची सुरुवात झाली असून आतापर्यंत मुंबई विभागातून 2 लाख 40 हजार 569 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
 • लवकरच कॉलेज पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून शून्य फेरीवेळी विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीसाठी प्रवेश अर्ज भरणे, कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.
 • पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन जुलैमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
 • विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्कासह 30 जूनपर्यंत अर्ज भरू शकतात
 • 1 जुलैपासून ते 4 जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.
 • विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर ऑनलाइन परीक्षा अर्ज भरू शकतात

यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, कॉलेजांमधील भौतिक सोयीसुविधा यांची तपासणी सुरू असल्याने प्रवेशाचे पुढील वेळापत्रक लटकले आहे. येत्या दोन दिवसांत हे काम आटोपल्यावर गुणवत्ता याद्या कधी जाहीर होणार याविषयीचे सविस्तर वेळापत्रक दिले जाणार आहे.


FYJC Online Admission 2022

Maharashtra FYJC Admission 2022: Maharashtra Fyjc Admission 2022 Information Booklet On Website For Students. The Booklet is available on http://11thadmission.org.in & dydemumbai.com. Check here more dteails about Maharashtra FYJC Admission 2022. Further details are as follows:-

अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आता वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. 

 • अकरावी प्रवेश प्रक्रियेचा (FYJC Admission 2022) भाग १ भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ होत होता.
 • यामुळे माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा होत होती.
 • त्यामुळे २४ जून रोजी http://11thadmission.org.in आणि dydemumbai.com या वेबसाइटवर माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • मुंबई महानगर क्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
 • हा प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आता वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.
 • त्याचप्रमाणे ज्युनिअर कॉलेजांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांचे राज्यस्तरावरून आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारचे व्हिडिओ तसेच मार्गदर्शन केंद्राची यादीही अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. विभागीय उपसंचालक कार्यालय, जवाहर बालभवन, चर्नी रोड (पश्चिम) येथे मार्गदर्शक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच ९८२३००९८४१ आणि ९९६९७११४२२ हे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध केले आहेत. त्याचप्रमाणे [email protected] या ई-मेलवर सपंर्क करावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी केले.


FYJC Online Application Part 2

Maharashtra FYJC Admission 2022 : FYJC Online Application part 2 is likely to begin on the 27th of June 2022. The schedule for the first round of admissions will be announced soon, said Meena Shendkar, Secretary, 11th Central Online Admission Process. Further details are as follows:-

अकरावी प्रवेशासाठीच्या अर्जाचा दुसरा भाग (FYJC Online Application part 2) भरण्याच्या प्रक्रियेला येत्या सोमवारपासून (२७ जून) सुरुवात होण्याची शक्यता आहे. अजूनही काही कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली नसल्याने प्रवेश प्रक्रियेला आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात सुरू होणारी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच प्रवेशाच्या पहिल्या फेरीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली.

 • दहावीचा निकाल (SSC Result 2022) लागून आता जवळपास आठवड्याचा कालावधी उलटला आहे.
 • त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्जाचा दुसरा भाग कधी भरला जाईल, या प्रतीक्षेत आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • अनेक महाविद्यालयांनी नोंदणी केली नसल्याने त्यांना बुधवारपर्यंत अखेरची मुदतवाढ देण्यात आली होती.
 • मात्र, बुधवारीही अनेक महाविद्यालयांनी नोंदणी न केल्याचे दिसून आले.
 • त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागेल आणि त्यानंतरच पुढील प्रवेश प्रकिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
 • त्यामुळे आता अकरावी प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना आणखी तीन ते चार दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
 • पुढील दोन दिवसांमध्ये अकरावीचे पहिल्या फेरीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
 • यामध्ये अर्जाचा दुसरा भाग भरण्याची मुदत, त्यानंतर प्रवेशांची गुणवत्ता यादी आणि पहिल्या फेरीच्या प्रवेशाचा कालावधी आदींचा समावेश असणार आहे.
 • सध्या नोंदणी झालेल्या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शेंडकर यांनी नमूद केले.

पुढील दोन दिवसांमध्ये अकरावी प्रवेशांचे चित्र स्पष्ट होईल. पहिल्या फेरीपर्यंतचे वेळापत्रक आम्ही जाहीर करणार आहोत. अजूनही महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ही नोंदणी पूर्ण होताच पुढील प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांपर्यंत लवकरच प्रवेशांचे वेळापत्रक पोहोचवले जाईल.

