जाहिरात प्रकाशित – महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात कनिष्ठ लेखापाल पदांच्या 75 जागांसाठी भरती – Mahakosh Bharti 2024-25

Mahakosh Bharti 2024-25

Lekha Koshagar Bharti 2024

Mahakosh Bharti 2025: Applications are invited from eligible candidates only through online mode for appointment to 75 vacant posts of Junior Accountant (Group-C) [in pay scale S-10-29200-92300] in the Joint Director, Accounts and Treasury, Pune Division, Pune Regional Division of the Government of Maharashtra. The online application will start from 31st December 2024 and the last date for application is 31st January 2025. To get all the further updates regarding Mahakosh recruitment, Mahakosh Bharti 2025 on time, Visit MahaBharti.in

महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागातंर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे, कोषागार कार्यालय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) [वेतनस्तर एस-१०-२९२००-९२३०० या वेतनश्रेणीत] या संवर्गातील ७५ रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३१ डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावकनिष्ठ लेखापाल (गट-क)
  • पदसंख्या७५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 19 – 38 वर्षे 
  • अर्ज शुल्क
    • अराखीव (खुला) प्रवर्ग -१०००/-
    • राखीव प्रवर्ग-९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज सुरू होण्याची तारीख३१ डिसेंबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ जानेवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://mahakosh.maharashtra.gov.in/

Lekha Koshagar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ लेखापाल (गट-क) 75

Educational Qualification For Lekha Koshagar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल (गट-क) ()सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी

(२) तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

Salary Details For Lekha Koshagar Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ लेखापाल (गट-क) pay scale S-10-29200-92300

How To Apply For Lekha Koshagar Application 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.
  • अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वेळापत्रक –  Mahakosh  Lekhapal Bharti 2024 Schedule

कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. ३१.१२.२०२४ रोजी ११:०० वाजल्यापासून दि. ३०.०१.२०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि. ३०.०१.२०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
२. प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल
३. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल

Mahakosh Mega Bharti Vacancy Details

Mahakosh Mega Bharti Vacancy Details

किमान आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक अर्हता आणि तपशील – Mahakosh Recruitment 2024 Eligibility

पद किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता वयोमर्यादा परीक्षा शुल्क
कनिष्ठ लेखापाल 1. साविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
2. तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किया इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र,
किमान १९ वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी: ३८ वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गासाठी: ४३ वर्षे
दिव्यांग व अनाथ: ४५ वर्षांपर्यंत शिथिलता
(सर्वोच्च शिथिलता लागू)
खुला प्रवर्ग: ₹१०००/-
राखीव प्रवर्ग: ₹९००/-
माजी सैनिक: शुल्क माफ

२. वरील राखीव/बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करुन पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
३. उपरोक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथासाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता गुणवता क्रमांकानुसार भरली जातील.
सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृ‌ष्ट्या मागास वर्ग अधिनियम दिनांक रु.०२.२०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २७.०२.२०२४ संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील भा. न्यायालयाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारसी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधिन राहून करण्यात येतील.

वयोमर्यादा -१९ वर्षापेक्षा कमी नसावे, खुल्या वर्गातील व्यक्तिसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तिसाठी ४३ वर्षे. दिव्यांग व अनाथ व्यक्तिसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत शिथिलतम राहील राहील, मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथीलतेची सवलत यापैकी कोणतीही अधितम असलेली एकच सवलत देय राहील.
परीक्षा शुल्क – अराखीव (खुला) प्रवर्ग १०००/- राखीव प्रवर्ग-९००/- माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.

प्रस्तुत जाहिरात ही परिक्षेसंदर्भातील संक्षिप्त जाहीरात असून अर्ज स्वीकारण्याची फदत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरुप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील दिनांक २६.१२.२०२४ रोजी https://mahakosh.maharashtra.gov.in/ सर्वसाधारण सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे कृपया अवलोकन करावे, भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूबना बगैरे https://mahakosh.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिध्द करण्यात येतील, उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांना राहतील व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. याचाबत कोणासह कोणताही दावा करता येणार नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahakosh.maharashtra.gov.in Notification 2024

PDF जाहिरात
https://shorturl.at/BNtmX
ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/6EEpe
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahakosh.maharashtra.gov.in/

The recruitment notification has been declared from the Lekha Koshagar Department for interested and eligible candidates. Online applications are invited for the Junior Accountant (Group-C) posts. There are 75 Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for Mahakosh Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about Mahakosh Bharti 2025 Details, Lekha Koshagar Bharti 2025, Mahakosh Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.

