महानगरपालिकेत अनेक पदे रिक्त !
MahaNagar palika Bharti 2020
कोरोना प्रादुर्भाने सध्या सरकारने नोकरभरतीला दिलेल्या स्थगितीमुळे शहरवासीयांना सुविधा देणारी महानगरपालिका, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलिस दल, ग्रामीण भागात सुविधा देण्यासाठी कार्यरत असलेली जिल्हा परिषद, शिक्षण क्षेत्रातील पाच हजारांहून अधिक पदांच्या भरतीला कात्री लागली आहे. भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो तरुणांच्या रोजगारावर ही कुऱ्हाड कोसळली आहे. शालेय व उच्च शिक्षण विभागात तीन हजार, जिल्हा परिषदेत १७०० तर महापालिकेत ११०० रिक्त पदे असून यामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कमी मनुष्यबळ परंतु कामांची यादी मात्र लांब, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शिक्षण क्षेत्रात ३००० जागा रिक्त
शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासन विभागात सध्या २२४ जागा रिक्त असून विविध अधिविभागामध्ये १२१ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्ह्यातील शालेय शिक्षकांच्या जवळपास १२०० जागा रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अखत्यारितील कॉलेजांमध्ये १५०० प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर नियुक्ती करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया स्थगित आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षक, प्राध्यापकांच्या तसेच प्रशासनातील सर्व रिक्त जागा भरती करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल १,१०० पदे रिक्त आहेत. पुढील काळात राज्य सरकारने नोकरभरती न करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. त्यामुळे आहे त्या पदांवरच महापालिकेचे कामकाज सुरू राहणार आहे. विविध विभागांमध्ये ५,५०० कर्मचाऱ्यांचे रोस्टर आहे. शहराचा विस्तार वाढल्यानंतरही रोस्टरमध्ये बदल झालेला नाही. त्याचवेळी वेळोवेळी निवृत्त झालेले तसेच अन्य सरकारी कार्यालयांत नियुक्ती झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे येथील पदे रिक्त राहिली. आस्थापना, पवडी, अग्निशमन, पाणीपुरवठा, आरोग्य, इस्टेट, परवाना, नगररचना, ऑडिट, अतिक्रमण अशा अनेक विभागातील प्रमुखांची पदे रिक्त आहेत. पदांचा कार्यभार अन्य विभागप्रमुख किंवा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपवला आहे.
I need a job I have completed ITI mech draughtsman please know me
Shikshak bharti kevapasun chalu hoil, ani to form offline ki online bharaycha ahe??
आरोग्य विभागातील कंत्राटी पदांचे काय झाले ? फॉर्म भरून घेतले आणि निकाल नाही लागला . कधी लागणार?
वरिष्ट लिपिक पदासाठी पात्रता काय लागते ,पुणे महानगरपालिका येथे
Mega bharti kevha hoil