– मीना शेंडकर, सचिव, अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया


Eleventh Admission Process – Next Phase

Maharashtra FYJC Admission 2022: Maharashtra FYJC Admission next phase update!! Next Phase of the eleventh admission process will be announced soon. Further details are as follows:-

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचा सूतोवाच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी उत्सुक असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

 • दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना वेध लागले ते अकरावी प्रवेशाचे.
 • परंतु यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू न झालेली नाही.
 • त्यामुळे हजारो विद्यार्थी-पालकांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे.
 • ‘परंतु इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी धरून राबविण्यात येते.
 • तसेच ही प्रक्रिया नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत सुरू असते आणि प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात नव्याने नोंदणी करण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुली असते.
 • त्यामुळे अन्य मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे,’ असे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्य सचिव व विभागीय शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले.
 • त्यामुळे राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरीही अद्याप केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई अशा विविध शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही.
 • म्हणूनच या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

‘शिक्षण विभागामार्फत इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे पुढील वेळापत्रकासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला बुधवारपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच ऑनलाइन प्रवेश अर्ज भाग दोन आणि पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात होईल.’

– महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

महाविद्यालयांचे प्रमाणीकरण आवश्यक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतंर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जवळपास ६२ कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्याप आपले अर्ज लॉक केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. या महाविद्यालयांची यादी प्रवेश समितीने संकेतस्थळावर अपलोड केली आहे. प्रमाणीकरण झाल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक ते सर्व आदेश अपलोड करून बुधवारी (ता. २२) दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज अपलोड करावेत अन्यथा त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही,’’ अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव मीना शेंडकर यांनी दिली.


Maharashtra FYJC Admission 2022

Maharashtra FYJC Admission 2022: यंदा केंद्रीय बोर्डांचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेशाचे नेमके चित्र सांगता येत नसल्याचे प्राचार्य म्हणत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना नामवंत कॉलेजांतील प्रवेश मिळेल की नाही, याची धास्ती मात्र कायम आहे.

 • मुंबई विभागाचा निकाल यंदा ९६.९४ टक्के लागला आहे.
 • यात मुंबईतून तीन लाख ४१ हजार ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 • यामध्ये ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ७६४ इतकी आहे, तर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे एक लाख सहा हजार विद्यार्थी आहेत.
 • यातच यंदा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी अद्याप केंद्रीय मंडळांचे निकाल न लागल्याने अकरावी प्रवेशाचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
 • यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना नामवंत कॉलेजांतील प्रवेश मिळेल की नाही, याची धास्ती मात्र कायम आहे.
 • करोनामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा यंदा दोन सत्रांत झाल्या.
 • २६ एप्रिलपासून दुसऱ्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या.
 • त्या मे अखेरीस संपल्या.
 • यामुळे या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास अद्याप उशीर आहे.
 • तसेच या मंडळांना प्रथम आणि द्वितीय सत्रातील परीक्षेचे गुण एकत्र करून निकाल तयार करायचा आहे.
 • आयसीएसई बोर्डाचा निकाल जुलैमध्ये जाहीर होईल, असे सांगण्यात आले.
 • यंदा शाळांमार्फत विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात येणार आहे.
 • त्यामुळे या केंद्रीय बोर्डांचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेशाचे नेमके चित्र सांगता येत नसल्याचे प्राचार्य म्हणत आहेत.

गतवर्षी मुंबईचा निकाल मुल्यमापनावर आधारित ९९.९६ टक्के लागला. यंदा परीक्षा होऊन निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. मुंबईतील नामांकित कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थी पुढे राहतात. दरवर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजसाठी पहिल्या यादीत एसएससीचे विद्यार्थी विरुद्ध आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशीच चुरस असते. बहुतांश नामवंत कॉलेजांतील दोन तुकड्या अनुदानित आहेत. त्याच तुकड्यांत गुणवंताना प्रवेश मिळतो असे दरवर्षीचे चित्र आहे. त्यानंतर मात्र विनाअनुदानित तुकडीचा आधार घ्यावा लागतो. टक्केवारीच कमी असल्याने तिथेही प्रवेश मिळत नाही, अशीही परिस्थिती दरवर्षीची आहे. सर्व मंडळाचे निकाल जाहीर झालेले नाहीत याची चिंता आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना असणार आहे. निकालाचा कल पाहूनच अनेक विद्यार्थी व पालक अर्ज करतात. यंदा तशी परिस्थिती नसल्याने वाट पाहावी लागणार आहे.