Mahakosh Bharti 2024-25 Details

🆕 Name of Department Lekha Koshagar
🔶 Recruitment Details Mahakosh Bharti 2024
👉 Name of Posts Junior Accountant (Group-C)
📍Job Location Maharashtra
✍Application Mode Online
Official WebSite https://mahakosh.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Mahakosh Bharti 2024

Junior Accountant (Group-C) (1) Degree in any discipline from a statutory university

(2) Technical Qualification Govt Commercial Certificate with minimum speed limit of 30 words per minute of Marathi Typing or 40 words per minute of English Typing.

Age Criteria Mahakosh Recruitment 2025

Age Criteria 19 – 38 Yr

Salary Details For Mahakosh Job 2024

Junior Accountant (Group-C) [S-10-29200-92300]

Application Fee For Mahakosh Vacancy 2024

Application fee  Unreserved (Open) Category -1000/-
Reserved Category -900/-

Mahakosh Vacancy Details

Junior Accountant (Group-C) 75

All Important Dates Lekha Koshagar Recruitment 2025

⏰Last Date  31st January 2025

mahakosh.maharashtra.gov.in Bharti 2025 Important Links

📑Advertisement  READ PDF
???? Online Application Link  Apply Online
✅ Official Website Official Website

 


Mahakosh Recruitment 2024

Mahakosh Maharashtra Bharti 2024 – महाराष्ट्र शासन, वित्त विभागांतर्गत लेखा व कोशागारे संचालक यांच्यामार्फत लेखाविषयक काम करणारे लिपिकवर्गीय (तृतीय श्रेणी) कर्मचाऱ्यांसाठी १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट- क सेवा विभागीय परीक्षा (भाग एक आणि दोन) ही डिसेंबर मध्ये प्रस्तावित आहे. तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबरपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालय प्रमुखांकडे जमा करावेत, असे आवाहन सहसंचालक महेश बच्छाव यांनी केले आहे.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परीक्षेसाठी पात्रता

(१) महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा नियम २०१२, अधिसूचना दि.०३.०३.२०१२ नियम ३ (ख) नुसार भाग १ करीता व (ग) (घ) भाग-१ व भाग-२ करीता तसेच ३ (ड) व (च) नुसार भाग-२ च्या परीक्षेस बसण्यास कर्मचारी पात्र असतील. तथापि, नियम ३(व) नुसार सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे, इतर विभागातील शासकीय कर्मचारी हे लेखा व कोषागारे गट-क सेवा किंवा स्थानिक निधी लेखा गट-क सेवा यांच्या संदर्भात रोपाप्रवेश किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास पात्र असणार नाहीत.

इतर सूचना :-

৭) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक इएक्सएम-१०८०/१७, दिनांक १७ एप्रिल, १९८० नुसार महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) मराठी माध्यमातूनच घेण्यात येणार आहे. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी ही बाब, परीक्षार्थीच्या निदर्शनास आणावी.

२) मराठीतून नियम पुस्तके तयार नसल्यास परिक्षार्थीनी उत्तरे लिहितांना, जिथे कोणताही नियम उद्धृत करणे आवश्यक आहे तिथे तो नियम इंग्रजीतून लिहिण्यास हरकत नाही. मराठी प्रतिशब्द आठवत नसतील तेथे इंग्रजी शब्द वापरण्याची मुभा उमेदवारांना देण्यात येत आहे. मात्र उत्तराचा बाकीचा मजकूर मराठीतूनच लिहिणे अनिवार्य आहे.

३) उपरोक्त अधिसूचनेनुसार महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षेतील भाग-२ मधील पेपर क्रमांक ४ इंग्रजी ऐवजी मराठी भाषेमध्ये घेण्यात येणार असून सदर प्रश्न पत्रिकेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील:- १. दिलेल्या प्रकरणांचा सारांश लिहिणे गुण ४० २. पत्राचा मसुदा तयार करणे गुण ४० ३. शब्दांचा उपयोग करणे आणि वाक्यांची दूरुस्ती करणे गुण २०

परीक्षेस बसण्यासाठी अर्ज करण्याची पध्दती :-

१) सदर परीक्षेस बसण्यासाठी परवानगी मागण्यांबाबतच्या अर्जाचा नमुना या परिपत्रकासोबत जोडण्यात आला आहे. शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील उमेदवारांना खाली नमूद केलेल्या जिल्हयांकरीता त्यांच्यासमोर दर्शविलेल्या केंद्रामध्ये सदर परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना नेमून दिलेली परीक्षा केंद्रे बदलता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

२) महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) सन २०२४ चे वेळापत्रक यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.

