आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप!
Maharashtra Aarogya Vibhag Exam
Maha Aarogya Bharti Update 2021 – प्राप्त बातमी नुसार, आरोग्य विभागातील भरतीसाठी रविवारी झालेल्या परीक्षेचे नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. राज्यातील परीक्षा केंद्रांवर नियोजनाअभावी मोठा गोंधळ उडाला, तर नागपुरातील काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.
या गोंधळामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे खासगी कंपनीमार्फत परीक्षा घेतल्याने हा गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत परीक्षार्थी आणि काही संघटनांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रही देण्यात येणार आहे.
आरोग्य विभागात साडेआठ हजार पदांसाठी रविवारी राज्यातील जिल्हा आणि तालुका केंद्रांवर दोन सत्रांत ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून राज्य शासनाच्या ‘महाआयटी’ने नेमलेल्या खासगी कंपन्यांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली; परंतु परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याने आरोग्य विभागाच्या पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपूर केंद्रावर करण्यात आलेली प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार, अनेक उमेदवारांना परीक्षेच्या वेळेपर्यंत परीक्षा खोलीत प्रवेश न मिळणे, अनेक केंद्रांवर बैठक व्यवस्थेअभावी नियम धाब्यावर बसवून एकाच बाकावर दोन ते तीन उमेदवारांना बसवणे अशा अनेक तक्रारींमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत ‘मास कॉपी’, तोतया उमेदवारांना बसवणे असे गैरप्रकार झाल्याचा आरोपही होत आहे. अनेक केंद्रांतील बाकांवर उमेदवारांचे बैठक क्रमांकच नसल्याचे आढळले. एका केंद्रावर चक्क जमिनीवर बसवून परीक्षा घेण्यात आल्याने परीक्षा नियोजन करणारे राज्य सरकार आणि खासगी कंपनीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
नेमकं झाले काय?
* अहमदनगर येथील परीक्षा खोलीत एका बाकावर किमान आठ ते दहा परीक्षार्थी एकत्रित पेपर सोडवत असल्याचे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रात दिसत आहे. पाठीमागच्या बाकावरही तशीच बैठक व्यवस्था असल्याचे छायाचित्रात दिसते.
* अनेक केंद्रांवर बैठक क्रमांक नसल्याने कोणी कुठेही बसा असा प्रकार होता, तर दापोली येथील परीक्षा केंद्रावर उमेदवार सकाळी १० वाजता पोहोचले. मात्र, केंद्रच बंद होते.
* परीक्षेच्या वेळेपर्यंत केंद्रच उघडले नसल्याच्या तक्रारी राज्यातील अनेक केंद्रांवरून आल्या आहेत. सरळसेवा भरती असतानाही केंद्रांवर पोलीस संरक्षणही नव्हते, तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर एक तास ताटकळत उभे राहावे लागल्याने उशिरा परीक्षा सुरू झाली.
* औरंगाबादमधील काहीकेंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याचा आरोप आहे, तर काही केंद्रांवर गैरप्रकार झाल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला. पोलिसांना पाचारण करावे लागले.
ही परीक्षा रद्द व्हायला हवी… मागच्या वेळेला वनरक्षक भरतीला पण गैरप्रकार उघडकीस आले होते आणि संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुध्दा केले, पण त्याच काही फायदा झाला नाही… पण आता पुरे.. आता जेव्हा पर्यंत परीक्षा रद्द करणार तेव्हा पर्यंत विरोध चालू ठेवा विद्यार्थी मित्रहो…
पुढील आरोग्य विभागाचे from कधी येणार
Mi chandrapur district mdhil candidate ahe, maza paper sunday la amravatila hota mi shanivarla wardhe varun amravatila janyasathi nighalo ४ wajta pn wardha ithun amravatila janyasathi buses band zalya… Tyamule mi amravatila jau shklo nhi ani exam pn dru shklo nhi… Sir sunday la paper ghyaycha hota tr busses band krayla pahije navhtya.. Karan eka centre vr baheril jilyatun pn vidhyarthi exam la yet astat tr mg tyani tya exam centre vr jaych ka sir ani exam kshi dyaychi.. Mhnun ya aarogya vibhagachi exam radd kravi v punha ekda changl niyojan krun exam ghyavi.. Hi vinanti.. Mi khup abhyas kela pn exam deu n shklyamule maztavr aatmhatya kraychi vel aali sir…..
नवापूर चे केंद्रांवर काहीही गडबड झालं नय
आरोग्य विभागाचे परिक्षा ज्या केन्द्रवर सुरक्षित झाले आहे त्या केन्द्राचे रिझल्ट आला पाहिजे तिथे कोणतीही गडबड झालं नय