द्वितीय श्रेणीची चुरस

यंदा द्वितीय श्रेणी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने या प्रवेशासाठीही चुरस पाहावयास मिळणार आहे. ४५ ते ६० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८४ हजार ७०२ इतकी आहे. हे प्रमाण एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या २३.८१ टक्के आहे. यामुळे या श्रेणीत प्रवेशासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.


Maharashtra FYJC Admission 2022

Maharashtra FYJC Admission 2022: सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधिन क्रमांक २ येथील दि. २८.०५.२००९ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भाधिन शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तसेच इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने व संदर्भ क्र.१३ येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने तसेच आयुक्त, शिक्षण, पुणे यांच्याकडून शासनास प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने काही बाबी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

सविस्तर माहिती – https://bit.ly/3zEjSky


How to Fill FYJC Admission 2022 Application 

Maharashtra FYJC Admission 2022 : FYJC Part I admission process has been starting on the 30th of May 2022. Check here about How to apply for FYJC admission 2022. In most of the districts of Maharashtra, they become college-wise while giving 11th admission to the students who have passed 10th. Earlier, the online admission process was being done centrally only in Mumbai and Pune. Further details are as follows:-

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक,अमरावती या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, येत्या सोमवारपासून (दि. ३०) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी विद्यार्थी व पालकांनी अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

सोमवारपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करून ऑनलाईन अर्जात अचूक वैयक्तिक माहिती भरावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि त्यांनी भरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिले जातात. ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याचा विद्यार्थ्यांना सराव करता यावा, यासाठी शिक्षण विभागाने २३ ते २७ मे या कालावधीत लिंक ओपन करून दिली होती, मात्र फार कमी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतले जाते, तर दुसऱ्या भागात कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले जातात. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी उपलब्ध करून दिली.

 • दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश देताना महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांत ते कॉलेजनिहाय होतात. पूर्वी केवळ मुंबई, पुण्यात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती.
 • पण २०१७ पासून मुंबई एमएमआर, पुणे या दोन जिल्ह्यांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एफवायजेसी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (FYJC Online Admission 2022) राबवण्यात येते.

जिल्ह्यानुसार प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ –

Which Branches?

 • Art
 • Commerce
 • Science
 • Vocational

11th Admission  2022 – Important Documents 

सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी –

 • इयत्ता दहावीची गुणपत्रिका
 • शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट (LC)

इतर प्रवर्गांसाठी

 • इतर मागासवर्गीय, एससी, एसटी, एनटी आदी प्रवर्गांसाठी गुणपत्रिका आणि एलसी यासह विद्यार्थ्याच्या, विद्यार्थिनीच्या नावे असलेले जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

About Admission Process

१) विद्यार्थी नोंदणी (Student Registration) –

 • यासाठी विद्यार्थ्यांनी आपली बेसिक माहिती देऊन, फॉर्म भरून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे.

२) अॅप्लिकेशन – पार्ट १

 • या भागात पुन्हा नाव, पत्ता, हॉलतिकीट आदी बेसिक माहिती भरायची आहे.
 • अॅडमिशन प्रोसेसिंग फी ऑनलाइन भरायची असते.

३) ऑप्शन फॉर्म – पार्ट २

 • अकरावी ऑनलाइन अर्जांच्या दुसऱ्या भागात आपल्या पसंतीच्या दहा महाविद्यालयांची नावे भरायची आहेत.
 • पहिल्या पसंतीचे कॉलेज पहिल्या क्रमांकावर याप्रमाणे ही नावे भरावयाची आहेत.
 • अर्जांचा हा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतरच भरता येणार आहे.
 • आपल्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या महाविद्यालयातील त्या शाखेची मागील वर्षीची कट ऑफ टक्केवारी पाहून त्यात आपल्याला मिळालेले गुण बसत असतील, तरच त्या महाविद्यालयाचे नाव विद्यार्थ्यांनी अर्जात भरावे, अन्यथा त्या महाविद्यालयात प्रवेश अलॉट होणार नाही, हे लक्षात घ्यावे.

यादी करा

कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, ते मनाशी ठरवून, त्यासाठी पालकांची मदत घेऊन त्यानुसार प्राध्यान्याने किमान १० ते १५ महाविद्यालयांची यादी काढून ठेवा.


Aurangabad FYJC Offline Admission 2022

Maharashtra FYJC Admission 2022 : Aurangabad has been excluded in the circular issued by the education department regarding the 11th admission. It includes Mumbai, Pune, Nashik, Amravati, Nagpur. However, offline access will be available in Aurangabad. Further details are as follows:-

अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात औरंगाबादला वगळण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहराचा त्यात समावेश आहे. मात्र औरंगाबादमध्ये ऑफलाइन प्रवेश होतील.

 • अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार अशी चर्चा होती.
 • शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबत प्रस्ताव संचालक कार्यालयास सादर केला होता.
 • संचालक कार्यालयाकडून आढावा घेण्यातही आला.
 • त्यानुसार पुन्हा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होण्याची चर्चा सुरू झाली.
 • शहरात ऑनलाइन प्रक्रिया नको, प्रक्रियेतील विलंब इतर अडचणींमुळे विद्यार्थी ग्रामीण भागातील कॉलेजांकडे जात असल्याचे सांगण्यात येते.
 • त्यावरून शिक्षक, संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.
 • आमदार सतीश चव्हाण यांनीही शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच राबविण्यात यावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात औरंगाबादला वगळण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहराचा त्यात समावेश आहे. २०१७ पासून औरंगाबादचा समावेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत होत्या. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी, पालकांसाठी अत्यंत किचकट व वेळखाऊ असल्याचे सांगत विरोध झाला होता. शिक्षण विभागाच्या निर्णयाचे आमदार चव्हाण यांनी स्वागत केले.

Aurangabad has been excluded in the circular issued by the education department regarding the 11th admission. It includes Mumbai, Pune, Nashik, Amravati, Nagpur. From 2017, Aurangabad was included in the online admission process. However, a large number of seats remained vacant. The online admission process was opposed, saying it was too complicated and time consuming for students and parents. MLA Chavan welcomed the decision of the education department.


11th Std Admission Application 

Maharashtra FYJC Admission 2022 : Students will be able to fill part 1 of the application form from May 30 for the eleventh admission. After setting the password by filling part 1, students will have to fill part 2 of the application at the pre-admission round. Students will have to give preference orders of a minimum 1 and maximum 10 colleges. Further details are as follows:-

अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने!! अर्जाचा पहिला भाग 30 मेपासून

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० मे पासून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. भाग १ भरून पासवर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्यावेळी अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० कॉलेजांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर घेण्यात येणारी प्राधान्य फेरी यंदा रद्द करण्यात आली आहे.

 • सुधारीत वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने (Directorate of Secondary and Higher Secondary Education) प्रसिद्ध केले आहे.
 • यानुसर विद्यार्थ्यांना ३० मे पासून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे.
 • विद्यार्थ्यांना भाग १ भरण्यापूर्वी २३ ते २७ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना सरावही करता येणार आहे.
 • तत्पूर्वी कॉलेजांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
 • संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना यंदा केंद्रीय प्रवेश फेऱ्यांमधून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित कॉलेजांशी संपर्क साधून प्रवेश घेता येणार आहे.

After setting the password by filling out part 1, students will have to fill out part 2 of the application at the pre-admission round. Students will have to give a preference order of a minimum 1 and maximum of 10 colleges. Meanwhile, the priority round for the 11th admission, which was held after the regular rounds, has been canceled this year, sources said. As there is no mention of this round in the schedule published by the Directorate of Secondary and Higher Secondary Education, there is talk of cancellation of this round in the field of education.

भाग १ भरून पासवर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्यावेळी अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० कॉलेजांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर घेण्यात येणारी प्राधान्य फेरी यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात या फेरीबाबत कोणताही उल्लेख नसल्याने शिक्षण क्षेत्रात ही फेरी रद्द केल्याची चर्चा रंगली आहे.

कॉलेजांतील जागांचे गणित

कोटाबिगर अल्पसंख्याक अल्पसंख्याक विद्यालये

 • केंद्रीय फेरी ८५ टक्के ३५ टक्के
 • संस्थांतर्गत १० टक्के १० टक्के
 • व्यवस्थापन ५ टक्के ५ टक्के
 • अल्पसंख्याक लागू नाही ५० टक्के

TimeTable 

 • – विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी सराव – २३ ते २७ मे
 • – ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज भाग १ भरणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळविणे – ३० मेपासून पुढे
 • – भाग २ भरणे – दहावीच्या निकालानंतर याबाबतच्या तारखा जाहीर केल्या जातील.