३) १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) सन २०२४ साठी बसू इच्छिणा-या उमेदवारांना अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये दिनांक दि.०८/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) किंवा त्यापूर्वी त्यांच्या कार्यालय / विभागप्रमुखांना सादर करावेत. जिल्हा परिषद कर्मचा-यांचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत. ड) कार्यालय / विभाग प्रमुखांना सूचना १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुखांना विनती करण्यात येते की, १० वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग-१ व भाग-२) सन २०२४ या परीक्षेस बसू इच्छिणा-या उमेदवारांचे अर्ज २ प्रतीत स्विकारण्यात यावे. सदर अर्जाची नियमानुसार छाननी करुन मुळ प्रत आपल्या प्रादेशिक विभागातील संबंधीत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे यांचेकडे (खालीलप्रमाणे नमूद केलेल्या कार्यालयात) दि.१४/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा पध्दतीने पाठविण्यात यावेत. उमेदवारांचे अर्ज कार्यालय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने प्रमाणित करावेत. त्यांच्या कार्यालयातील अन्य अधिकाऱ्यांनी हे अर्ज प्रमाणित केल्यास ते स्विकारण्यात येणार नाही.

दि.१४/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) नंतर विभागीय सहसंचालकाकडे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही कारणास्तव करण्यात येणार नाही, याची सबंधीत कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी.

महत्वाचे मुद्दे :- १. परीक्षेस बसणाऱ्या उमेदवाराने त्यांच्या कार्यालय प्रमुखाकडे दि. ०८/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) अर्ज सादर करावा व त्यांच्या कार्यालय प्रमुखानी संबंधित विभागीय सहसंचालक यांचेकडे दि. १४/११/२०२४ (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत) अर्ज सादर करावे.

Download Mahakosh Bharti PDF 2024

Mahakosh Maharashtra Bharti 2024 – प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्रातील महोत्सवाअंतर्गत राज्यातील विविध विभागांत ७५ हजार जागांसाठी भरती करण्यात येणार असून, लेखा व कोषागार विभागातील गट क पदांचाही यात समावेश आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया लकरच अपेक्षित आहे.  यासाठी ऑक्टोबर २०२३ ला जाहिरात काढायची होती; पण दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला नसल्याने लेखा व कोषागार विभागातील ६१७ पदांसाठीची भरती रखडली आहे. कनिष्ठ लेखापाल पदाच्या रिक्त जागांसाठी तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत. विभागनिहाय कनिष्ठ लेखापाल पदाच्या ६१७ जागा भरण्यासंबंधीची कार्यवाही अजूनही प्रलंबित आहे. वित्त विभागाने दहा महिन्यांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे सहसंचालकांना सूचित केले होते; परंतु आजपर्यंत त्यासाठी मुहूर्त सापडला नाही. राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण, पुणे, अमरावती विभागात भरतीसंबंधाने हालचाली सुरू असल्या तरी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात कुठलीच प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजागारांना अजूनही वाट पाहावी लागत आहे.

 

विभागनिहाय कनिष्ठ लेखापालाच्या जागा लेखा व कोषागार विभागात विभागनिहाय भरती करण्यात येत असलेल्या रिक्त जागा अशा- कोकण विभाग १७८, पुणे विभाग ६६, नाशिक ३९. छत्रपती संभाजीनगर ३६, अमरावती ४७, तर नागपूर विभागात ५८ जागा आहेत.

 


 

Accounting Treasuries advertising is expected soon. Seats under this advertisement are expected to be – 800+. Tcs will also conduct the exam for this recruitment. More details are  given below.

 

लेखा कोषागारे जाहिरात लवकरच येणे अपेक्षित आहे. या जाहिराती अंतर्गत जागा – 424 किंवा 800 + असतील असे अपेक्षित आहे. तसेच या भरतीची  परीक्षा TCS घेणार आहे. अर्ज कालावधी – १० ते १५ दिवसांचा  असेल.  परीक्षा – अर्ज मुदत संपल्यानंतर एक महिन्यानंतर निकाल लागणे  अपेक्षित आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जुना कृती आराखडा खालील दिलेलं आहे, यानुसार नवीन वेळापत्रक आणि अपडेट्स लवकरच येतील.


 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे अनुषंगाने शासकीय कार्यालयातील ७५००० हजार पदे भरावयाची आहेत. त्यानुषंगाने सरळसेवेने रिक्त असलेल्या पदांची पदभरती सेवाभरतीची करावयाची आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. ०४.०५.२०२२ मधील अ. क्र. २ इ) नुसार जाहिरात ज्या महिन्यात दिली जाईल त्या महिन्यापासून पुढील एका वर्षात नामनिर्देशनाने भरतीसाठी उपलब्ध होणान्या संभाव्य रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन निवड प्रकिया करावी असे नमुद केले आहे. तरी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात माहिती सादर करावी. सदरची माहिती दि.०९.०६.२०२३ पर्यंत सादर करण्यात यावी, या आशयाचे परिपत्रक विभागाद्वारे जाहीर झाले आहे. या नुसार या भरतीच्या हालचाली सुरु झाल्या असून लवकरच जाहिरात येणे अपेक्षित आहे.

 

Mahakosh Bharti 2023

 

परिपत्रक पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. sachin titarmare says

    finance department chi jaga kadhi yenar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड