महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा निकाल उपलब्ध; डाउनलोड करा मेरिट लिस्ट | Maharashtra Agriculture Services Result
Maharashtra Agriculture Services Result
Maharashtra Agriculture Services Merit List
Maharashtra Agriculture Services Result: The Maharashtra Public Service Commission announced the General Merit List within just an hour after the completion of the Maharashtra Agricultural Services Main Exam Interview Program. Interviews of 626 candidates who qualified for interview based on the result of the written examination of Maharashtra Agricultural Service Main Examination-2021 were held at Yashda, Pune for a period of four days from 10th to 13th April 2023.
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या ६२६ उमेदवारांच्या मुलाखती यशदा, पुणे येथे दिनांक १० ते १३ एप्रिल २०२३ या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. सदर परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी २०३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील असे आयोगाने कळविले आहे.
Adv. No. 067/2022 Maharashtra Agriculture Services Main Examination 2021-General Merit List
Maharashtra Agriculture Services Answer Sheet
Maharashtra Agriculture Services Result – The Maharashtra Public Service Commission has published the result of MPSC Agriculture Services written examination on the Commission’s website on 30th December, 2022. For candidates who are not qualified for the interview, their marks and scanned answer sheets have been made available under ‘View’ in front of the name of the respective examination in the candidate’s account. Students can apply for retotalling if you want to apply you need to submit the application for retotaling.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विषयांकीत लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ३० डिसेंबर, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर निकालाद्वारे मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जा.क्र.67/2022 व 77/2022-गुणपत्रक व उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच,जा.क्र.67/2022 करीता फेरपडताळणीची लिंक दि.13 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढिलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे:-
(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉग-इन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या एक किंवा जास्त विषयाची निवड करून ‘Save’ बटणवर क्लिक करावे.
(५) निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक १३ जानेवारी, २०२३ ते दिनांक २२ जानेवारी, २०२३ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००- १२३४- २७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.
Maharashtra Agriculture Services Result
Maharashtra Agriculture Services Result – Maharashtra Public Service Commission has Published The result of the Maharashtra Agricultural Service Main Examination- 2021 conducted on 01 October 2022 on the commission website. After the publication of the result interview will be conducted. The detailed interview schedule will be released soon on the Commission’s website www.mpsc.gov.in. Students can download Maharashtra Agriculture Services Result from below Link :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा- २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार खालील लिंक वरून निकाल डाउनलोड करू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
- प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
- प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ( आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्र. ६.४ कृपया पहावी.)
- प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीकरीता बोलविण्यात येणाऱ्या खेळाडू उमेदवारांबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेतील ४.१३ नुसार खेळाडूसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल.
- प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.
- मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
Maharashtra Agriculture Services Result Link – LIST OF QUALIFIED CANDIDATES
Table of Contents