11th Admission Updates

Maharashtra FYJC Admission 2022 : Students who have appeared for the Class X examination are eagerly awaiting the results of the Eleventh Online Admission Process. However, the procedure for filling up the first part of the Eleventh Admission Application has been changed. Students will now be able to practice applying from 23rd May. Further details are as follows:-

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची जशी उत्सुकता आहे, तशीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने अद्याप या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आधी जाहीर केलेल्या शेड्युलनुसार १७ मे पासून अर्ज भरायचे होते, मात्र आतात २३ मे पासून डेमो अर्ज भरता येणार आहेत. 

 • विद्यार्थ्यांना आता २३ मेपासून अर्ज भरण्याचा (Mock Form Filling) सराव करता येणार आहे.
 • दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जाचा पहिला भाग (FYJC Form Part 1); तर २० जूननंतर अर्जाचा दुसरा भाग (FYJC Form Part 2) प्रत्यक्ष भरता येणार आहे.
 • याबाबतचे सुधारित वेळापत्रक (11th Admission Timetable) सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर करणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशा दृष्टीने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, दहावीचा निकाल २० जूनला जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासंदर्भात शाळा आणि मार्गदर्शन केंद्राचे उद्बोधन वर्ग घेण्यात आलेले आहेत. यंदा यात भर म्हणून ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे पालकांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्याऐवजी (एफसीएफएस) फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे.

कॉल सेंटरमधून मदत 

 • अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना २३ मेपासून संधी दिली जाणार आहे.
 • विद्यार्थ्यांनी अर्ज कसा भरायचा याचा सराव करावा.
 • प्रवेशासाठीचे कॉलसेंटरदेखील त्याच दिवशी सुरू करण्यात येणार आहे.
 • त्यामुळे विद्यार्थी-पालकांना कोणत्याही शंका किंवा अडचणी आल्यास कॉलसेंटरच्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहेत, असे अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशप्रक्रिया मे अखेर पर्यत होणार सुरु  

मागच्या वर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे निकाल जाहीर करून अकरावीचे प्रवेश करण्यात आले होते. मात्र यावर्षी कोरोना संकट कमी झाल्याने साळा तेथे केंद्र पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याविषयी उत्सुकता आहे. ही उत्सुकता मे अखेरीस संपुष्टात येणार असून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मे अखेरपर्यंत अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली.

Maharashtra FYJC Admission 2022


FYJC Practice Application Process

Maharashtra FYJC Admission 2022: Eleventh online admission is also likely to be delayed due to the delay in the second session of CBSE, ICSE board exams. The CBSE Class X examination will continue till May 24, while the ICSE Board exam will continue till May 23. Therefore, the Directorate of Education has postponed the process of filling up the 21st practice application, informed the Director of Education, Mahesh Palkar. Students will be informed about the decision in 3 to 4 days, he added. Further details are as follows:-

CBSE, ICSE मंडळाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा लांबल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेशही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. CBSE दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत, तर ICSE मंडळाची 23 मेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे शिक्षण संचलनालयाकडून अकरावीचे सराव अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली. 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना अवगत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra FYJC Admission 2022


FYJC Online Admission 2022

Maharashtra FYJC Admission 2022: The 11th Admission process has been started by the Department of Education and the information about the documents required for admission has been announced through a circular. Further details are as follows:-

​​शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला (11th Admission) सुरुवात करण्यात आली असून, प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयीची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

अकरावी प्रवेशासाठी (FYJC Admission 2022) आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, अर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र अकरावी प्रवेशासाठीच्या पोर्टलवर अपलोड करावी लागणार असून प्रवेश अर्ज भरतेवेळी ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 • शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला (11th Admission) सुरुवात करण्यात आली असून, प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयीची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
 • या पत्रकानुसार इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), व्हीजेएनटी (भटके विमुक्त), विशेष राखीव प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
 • याचप्रमाणे व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे.

Students from Economically Weak Sections (EWS) are required to submit a Certificate of Financial Weakness. Students should start the process of getting all these documents, the Deputy Director of Education has suggested. Apart from this, the disabled, the project affected, the earthquake affected, the grandparents of the veterans, the children of the freedom fighters and the children of the transferred personnel will also have to submit the relevant documents. All these documents will be verified online and if required, verification will be done offline at school level.

विद्यार्थी, पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन

‘प्रवेशासाठी अपलोड करायची वेगवेगळी कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची याबाबत शिक्षण विभागाकडून विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या ११ मे रोजी यू ट्यूब, फेसबुक या माध्यमातून या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाणार आहे,’ अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.


FYJC Admission 2022

Maharashtra FYJC Admission 2022: Preparations have started for the admission process in the coming academic year 2022-23 for the students who have passed 10th. The probable schedule of eleven online admissions has been announced. Regular three of admissions this year; There will also be a special round. Further details are as follows:-

दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन; तसेच एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.

१७ मेपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीच्या अर्जाचा पहिला भाग आणि दुसरा भाग दहावीचा निकाल (SSC Result 2022) लागल्यानंतर भरता येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन; तसेच एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रांतील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे होतात. गेल्या शैक्षणिक वर्षाची अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झालेली आहे. राज्य मंडळाची दहावीची परीक्षा चार एप्रिलला संपली आहे.

त्यामुळे दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना दिलेल्या सूचनांनुसार, अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया २०२२-२३ साठी पूर्वतयारी त्वरित सुरू करण्यात यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन, त्यानुसार नियोजन करावे. विद्यार्थी, पालक यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशांची लगबग येत्या महिन्यात सुरू होणार असून, विद्यार्थ्यांनी अचूक अर्ज भरण्यासाठी सरावाची प्रक्रियादेखील होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अधिक माहितीसाठीhttps://11thadmission.org.in/ या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काढून ठेवावीत 

 • मागासवर्गीय किंवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता येण्यासाठी आवश्यक असलेली जात प्रमाणपत्र, जात वैधता अशी गरजेप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अगोदरच काढून ठेवायची आहे.
 • विद्यार्थ्यांना कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सरकारी यंत्रणांना विनंती करणे, माध्यमिक शाळांनी नववी-दहावीमधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतानाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकर यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक | Maharashtra FYJC Admission 2022

 • – विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे मार्गदर्शन : एप्रिल २०२२
 • – अर्जाचा भाग एक भरणे (सराव) : १ ते १४ मे
 • – विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर नोंदणी, अर्ज भाग एक भरणे, तपासणे : १७ मे ते दहावीच्या निकालापर्यंत
 • – ज्युनिअर कॉलेज नोंदणी : २३ मे ते दहावीच्या निकालापर्यंत
 • – अर्जाचा भाग दोन भरणे : दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस
 • – कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू : दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस
 • – प्रवेश फेऱ्या व अ‍ॅलॉटमेंट प्रवेश
 • – नियमित फेरी एक : १० ते १५ दिवसांचा कालावधी

Maharashtra FYJC Admission 2021

Maharashtra FYJC Admission 2021 : Even after the completion of the eleventh admission process in seven rounds, 270 students from Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Amravati have requested for the eleventh admission. The Directorate of Education has clarified that the concerned students will be admitted to the round which will be held from 28th to 30th December. Further details are as follows:-

सात फेऱ्यांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती येथील २७० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश देण्याची विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यात नाशिकसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नागपूर या महानगरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अकरावीच्या प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. जवळपास सात फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, त्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती येथील २७० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश देण्याची विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

The students have presented to the Deputy Director of Education the reasons for not getting admission due to uncertainty due to Corona situation, untimely receipt of information, migration of parents. For all these reasons, the decision was taken to ensure that no student is denied admission, the Directorate of Education said. This round will be conducted at the level of Deputy Director of Education and the details of vacancies will be shown to the students and their convenience will be made available for college admission. It will be the responsibility of the school-junior colleges to complete the course of these late admission students.

अशी असणार प्रक्रिया

विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. २८) नवीन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, शिक्षण उपसंचालक स्तरावरून विद्यार्थ्यांना रिक्त जागा दाखवणे, विद्यार्थ्यांची पसंती आणि रिक्त जागा तपासून प्रवेश द्यावा लागणार आहे. २९ ते ३० डिसेंबर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ३० डिसेंबरला संबंधित महाविद्यालयाला झालेले प्रवेश वेबसाइटवर अपलोड करावे लागणार आहेत.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड